Coronavirus | राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारांवर; एकट्या मुंबईत 1632 रूग्ण
राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली. राज्यात नव्यानं 121 रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं असून एकूण संख्या 2 हजार 455 इतकी झाली आहे.
मुंबई : राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली. राज्यात नव्यानं 121 रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं असून एकूण संख्या 2 हजार 455 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यापैकी मुंबई 92, नवी मुंबई 13, रायगड 1, ठाणे 10 आणि वसई-विरारमध्ये 5 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 50 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6 , मुंबईत 14 तर प्रत्येकी 2 जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे तर 1 जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची जिल्हानिहाय आकडेवारी
ठाणे मंडळ एकूण
मुंबई महानगरपालिका - 1632 ( मृत्यू - 101) ठाणे - 6 ठाणे मनपा - 63 (मृत्यू - 3) नवी मुंबई मनपा - 59 (मृत्यू - 3) कल्याण डोंबवली मनपा - 50 (मृत्यू - 2) उल्हासनगर मनपा - 1 भिवंडी निजामपूर मनपा - 1 मीरा भाईंदर मनपा 49 (मृत्यू - 2) पालघर - 4 (मृत्यू - 1) वसई विरार मनपा - 31 (मृत्यू - 3) रायगड - 6 पनवेल मनपा - 9 (मृत्यू - 1)
नाशिक मंडळ
नाशिक - 3 नाशिक मनपा - 1 मालेगाव मनपा - 29 (मृत्यू - 2) अहमदनगर - 11 अहमदनगर मनपा - 16 धुळे - 2 (मृत्यू - 1) जळगाव - 1 जळगाव मनपा - 1 (मृत्यू - 1)
पुणे मंडळ
पुणे - 7 पुणे मनपा - 272 (मृत्यू - 31) पिंपरी चिंचवड मनप - 29 सोलापूर मनपा - 1 (मृत्यू - 1) सातारा - 6 (मृत्यू - 2)
कोल्हापूर मंडळ
कोल्हापूर - 1 कोल्हापूर मनपा - 5 सांगली - 26 सिंधुदुर्ग - 1 रत्नागिरी - 5 (मृत्यू - 1)
औरंगाबाद मंडळ
औरंगाबाद - 3 औरंगाबाद मनपा - 20 (मृत्यू - 1) जालना - 1 हिंगोली - 1
लातूर मंडळ
लातूर मनपा - 8 उस्मानाबाद - 4 बीड - 1
अकोला मंडळ
अकोला मनपा - 12 अमरावती मनपा - 5 (मृत्यू - 1) यवतमाळ - 5 बुलढाणा - 17 (मृत्यू - 1) वाशिम - 1
नागपूर मंडळ
नागपूर - 1 नागपूर मनपा - 38 (मृत्यू - 1) गोंदिया - 1
इतर राज्ये / परदेश - 9 (मृत्यू - 1)