मुंबई : कोरोनामुळे देशासमोर मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं पुढचे काही महीने आपल्याला भरपूर काटकसर करावी लागणार आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आज संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, राज्याला पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध आहे, त्यामुळे काळजी करु नका. जिथे आहात तिथे राहा, असं ते म्हणाले.


शरद पवार म्हणाले की, ऊसतोड कामगारांची व्यवस्था कारखानदारांनी करावी. खेदजनक बाब म्हणजे अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे बाहेर फिरू नका. पोलिसांवर कारवाईची वेळ येऊ देऊ नका. त्याचबरोबर अशा काळात काळाबाजार होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे.

ते म्हणाले की, आजच्या स्थितीतही राज्य सरकार सामंजस्यपणानं काम करत आहे. सरकारला भूमिका घ्यायला भाग पाडू नका. जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याची गरज नाही. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपापल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी माहिती देत आहेत. त्यावर विश्वास ठेवा, सूचनांचं पालन करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

ते म्हणाले की, कोरोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचं पालन करा. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठं आहे. जर सूचनाचं पालन केलं नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल, असं देखील पवार म्हणाले.

Coronavirus | रेपो रेटमध्ये मोठी कपात, EMI तीन महिने स्थगित करण्याचा आरबीआयचा सल्ला

ते म्हणाले की, या काळात घरातच थांबा, बाहेर पडू नका. लॉकडाउनच्या काळात मी सुद्धा घराबाहेर पडलेलो नाही. या काळात दैनंदिन स्वच्छता पाळा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याला जपा. हे संकट मोठं आहे. यावेळी त्यांनी अनेकांचा प्रतिक्रियांवर उत्तरं देखील दिली.