एक्स्प्लोर

नायजेरियामधून डोंबिवलीत आलेल्या 4 कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी दोघांना लागण

Coronavirus Dombivali : नायजेरियातून पुन्हा डोंबिवलीत आलेल्या चौघांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोव्हिडची लागण झाली आहे.

Coronavirus updates:  नायजेरियातून दोन वर्षांनी डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. आता त्यांच्या संपर्कात आलेले भाऊ आणि बाधिताची आई या दोघांनाही कोविडची लागण झाली आहे. रुग्णांच्या दोन्ही नातेवाईकांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने दिली आहे. 

नायजेरियात कामानिमित्त वास्तव्यास असलेली डोंबिवलीतील व्यक्ती आपली पत्नी तसेच 10 आणि 6 वर्षाच्या दोन मुलीसह 22 नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत परतली होती. नायजेरियातून निघताना त्याने केलेली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2 डिसेंबर रोजी 'हर घर दस्तक' या लसीकरण अभियाना अंतर्गत केलेल्या पाहणीत या कुटुंबाची माहिती महापालिकेला मिळाली. परदेश प्रवासाचा पूर्वइतिहास असल्याने त्याची करोना तपासणी करण्यात आली. त्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

नायजेरियातून भारतात परतण्यापूर्वी कोव्हिड बाधित पती-पत्नीने कोरोना लस घेतलेली आहे. या चारही रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. त्यांना तातडीने पालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान या चौघांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून प्रशासनाला अहवालाची प्रतिक्षा आहे.  

या कोव्हिडबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी केली असता रुग्णाच्या दोन कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, नायजेरियाहून परतलेल्या चौघांना भेटण्यासाठी हैद्राबाद मधून आलेल्या दोन नातेवाईकांची  देखील हैदराबादमध्ये करण्यात आलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कात आलेल्या नवी मुंबई मधील दोघांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget