मुंबई : कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात दुसरा बळी गेला आहे. मुबंईत 63 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित या रुग्णाला 21 मार्चला रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या मृत्यूनंतर देशभरातील मृतांचा आकडा आता 5 वर पोहोचला आहे. याधी 17 मार्चला मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 10 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 10 रुग्ण आढळले यामध्ये मुंबईतील सहा तर पुण्यातील चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. कालपासून कालपासून मुंबईत 12 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- पुणे मनपा - 15
- मुंबई - 25
- नागपूर- 4
- यवतमाळ - 4
- नवी मुंबई - 3
- कल्याण - 4
- अहमदनगर - 2
- रायगड - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
कोरोनामुळे देशात पाच जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत देशात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याआधी 13 मार्चला कर्नाटकातील कुलबुर्गी येथे 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, ही व्यक्ती सौदी अरब येथून परतली होती. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग दिल्लीतील 68 वर्षीय महिलेला झाला होता. तिचा 17 मार्च रोजी मृत्यू झाला. तर 19 मार्चला पंजाबमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या :
- #JantaCurfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदींची घोषणा
- Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये होम कॉरंटाईनचे उल्लंघन; तरुणाचा कुटुंबासोबत अनेकांशी संपर्क
- coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती