पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाकडून होम कॉरंटाईनचा भंग झाल्याचं समोर आलंय. वारंवार घराबाहेर फिरणाऱ्या या तरुणाला आज पालिका प्रशासन आणि पोलिसांनी थेट रुग्णालयातच दाखल केले. नॉर्वे वरून आलेला या तरुणाला तीन दिवसांपूर्वी 14 दिवस होम कॉरंटाईनच्या सूचना होत्या. मात्र, तो नेहमी घरातून बाहेर पडायचा, पाहुण्यांचीही ये जा सुरू होती, एसीमध्ये न बसण्याचा सल्ला दिला असताना ही त्याने एसी ऑपरेटरला घरात बोलावलं, अशा तक्रारी येत होत्या. म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याला समज ही दिली होती. मात्र, तरीही नियम न पाळल्याने त्याला रुग्णालयातच दाखल करण्यात आलं,


होम कॉरंटाईन केलेल्या या तरुणाची पाहणी करण्यासाठी आरोग्य विभाग गेले असता त्याने कहरच केला. त्याच्या घरी तपासणीसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी गेले. तेव्हाही तो तरुण घराला कुलूप लाऊन पत्नी आणि वडिलांसोबत बाहेर पडला होता. ही बाब त्याने पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या कानावर टाकताच सर्वांना धक्का बसला. पोलिसांना पाचारण करण्यात आलं, त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा काही वेळाने तो, पत्नी आणि वडील गाडीतून घरी आले. मुळात फिरायला बाहेर पडलेला या तरुणाने बँकेत गेल्याची थाप मारली. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. तो होम कॉरंटाईनचे वारंवार उल्लंघन करत असल्याने शेवटी त्याला भोसरी येथील पालिकेच्या नव्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याला रुग्णालयातच कॉरंटाईन केलं जाणार आहे.

Coronavirus | जनता कर्फ्यू : 22 मार्चला 3500 हून अधिक लोकलपासून एक्सप्रेसपर्यंत विविध रेल्वे गाड्या रद्द

अनेकांकडून आरोग्य विभागाच्या नियमाचे उल्लघन
राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 52 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. यात सर्वाधिक पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचा समावेश आहे. यात बहुतांश लोक परदेशातून आलेले आहेत. त्यामुळे परदेशातून आलेल्या लोकांना 14 दिवस घरीच कॉरंटाईन (इतरांपासून अलग) करण्याच्या सूचना आहेत. मात्र, बरेचजण हे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासोबत इतरांनाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार आता होम कॉरंटाईन बंद करण्याची शक्यता आहे.

Coronavirus Effect | कसा टाळायचा कोरोना? पुणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी