LIVE UPDATES | हाथरस घटनेच्या निषेधार्थ पुण्यात कँडल मार्च

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; रिकव्हरी रेट 83 टक्क्यांवर CSK vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा 37 धावांनी विजय; चेन्नईचा 5 वा पराभव, विराट कोहली ठरला हिरो Majha Katta | मराठा आरक्षणावर राजकारण करू नये : खासदार संभाजीराजे छत्रपती

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Oct 2020 07:33 AM
बीड -मागच्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अधूनमधून येणाऱ्या पावसाने खरीप पिकाचे मोठे नुकसान केलं आहे.. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले आहे.. खरीपाच्या पिकांची काढणी झाली आहे मात्र बीड जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या कपाशीचे मात्र या पावसामुळे नुकसान होताना पाहायला मिळत आहे.
सोलापूर-

सोलापूरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी,

काल संध्याकाळी जवळपास जिल्ह्यातील सर्व भागात पावसाने लावली होती हजेरी,

आज पुन्हा सकाळपासुन शहरात ढगाळ वातावरण होतं,

दुपारी 2.30 वाजता मुसळधार पावसाची हजेरी,

बार्शी तालुक्यातील काही भागात देखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरू
CM Uddhav Thackeray LIVE | केंद्राच्या कृषी कायद्यावर शेतकऱ्यांशी चर्चा; शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यास कायदे स्वीकारणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट
हाथरस घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आज कँडल मार्च काढण्यात आला. आम्ही पुणेकरांकडून या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये भाजप वगळता सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. लाल महल ते टिळक पुतळ्यापर्यंत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा आणि मशाल घेत कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी योगी सरकारचा निषेध व्यक्त करत पीडित तरुणीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये महिला, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
दुसरी महत्वाची घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आरेतील प्रस्तावित कारशेड आता कांजूरमार्गला होणार. आरेत कारशेड होणार आहे की नाही याबाबत देखील महत्वाची घोषणा त्यांनी केली. आरेत कारशेड होणार कांजूरमार्गची सरकारी जमीन शून्य रुपये किमतीत देणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. जनतेचा एकही पैसा खर्च होणार नाही. या जागेसाठी एकही रुपया खर्च केला जाणार नाही, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा जंगल घोषित केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. त्यावेळी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचं जंगल असणार आहे. आहे ते टिकवणं आपलं काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकर्‍यांनो निश्चिंत रहा! वार्‍यावर सोडणार नाही.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शेतकरी वर्क फ्रॉम होम करू शकत नव्हता. ते कार्यरतच होते. सरकारने विविध कृषी संघटनांसोबत चर्चा केली. केंद्र सरकारच्या शेती संदर्भातील विधेयकाबद्दल चर्चा केली जातेय. त्याचे फायदे काय आणि फटके काय? सर्व वाईट असे नाही परंतु जे हिताचे नाही त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढत आहोत, असं ते म्हणाले. कांद्यासाठी साठवणूक केंद्र, उद्या सोयाबीन, तुर, कापुस यासाठी स्टोरेज, शीत गोदामे हवी तिथे शीत गोदामे देण्यासाठी आपली वाटचाल सुरू आहे. 'विकेल त पिकेल' मध्ये अनेक शेतकरी सामिल होत आहेत. हमी भावच नाही तर हमखास भाव. शेतकरी पाणी, उन, पाऊस, कष्ट सर्वाचा विचार न करता काम करतो. त्यांना वार्‍यावर सोडणार नाही. पूर आलेल्या सर्व ठिकाणी आपण मदत देत आहोतच. हे सरकार तुमचं सरकार आहे, हक्काच सरकार आहे. शेतकर्‍यांनो निश्चिंत रहा!, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आरे मेट्रो कारशेड आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे , आरे कारशेड रद्द, कांजुरमध्ये नवीन कारशेड; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत, मराठा आरक्षण, कोरोना, एमपीएससी परीक्षेवरुन सुरु असलेलं राजकारण यावर काय बोलणार याकडे लक्ष
जालना जिल्ह्यात आज सर्वदूर पावसाने धुवाधार हजेरी लावली. सलग दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस बरसत असून, जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसाने परतूर तालुक्यात काही मिनिटातच रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले. जोरदार आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र आणखीनच भर पडलीय. काढणीला आलेली सोयाबीन, उडीद त्याच बरोबर कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये कालपासून पावसाचा जोर कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील सकाळपासूनच पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. यापूर्वी झालेल्या पावसाने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना. उर्वरित पिकांचे देखील परतीच्या पावसाने नुकसान होत आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरला असून, हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची धुवाधार बॅटींग सुरु आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यावर 66 लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा दाखल. अनिल म्हमाणे यांनी गुंगीचे औषध देऊन वृद्धेला लुटल्याचा आरोप. नोटबंदी नंतर आणीबाणी लावून सरकार पैसे काढून घेणार आहे, अशा भूलथापा मारून बँकेतून रकमा काढायला लावल्याचा आरोप. बँकेतून आणलेली पैशाची घरात लपवुन ठेवलेली बॅग चहा आणि दूध भाकरीतुन गुंगीचे औषध घालून लंपास केल्याचा आरोप. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर म्हमाणे पोलिसांत हजर. माझ्यावर खोटे आरोप करून मला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे, अनिल म्हमाणे यांचे निवेदन.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. भोर तालुक्यातील भोंगवली गावात ही घटना घडलीय. विकास शिंदे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच नाव आहे. विकास दुचाकीवरून घरी जात असताना दवाखान्यासमोरच त्याच्या अंगावर वीज पडली. विकास हा भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहन चालक म्हणून काम करत होता. आज सायंकाळपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस आणि वीजेचा कडकडाट सुरू आहे.
मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय जो आंध्र प्रदेशाच्या मार्गे जमिनीकडे सरकतोय. यामुळं येणाऱ्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधे दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. त्याचबरोबर 14 ऑक्टोबरनंतर अंदमान बेटांच्या भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. तो झाल्यास पुन्हा त्यानंतर देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जत मतदारसंघातील खराब रस्त्यावरून आमदार रोहित पवार यांना केले लक्ष्य
खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन. गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज सकाळी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोरे यांच्यावर सुरुवातीला पिंपरी चिंचवडच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. पण दहा दिवसांपूर्वी तब्येत खालावल्यामुळं त्यांना रुबीत हलविण्यात आलं होतं. आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असून यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. अमृतांजन पुलाखालील वळणावर आज सकाळी ही घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला आणि चालक खाली पडला. त्याचवेळी ट्रकच्या मालाखाली तो आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यंत्रणेकडून तातडीने पावलं उचलण्यात आल्याने मार्ग सुरळीत सुरु राहिला.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असून यात चालकाचा जागीच मृत्यू झालाय. अमृतांजन पुलाखालील वळणावर आज सकाळी ही घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला आणि चालक खाली पडला. त्याचवेळी ट्रकच्या मालाखाली तो आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यंत्रणेकडून तातडीनं पावलं उचलण्यात आल्याने मार्ग सुरळीत सुरू राहिला.
MPSC परीक्षा पुढे ढकलायची का याबाबत सरकारच्या प्रमुख मंत्र्यांची आज संध्याकाळी बैठक होणार.आज झालेल्या व्हीसीमध्ये अनेकांनी कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केले.
कोरोना काळात परीक्षा देणे परीक्षार्थींना त्रासदायक ठरु शकेल असे मत मांडले.
शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा : यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाच्या 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'ला जाहीर. वर्ल्ड फूड प्रोगाम'ने 2019 मध्ये 88 देशांतील जवळपास 10 कोटी नागरिकांना खाद्यान्न पुरवलं!
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्याबद्दल गैर शब्द वापरल्याप्रकरणी साता-यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते या दोघांविरोधात सातारा शहर पोलिसठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंचे नाव न घेता बिनडोक राजा असा उल्लेख केला होता. तर गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी राजेंबद्दल अपशब्द वापरले. राजेंबद्दल चुकीचे शब्द वापरल्याच्या कारणातून मराठा क्रांती मोर्चाचे समनवय समितीचे भागवत कदम आणि राजेंद्र निकम यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सातारा शहर पोलिस ठाण्यात दोन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
येवला शहरात भर बाजारपेठेत एका युवकाची स्वतःचे गुप्तांग आणि गळ्यावर वार करुन घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दुपारच्या सुमारास बुंदेवपुरा येथिल युवक मेनरोडवर हातात कोयता घेऊन आला. अगोदर स्वतःच्या गुप्तांगावर आणि नंतर स्वतःच्या गळ्यावर वार करुन आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या युवकाचे हे कृत्य पाहून नागरीक भयभीत झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक संदीप कोळी या घटनेचा अधिक तपास करीत आहे.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली, मराठा आंदोलकाच्या विरोधानंतर राज्य सरकारचा निर्णय
2015 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये निधन झाले. सुधाकर शिंदे हे त्रिपुरा केडरचे अधिकारी होते आणि सध्या त्रिपुरा राज्यात शिक्षण विभागात ते कार्यरत होते. ते मुळचे परभणी जिल्ह्यातील होते.
राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो, तलवार कोणाविरोधात उपसणार? असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विचारला आहे. तलवारीची नाही तर तडजोडीची भाषा हवी, असंही ते म्हणाले.
जागतिक अन्न उपक्रमाला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

छत्रपती उदयन राजे यांच्या विषयी अपशब्द काढला असा आरोप करत प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने करण्यात आली. बीड शहरातील शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुनरत्न सदावर्ते यांच्यावरही कारवाईची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. बीड शहरातील क्रांती मोर्च्याच्या वतीने बीडच्या एसपीना कारवाईसाठी निवेदन दिलं आहे.
महाराष्ट्रतील शाळांचा मनमानी कारभार आणि शाळा बंद असताना अतिरिक्त फी वसुली, फी वाढ या विरोधात उद्या राज्यभरात फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन पालक संघटना थाळी बजाओ आंदोलन करून सरकराला जगावण्याचं काम करणार आहे. राज्यभरातून शाळा फी वाढ बाबत अनेक तक्रारी येत असताना आणि पालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असताना सरकार मात्र मुजोर शाळांवर काहीच कारवाई न करता याचा भुर्दंड पालकांना भरावा लागत असून पालक त्रस्त झाले आहे. त्यामुळे याबाबत सरकराला जागवण्यासाठी राज्यभर पालकांना एकत्र येण्याचं आवाहन फोरम फॉर फेअरनेस इन एडूकेशन पालक संघटनेकडून केला जात असून याबाबत पालक संघटना सकाळी सात वाजता थाळी वाजवून आंदोलन करणार आहे.
सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास हरकत नाही, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात दिली आहे. परंतु, सगळेच प्रवासी मास्क लावत नाहीत, त्यामुळे अद्याप निर्णय न घेतल्याचंही राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात सांगितलं आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीला सुरवात झाली आहे. विभागीय आयुक्त, जिल्ह्याधिकारी, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित आहेत. पुणे मेट्रोच्या कामासह जिल्ह्यातील कोरोनास्थिती आणि इतर प्रलंबित विकास कामांचा अजित पवार आढावा घेत आहेत.
माजी नगरविकास राज्यमंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचा सध्या शिव्या घालत असतानाचा व्हिडीओ प्रंचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये भास्कर जाधव प्रचंड संतापले असून समोरच्या व्यक्तिला अक्षरक्षा आई-बहिणवरून शिव्या घालत आहेत. तुरंबव या गावातील शारदादेवी मंदिरातील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात असून त्यांचा कार्यकर्ता देखील यावेळी अरेरावीची भाषा करत असल्याचं दिसून येत आहे. तर, यातील महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी मोबाईलवरून व्हिडीओ करणाऱ्या व्यक्तिला देखील शिवीगाळ करत मारहाण केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे माजी मंत्र्यानं, एका लोकप्रतिनिधीनं अशाप्रकारे आई-बहिणवरून शिवीगाळ करणं किती योग्य? असा सवाल देखील यावेळी विचारला जात आहे.
कल्याण : कल्याणच्या पत्री पूल परिसरामध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या ठिकाणची वाहतूक कोंडीची समस्या काहीशी कमी झाली होती. मात्र आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत पुन्हा एकदा सगळे व्यवहार सुरळीत झाले असून सर्वसामान्य चाकरमानी मात्र ऑफिसला जाण्यासाठी फक्त रस्ते मार्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे कल्याण शीळ रोड प्रमाणेच पत्री पूल परिसरात सुद्धा पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. आधीच आमच्यासाठी लोकल बंद असताना आमचा रस्ते प्रवास तरी सुकर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जातेय.
पुणे : दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारं निवेदन पुणे व्यापारी महासंघ, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन सुरु झालेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी वेळ वाढविण्याची गरज असल्याच व्यापारांचं म्हणणं आहे. सायंकाळी सात वाजता दुकाने बंद करण्यामुळे नोकरदारांना खरेदीसाठी बाहेर पडता येत नाही. हे टाळण्यासाठी 17 ऑक्‍टोबरपासून दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेच्या पहिल्या दिवशी ओटीपीवरून गोंधळ
झाला. विज्ञान शाखेतील 1 हजार 584 परिक्षार्थींपैकी 316 विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी ओटीपी गोंधळामुळे परीक्षेत मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यापैकी अनेक जणांचे पेपर वेळेत सबमिट होऊ शकले नव्हते. त्यामुळे आजपासून परिक्षेला ओटीपी यंत्रणाच विद्यापीठाने बाद केली आहे. थेट लॉगिन आणि पासवर्ड टाकून परीक्षा देता येणार आहे. शिवाय परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रकांनी ही माहिती दिली आहे.
MPSCच्या परिक्षाचं काय होणार? सह्याद्री अतिथीगृहावर साडेचार तासांपासून बैठका सुरु.
बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण उपस्थित. विनायक मेटे, छत्रपती संभाजी महाराज आणि सुरेश पाटीलांच्या शिष्टमंडळानं घेतली भेट. परिक्षा रद्द करण्यावर सरकार सकारात्मक असल्याचा मेटेंचा दावा, तर आधीच्या साडेचारशे विद्यार्थ्यांना संधीसाठी छत्रपती आग्रही. आमची आंदोलनं सुरु राहणार असल्याचा छत्रपतींनी दिला इशारा व मेटेंच्या शिष्टमंडळावर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित.
मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या महिलेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल. महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार देणाऱ्यांना आता मनसेची शिकवणी सुरु करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त, 2 मराठी चॅनेलच्या मालकांना अटक, रिपब्लिक टीव्हीची चौकशी सुरू
2020 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार अमेरिकन कवी लुईस ग्लॅक यांना प्रदान करण्यात आले. स्वीडिश अ‍ॅकॅडमीने हा पुरस्कार गुरुवारी जाहीर केला.
औरंगाबाद 18 वर्षाच्या मुलीवर बापानेच केला अत्याचार. गेल्या चारवर्षांपासून करत होता अत्याचार. वडगाव कोल्हाटी परीसरतील मधील घटना. मुलीच्या फिर्यादीनंतर नराधम बाप अटकेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
महाराष्ट्राच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना निवडून दिलं होतं. पण महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला. आगामी काळात हे तीनही पक्ष विरोधी बाकावर असतील आणि एकटा भाजप सत्तेवर असेल असा मला विश्वास आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकारिणी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला विश्वास.
जनतेला उत्तरदायित्व असलेला भाजप एकमेव पक्ष. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर, एकही घरी बसलेला नाही. (उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला). या मंत्र्यांना झोप कशी लागते. 15 लाख लोक राज्यात कोरोनाग्रस्त आहेत. यांचा फक्त एकच धंदा सुरुय..बदल्यांचा धंदा मसणातली गोष्ट ऐकली होती. प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी राज्यकर्ता खात आहेत. कोरोनाचा बाजार केला आहे. राज्यकर्त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. रोज महिलांवरच्या बलात्कार आणि अत्याचारामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कोणी बाहेरून येऊन आमच्या महाराष्ट्राला बदनाम करू शकत नाही. हाथरसच्या घटनेचा निषेध केलाच पाहिजे व राज्य, जात, समाज, राजकीय व्यवस्था पाहून रस्त्यावर उतरून विरोध म्हणजे बेगडीपणा आहे. राजस्थान मधील दलित मुलीबद्दल का नाही केलं आंदोलन, का नाही केलं ट्विट?. फेब्रुवारीत सात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा का नाही केले आंदोलन? क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नसतील तर कुठे सुरक्षित असणार?
मुख्यमंत्री व छत्रपती संभाजीराजे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बैठक संपली. छत्रपती संभाजीराजे MPSC परिक्षा रद्द करण्यावर ठाम. थोड्याच वेळात निर्णय
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहतीच्या व वन विभागाच्या ताब्यातील एकूण ३२८.८९ हेक्टर जमीन ही भारतीय वन अधिनियम १९२७च्या कलम ४ अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस मान्यता देण्यात आली आहे.
गडचिरोलीत ओबीसी कार्यकर्त्यांचे घंटानाद आंदोलन, मराठा समाजाला ओबीसी गटात आरक्षण नको ही प्रमुख मागणी, ओबीसींच्या जात निहाय जनगणनेची मागणी रेटली पुढे, स्थानिक आमदार -खासदार यांच्या घरापुढे केले थाळीनाद आंदोलन, राज्यातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये घटलेला ओबीसी आरक्षणाचा टक्का पूर्ववत करण्याची मागणी
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचा निर्णय, MPSC परीक्षा होणार त्याला विरोध नाही, एमपीएससी परीक्षेला मराठा संघटनेचा विरोध नाही, सरकारने घेतलेला अजून निर्णय होता त्या निर्णयाला कोर्टाने स्थगिती दिली आहे यामुळे इतर समाजाच्या मुलांचे नुकसान होऊ नये यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नानासाहेब जावले यांनी दिली आहे
अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाऊस पडत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस कोसळत असून सकाळी चार ते पाच तास पावसाने शेतातील सोयाबीनचे प्रचंड नुकसान केलं आहे. तर कपाशीचे ही मोठं नुकसान झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.
वाशीम : जिल्ह्यात यावर्षी प्रमाणा पेक्षा अधिक जास्त पाउस झाल्याने खरिपाच्या पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. सोयाबीन काढणीला जास्त खर्च येत असल्याने रिसोडच्या आसोला गावच्या गणेश देशमुख या शेतकऱ्याने सोयाबीनला उत्पन्नात घट आल्याने आपल्या अडीच एकर शेतातील पिकाला आग लावून जाळून टाकले आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च येत आहे. अशावेळी मजुरी ही देणे कठीण होत आहे. म्हणून गणेश देशमुख यांनी सोयाबीन पिक जाळून आपला राग वेक्त केला.
पालघर तालुक्यातील दांडी येथील रहिवासी सुखदेव आरेकर यांची 'हिरा देवी' मच्छिमारी बुधवारी सकाळी समुद्रात डोल जाळ्याद्वारे कविवर मासेमारी करण्यासाठी गेली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास बोटीच्या पंख्याला दोरखंड अडकल्याने मोठी समस्या निर्माण झाली. दोरखंड खेचून काढण्याच्या प्रयत्नात नौकेच्या मागच्या बाजूस भगदाड पडून ही मासेमारी नौका बुडू लागली. आपल्याला मदत मिळावी म्हणून या नौकेवरील मच्छीमारांनी मोबाईलद्वारे इतरत्र संपर्क साधला. काही वेळाने दांडी येथील विठ्ठल आरेकर यांची कल्पतरू आणि राजेंद्र पागधरे यांची अमर लक्ष्मी या दोन नौका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आपला जीव वाचविण्यासाठी समुद्रात तरंगत असलेल्या 5 मच्छीमारांना वाचविण्यात या दोन्ही नौकेतील मच्छीमारांना यश आले. तसेच समुद्रात बुडणाऱ्या दुर्घटनाग्रस्त नौकेला दोरखंडांच्या साहाय्याने टोचन करून किनाऱ्यावर आणण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नसली तरी तरीही नौकेचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच नौकेतील डोल जाळी देखील समुद्रात वाहून गेल्याचे नौका मालकांनी सांगितले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने नौका मालकाला शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे.
जालना : केंद्राच्या कृषी विधेयकाला ठाकरे सरकारने दिलेल्या स्थगिती विरोधात जालन्यात भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकार ने स्थगिती दिलेल्या आदेशाची भाजप कार्यलया समोर होळी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार केंद्रीय कृषी सुधारणा अध्यादेशा विषयी जाणूनबुजून राजकीय आकस बुद्धीने गैरसमज पसरवत असून राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत उदासिन असल्याच यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
परळी मध्ये रोख ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार असून परळी तहसील बाहेर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं समन्वयकांनी सांगितले आहे. यावेळी एमपीएससी परीक्षा रद्द करण्यात यावी. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरती स्थगित करण्यात यावी. अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आलीय. दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय.
ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समिती कडून वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली. 50 ते 60 जणांनी विविध मागण्यासाठी हे आंदोलन केले. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसी आरक्षणात कोणाचा शिरकाव करू नये, सरकारी मेगा भरती झाली पाहिजे, ओबीसींचा बॅक लॉग भरला पाहिजे, शिष्यवृत्ती दिली गेली पाहिजे अश्या मागण्या घेऊन आंदोलन केले गेले. या आंदोलनात माजी आमदार प्रकाश शेंडगे सहभागी झाले होते. सरकारने मराठा समाजाची 13 टक्के पदे सोडून उर्वरित 87 टक्के पदांसाठी भरती सुरू करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला.
सिंधुदुर्गातील सावंतवाडीची लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत. आता याच सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचा भारतीय पोस्टाकडून सन्मान करण्यात आला आहे. लाकडी खेळण्यांना भारतीय पोस्टाकडून पोस्टकार्डवर स्थान दिले आहे. पोस्टकार्डच्या दीडशे वर्षांच्या प्रवासानिमित्ताने पोस्टकार्डवर देशातील बारा हस्तकलांना पोस्टकार्डवर स्थान देण्यात आले आहे. त्यात सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांचा ही समावेश आहे. ही पोस्टकार्ड ग्रीटिंग स्वरूपात पाठविता येणार आहेत. त्यामुळे सावंतवाडीतील लाकडी खेळणी तयार करून विकणाऱ्या विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
हिंगोली : शहरातील भाजी मंडई परिसरामध्ये आज नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता, भाजी मंडई परिसरातील जमलेल्या जमावाने नगरपालिकेच्या एका अभियंत्यास बेदम मारहाण केली आहे. नगरपालिकेचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता, हा सर्व प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. भाजी मंडई परिसरात काही वेळ एकच गोंधळ उडाला होता. गोंधळ घालणार्‍या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या हिंगोली शहर पोलिसात सुरु आहे.
एक राजा बिनडोक, दुसऱ्या राजांनी भूमिका घेतलीय हे बरोबर, पण त्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर, प्रकाश आंबेडकर यांची उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यावर टीका
एक राजा बिनडोक, दुसऱ्या राजांनी भूमिका घेतलीय हे बरोबर, पण त्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर, प्रकाश आंबेडकर यांची उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यावर टीका
भाजपच्या कार्यकरिणीच्या बैठकीला सुरुवात. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, सुनील देवधर, विजय पुराणिक, व्ही सतीश यांच्या उपस्थितीत सरचिटणीस आणि उपाध्यक्षांच्या पहिल्या सत्राच्या बैठकीला सुरुवात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा, 25 हजार कोटींच्या कथित महाराष्ट्र राज्य सरकारी बँक घोटाळ्याप्रकरणी 69 जणांना क्लीन चीट, मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा, 25 हजार कोटींच्या कथित महाराष्ट्र राज्य सरकारी बँक घोटाळ्याप्रकरणी 69 जणांना क्लीन चीट, मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल
राणी चन्नम्मा एक्सप्रेस आता कोल्हापूरऐवजी केवळ मिरजेपर्यंत धावणार, तिरुपतीवरुन अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येणार्‍या या भाविकांना मोठा फटका, याआधी राणी चन्नम्मा एक्सप्रेस बंगळुरुवरुन थेट कोल्हापूर अशी होती, तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेण्याची प्रथा आहे, यासाठी भाविक बंगळुरुवरुन कोल्हापूरला येण्यास जास्त पसंती देतात, तसंच बंगळुरुमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनाही याचा फटका बसणार
राणी चन्नम्मा एक्सप्रेस आता कोल्हापूरऐवजी केवळ मिरजेपर्यंत धावणार, तिरुपतीवरुन अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येणार्‍या या भाविकांना मोठा फटका, याआधी राणी चन्नम्मा एक्सप्रेस बंगळुरुवरुन थेट कोल्हापूर अशी होती, तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेण्याची प्रथा आहे, यासाठी भाविक बंगळुरुवरुन कोल्हापूरला येण्यास जास्त पसंती देतात, तसंच बंगळुरुमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनाही याचा फटका बसणार
बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 20 कोटींचे ड्रग्स जप्त केलं आहे. मेफेडड्रॉन नामक 20 किलो हे ड्रॅग आहे. याप्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 20 कोटींचे ड्रग्स जप्त केलं आहे. मेफेडड्रॉन नामक 20 किलो हे ड्रॅग आहे. याप्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
सोलापुरात रात्री उशिरा हाथरस घटनेच्या निषेधार्थ पोस्टर लावण्यात आले. उत्तर प्रदेश येथील हाथरस प्रकरणावरुन मागील काही दिवसांपासून सोलापूरात पडसाद उमटत आहेत. विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली. मात्र रात्री कोणत्याही पक्ष, संघटना किंवा व्यक्तीच्या नावाशिवाय घटनेच्या निषेधार्थ पोस्टर लावण्यात आले. सोलापुरातील शिवाजी चौक ते डफरीन चौक परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स कोणी लावले या बाबत माहिती नाहीय. हाथरसच्या पीडितेसाठी आपण काय केलं? असा सवाल या बॅनरद्वारे विचारण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य, सर्वसामान्यांना किफायतशीर किमतीत मास्क मिळणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण 19 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होईल तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील. समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारित दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.


 


मुंबई विद्यापीठातील आयडॉलच्या परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 19 ऑक्टोबरपासून होणार
तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था(आयडॉलच्या) न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा 19 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहेत. याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले. आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेताना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू, नये असेही संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितलं.


 


एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे
राज्यभरात रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा त्यादिवशी राज्यभरात जी परिस्थिती निर्माण होईल याला राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. याबाबत अधिक माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात अजूनही येतं नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणं म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर घालण्याचा प्रकार आहे. ही परीक्षा 200 जागांसाठी होणार आहे. आणि या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 2 लाखांच्या घरात आहे. जर यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाली तर त्याची सरकार जबाबदारी घेणार आहे का? जर ही परीक्षा झाली तर मराठा समाजातील कार्यकर्ते प्रत्येक केंद्रावर जाऊन परीक्षा केंद्र फोडून टाकतील. आज 2 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असताना देखील सरकार परीक्षा घेतं असेल तर यामागे राजकीय षडयंत्र तर नाही ना याची देखील शक्यता नाकारता येतं नाही. हे षडयंत्र आम्ही होऊ देखील देणार नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.