रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या सर्वत्र मोठी काळजी घेतली जात आहे. संशयित असलेल्यांवर निगराणी ठेवत त्यांच्या रिपोर्टची पडताळणी देखील केली जात आहे. अशातच रत्नगिरीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील 19जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीत कोरोना नसल्याचं स्पष्ट झाले आहे. पण यातील पाच जणांना स्वाईन फ्लुची लागण झाल्याचं समोर आलं आहे.


कोरोनामुळे सध्या सर्वत्र मोठी काळजी घेतली जात आहे. संशयित असलेल्यांवर निगराणी ठेवत त्यांच्या रिपोर्टची पडताळणी देखील केली जात आहे. दरम्यान, ज्या व्यक्तिंनी भारताबाहेर प्रवेश केला जात आहे त्यांना प्राधान्यक्रमानं तपासले जात आहे. गरज पडल्यास होम क्वारंटाईन किंवा रूग्णालयात क्वारंटाईन करून ठेवले जात आहे.  रत्नागिरीतील खेड तालुक्यात भारताबाहेरून प्रवास केलेली व्यक्ति अनेकांचा संपर्कात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. या व्यक्तिसोबत जिल्ह्यातील इतर ठिकाणाच्या व्यक्तिंचे रिपोर्ट देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, रविवारी संध्याकाळी हे रिपोर्ट प्राप्त झाले असून 19 जणांना कोरोना नसल्याचं स्पष्ट झाले आहे. या 19 पैकी पाच जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली असून, यामध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. पाचही जण खेडमधील कळंबणी या रूग्णालयात उपचार घेत आहेत.

ते 19 जण आहेत कुठले?

कोरोनाबाबतचे रिपोर्ट पाठवण्यात आलेल्या व्यक्ति सध्या कळंबणी आणि संगमेश्वर येथे उपचार घेत आहेत. दरम्यान, या साऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वांचं रक्षण कर रे महाराजा! कोरोनाचा नायनाट करण्यासाठी गाऱ्हाण्यातून देवाला साकडं!



रत्नागिरीमध्ये काय आहे कोरोनाची स्थिती?

रत्नागिरीमध्ये सध्या एक जण कोरोनाबाधित आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबईहून आलेल्या या 50 वर्षीय व्यक्तिला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या पत्नीचा आणि भावाचे रिपोर्ट देखील करण्यात आले होते. पण, ते देखील निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्यानं जिल्ह्यातील नागरिकांकडून देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नगरपालिका क्षेत्रात बाईकला बंदी करण्यात आली आहे. पोलीस देखील रस्त्यावर उतरून साऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांना घाबरू नये असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.