1. देशभरात 1100 जणांना कोरोनाची लागण, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 207 तर आठ जणांचा मृत्यू, जगभरात कोरोना बळींची संख्या 34 हजारांच्या घरात


2. भारतीय सैन्यातही कोरोनाचा संसर्ग, कोलकाताच्या कमांड हॉस्पिटमधील कर्नल रँकचे डॉक्टर आणि डेहराडूनमधी जेसीओ कोरोना पॉझिटिव्ह


3. अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांचा दावा, सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत


4. जर्मनीतील हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शॉफर यांची आत्महत्या, कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा


5. लॉकडाऊनच्या उर्वरित 18 दिवसांत गीतेचे 18 अध्याय वाचा, वेळेचा सदुपयोग करा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सल्ला


6. क्वॉरन्टाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई आयआयटीकडून क्वॉरन्टाईन अॅपची निर्मिती, क्वॉरन्टाईन व्यक्तीच्या प्रत्येक हालचालींवर यंत्रणेची नजर


7. लॉकडाऊनमुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची विक्री 80 टक्क्यांनी घटली, कर्फ्यूमुळे वाहनांची संख्या घटल्यामुळे केवळ 20 टक्केच इंधनाची विक्री


8. लॉकडाऊन काळात ईपीएफमधून 75 टक्के रक्कम काढण्याची मुभा, कामगार मंत्रालयाच्या अधिसूचनेमुळे देशातील सहा कोटी कर्मचाऱ्यांना दिलासा


9. स्थलांतरित मजुरांसाठी नवी मुंबई, ठाण्यातील महापालिका शाळा, सरकारी इमारती आणि स्टेडियमचं निवाऱ्यात रुपांतर, राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिका कामाला


10. नवी मुंबई एपीएमसीमधील गर्दी कमी न झाल्यास मार्केट तात्पुरतं खारघरमध्ये स्थलांतरित करणार, सिडकोकडून 50 एकरचा भूखंड उपलब्ध