नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारावर गेलीआहे. सध्या देशातील 15 हजार 707 जणांना कोरोनाची लागण झाली असून 507 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2230 रुग्ण बरे झाले आहे.


देशातील तबलीगी जमातीच्या चार हजारपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार 4200 पेक्षा अधिक म्हणजे 30 टक्के कोरोनाबाधित तबलीगी जमातीचे आहे. तबलीगी जमातीमध्ये सर्वात जास्त कोरोनाची लागण आसममध्ये झाली आहे. आसाममध्ये 91 टक्के कोरोनाबाधित हे तबलीगी जमातीचे आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू (81 टक्के), तेलंगणा (79 टक्के), अंदमान निकोबार (83 टक्के), दिल्ली (63 टक्के), आंध्रप्रदेश (61 टक्के) आणि उत्तर प्रदेशातील (59 टक्के) कोरोनाबाधित तबलीगी जमातीचे आहे.


राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 3648 झाला आहे. राज्यातील या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 344 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5994 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केलं आहे. आजपर्यंत 365 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात82,299 लोक होम क्वॉरंटाईन असून 6999 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 60 हजारांवर गेली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1 लाख 60 हजार 731 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 23 लाख 31 हजारांवर पोहोचली आहे.गील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे. सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत तर अजुन जवळपास पावणे सोळा लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 55 हजार 265 गंभीर आहेत.


संबंधित बातम्या :