हिंगोली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून कळमनुरी तालुक्यातील नांदापुरच्या गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नांदापूर हे राज्यातील पहिलेच गाव आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घराबाहेर न जाणं, सतत हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर हे सुमारे 2 हजार 700 लोकसंख्येचे गाव आहे. गावात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांची आज सकाळी बैठक झाली. यावेळी कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आल्या. त्यानंतर गावात नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नोंद करूनच बाहेरगावी जायचे आणि परत आल्यानंतर त्याची नोंद करणं बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गावात प्रवेश करतांना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोनावर अशा प्रकारची खबरदारी करणारं राज्यातील नांदापूर हे पहिलेच गाव आहे.
पाहा व्हिडीओ : Corona | हात जोडून विनंती, हे प्रकरण सहज घेऊ नका - राज ठाकरे
गावात येणारे सर्व रस्ते बंद
गावात येणारे सर्व रस्ते गावकऱ्यांनी बंद केले आहेत. केवळ एक मुख्य रस्ता सुरू ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी दोन गावकऱ्यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी गावातील व्यक्ती बाहेरून आल्यानंतर त्यांची नांवे नोंदवली जात आहे. तर इतर रस्ते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, गावाच्या सिमा बंद करणारे राज्यातील हे पहिलेच गाव आहे. गावातून पुणे, मुंबई या सारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. 14 मार्चपासून गावात आलेल्या या गावकऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत 25 गावकरी गावात परतले असून त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. या गावकऱ्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे.
नवी व्यक्तींची भेट वेशीवरच
गावात नवीन व्यक्ती महत्वाच्या कामासाठी आला असेल तर त्याला नेमके कोणत्या गावकऱ्याला भेटायचे याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानुसार त्या गावकऱ्याला माहिती देऊन वेशीवर बोलावले जात असून त्या ठिकाणीच नवीन व्यक्तीची भेट घडवून आणली जाणार आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुर्तास नवीन व्यक्तींनी गावात प्रवेश करू नये. तसेच गावकऱ्यांनीही गावाबाहेर जातांना नोंदणी करूनच जावे असे आवाहन गावातील पंचायतीने केले आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; तर कोरोना बाधितांचा आकडा 89 वर
Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू
Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची
Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद