मुंबई : कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत. परंतु त्यासाठी संयम, समंजसपणा आणि योग्य दक्षता घेण्याची गरज आहे. याची गांभीर्याने दक्षता घ्याल मला विश्वास आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला आवाहन केले.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात व काही ठिकाणी लोकं रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहेत, याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
इतर देशात गंभीर स्थिती आहे, त्या स्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन नागरिकांनी दक्षता घेतली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपणही या परिस्थितीला गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
लोक लॉकडाऊनला अजूनही गांभीर्याने घेत नाहीत : पंतप्रधान
दरम्यान अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका. केंद्र व राज्य सरकारने जे आवाहन केले आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सरकारी यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावं, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी
महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी गेला आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 59 वर्षीय मृत व्यक्ती फिलिपिन्स येथून आली होती. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
- मुंबई - 38
- पुणे मनपा - 16
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- नागपूर- 4
- यवतमाळ - 4
- नवी मुंबई - 4
- कल्याण - 4
- अहमदनगर - 2
- पनवेल - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
Lockdown After Effects | लॉकडाऊनचा मुंबईकरांवर परिणाम नाही, धोका असतानाही मुंबईकर बाहेर
संबंधित बातम्या
- Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू
- Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची
- coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती
- Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही