coronavirus LIVE UPDATES | डहाणू तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Apr 2020 11:42 PM
नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, काल मृत्यू झालेल्या 68 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, नागपूरमध्ये सध्या 18 कोरोनाबाधित रुग्ण
पालघर : डहाणू तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले, 10 वाजून 14 मिनिटांच्या दरम्यान बसला मोठा धक्का. गेल्या आठवड्यापासून चौथा मोठा धक्का. एका बाजूनं कोरोनाचे नवीन संकट तर दुसऱ्या बाजूने भुकंप घरात बसू देईना. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
प्राण्यांनाही कोरोना व्हायरसची लागण; अमेरिकेतील प्राणी संग्रहालयातील एका वाघाला एका कर्मचाऱ्यामुळे कोरोनाची बाधा झाल्याचे आहे. ब्राँक्स झू प्रशासनाने ही माहिती दिलीय.
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील कवठा येथील एक तरुण पुण्यावरून गावामध्ये आला, या तरुणाने नियमाप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची कोरोना बाबत आरोग्य तपासणी केली. मात्र, गावातील पोलीस पाटील असलेल्या महिलेच्या पतीनेच त्या तरुणांना कोरोना झाल्याची खोटी अफवा गावामध्ये पसरवली. पुण्याहून आलेला हा तरुण कोरोनाग्रस्त आहे. याला गावांमध्ये कोणीही बोलू नका, त्याच्या घरी किराणा दुकान आहे त्याच्या किराणा दुकानावर कोणीही जाऊ नका. खोटी अफवा पसरवल्यावरुन तरुणाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवास परिसरातल्या 170 अंगरक्षक आणि कार्यलयीन कर्मचा-यांना बदणार, शासनाचा मोठा निर्णय
कळवा इथे टोटल शट डाऊन, फक्त मेडिकल सुरू ठेवणार, बाकी सर्व बंद. इतर ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत, त्या फोनवरून डिलिव्हरी मागवण्याचे आदेश. पालिकेने सर्व विभागातील नंबर जाहीर केलेत. कळवा हा ठाणे पालिकेतील हॉट स्पॉट आहे. आतापर्यंत 10 रुग्ण इथे आढळून आले असून, तरीही गर्दी नियंत्रणात न आल्याने पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय. आज देखील कळव्यात 2 नवीन रुग्ण आढळले, ज्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. ठाणे पालिका क्षेत्रात आता पर्यंत 23 रुग्ण आढळले आहेत.
मातोश्री परिसरात कोरोनाग्रस्त सापडल्याने खळबळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि व कार्यलयीन कर्मचाऱ्यांची तातडीनं तापसणी होणार, अंगरक्षक आणि कार्यलयीन कर्मचारी बदलले जाण्याची शक्यता
मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आणखी वाढला, वरळीत बीडीडी चाळीत कोरोनाचे आणखी चा रुग्ण आढळले
कोरोनाग्रस्त माणूस दुसऱ्या व्यक्तीवर थुंकला तर त्याच्यावर 'हत्येचा प्रयत्न' हा गुन्हा नोंदवण्यात येईल, ज्याच्यावर थुंकलाय ती व्यक्ती मृत्यूमुखी पडली तर थुंकणारावर हत्येचा गुन्हा दाखल होईल - हिमाचल प्रदेश पोलिस महासंचालक
राज्य सरकार आता PPE, वेंटिलेटर्स आणि N-95 मास्क खरेदी करू शकणार नाही, केंद्र सरकारने राज्यांना खरेदी करून देणार, राज्य सरकारची केंद्राकडे 2125 वेंटिलेटर्स, 8 लाख 41 हजार N95 मास्क आणि 3 लाख 14 हजार PPE किटची मागणी
कोल्हापुरातील आणखी एक व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह; कोल्हापुरात आत्तापर्यंत तिघांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर शहरातील महिलेला कोरोनाची लागण झाली.
सर्व खासदारांच्या पगारात 30% कट. केंद्रीय कॅबिनेटमध्ये अध्यादेशाला मंजुरी. पुढच्या एका वर्षांसाठी पगारात कपात दोन वर्षे खासदार निधीचे पैसे ही मिळणार नाहीत.

ठाण्यात जिल्हा सामान्य रुग्णालय आता पूर्णतः कोविड-19 च्या रुग्णांसाठी रूपांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या आसपास असलेल्या वस्त्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पिंपळपाडा येथील लोकांनी तर स्वतःहून आपल्या वस्तीमध्ये येणार रस्ता बंद केला आहे. पिंपळपाडा ही वसाहत या रुगणालायच्या समोरच आहे. अनेक इमारती आणि पोलीस लाईन देखील येथे आहेत. म्हणून या नागरिकांनी स्वतःहून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे पोलिसांना सहकार्यच होत आहे. सद्य स्थितीला जिल्हा सामान्य रुग्णालयात 27 जण उपचार घेत आहेत. ज्यात रुग्ण आणि संशयित असे दोन्ही प्रकारचे नागरिक आहेत.

कोरोनापासून मुक्ती साठी देशभरात वेगवेगळ्या उपाययोजना होत असताना वेंगुर्ला नाणोस येथील युवकही आता प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या गावासोबत इतरही गावे कोरोनामुक्त व्हायला हवीत असा निर्धार करत वेंगुर्ला नाणोस येथील सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांनी गावातील युवकांना सोबत घेत नाणोस गावासह रेडी, तिरोडा आणि गुळदूवे या गावातील परीसरात निर्जंतुकीकरण व्हावे यासाठी जंतूनाशक फवारणी केली. कोरोनामुक्तीसाठी आपण आपल्या गावापासून सुरूवात करू आणि देश कोरोनामुक्त होण्यास मदत करू असा संदेश या युवकांनी यावेळी दिला आहे.
अंबरनाथमध्ये कोरोनामुळे पहिला बळी. 50 वर्षीय कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू
कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरू झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्यादृष्टीने संशयित आहे. त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावं, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
वसई, विरार, नालासोपारा परिसरात कोरोनाच्या वाढत्या संख्येवर पालकमंत्री दादा भुसे यांची आढावा बैठक सुरू आहे. दादा भुसे यांची पालघर जिल्ह्यातील पहिलीच कोरोना विषयीची आढावा बैठक आहे.

वसईच्या तहसील कार्यालयात ही बैठक सुरू आहे.


पालघर जिल्ह्यात एकूण 16 कोरोना बाधित संख्या झाली असून वसई विरार नालासोपाऱ्यात सर्वाधिक 14 रुग्ण आहेत. नालासोपारा मध्ये 2 , पालघर 1 असे तीन बळी गेले आहेत.
वरळी येथील पोद्दार हॉस्पिटलमधील काही व्हिडीओ व्हायरल होत होते. त्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून तेथील लोकांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले आहे. अशी माहिती पर्यटन मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत लॉक डाऊन आहे . त्यामुळे शहरातील अनेक दुकानावर हॉटेल तसेच खानावळी बंद आहेत म्हणून येथील कामगार वर्ग एक वेळच्या जेवणासाठी तळमळत आहे मात्र अशा कामगारांचे भूक भागवण्यासाठी भिवंडीत वाहतूक पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भिवंडी वाहतूक पोलिसांनी आपल्या कार्यालयालाच किचन रूम बनवत त्याठिकाणी वाहतूक महिला पोलीस कर्मचारी या भिवंडीतील भुकेने तळमळत असलेल्या कामगारांसाठी जेवण बनवत आहेत व हे जेवण जवळपास एक हजार कामगारांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वाहतूक महिला पोलीस कर्मचारी घरातील काम आटपून मुलाबाळांना सांभाळून रात्रंदिवस कोरोनाच्या यापार्श्वभूमीवर लोकडाऊन मध्ये ड्युटी करीत आहेत . आपल्या घरात दोन वेळचं जेवण आहे मात्र या गरजूंच्या घरांमध्ये एक वेळचे जेवणही नाही या तळमळीने वाहतूक पोलिसांनी एकत्रित येत वाहतूक कार्यालयाला किचन रूम बनवत महिला कर्मचाऱ्यांनी जवळपास 1000 नागरिकांना जेवण पुरेल एवढं जेवण तयार केलाय त्यानंतर हे जेवण तयार झाल्यावर वाहतूक खात्यातील पुरुष कर्मचारी हे कामगारांपर्यंत जेवण पोहोचवून त्यांना सोशल डिस्टसिंग ठेवत या जेवणाचं वाटप करतात मात्र भिवंडी वाहतूक पोलिसांच्या या स्तुत्य कार्यक्रमाचं सर्वत्र चर्चा होत आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात नागरिकांनी गावात येणारे रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बिडकीन येथील गावकऱ्यांनी गावात येणारे सर्व मुख्य रस्ते बंद केले असून गावातील पेट्रोल पंपसुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतले कोरोना हॉटस्पॉट वाढले. काल चार होते, आज दुप्पट झाले. मुंबईत आता आठ कोरोना हॉटस्पॉट. वरळी भाग असलेल्या जी साऊथ वॉर्डमध्ये 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. ई वॉर्ड, एच इस्ट वॉर्ड, पी नॉर्थ वॉर्ड, एम वेस्ट वॉर्ड नवे हॉटस्पॉट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील ग्रामीण भागात नागरिकांनी गावात येणारी रस्ते बंद करण्याचा निर्णय घेत रस्ते बंद केली आहेत. बिडकीन येथील गावकऱ्यांनी गावात येणारी सर्व मुख्य रस्ते बंद केली असून गावांतील पेट्रोल पंप सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

29 कोरोना संशयितांचे नमुने धुळ्याहून परत आले आहेत. धुळ्याच्या प्रयोगशाळेत टेस्टिंग किट नसल्याने नमुने तपासणीशिवाय परत आले आहेत. आता हे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. पुण्याच्या प्रयोगशाळेतील ताण वाढत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील नमुने धुळ्याला पाठवण्यात आले होते. मात्र आठ दिवसात तपासणीशिवायच नमुने परत आले आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असताना उपकरणं, साहित्य कमी पडत असल्याचं उघडकीस आलं आहे
तीन दिवसांच्या 100 टक्के लॉकडाऊन नंतर संगमनेर शहरातील बाजारात गर्दी झाली आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांना विसर पडल्याचे येथे पाहायला मिळाले.
हजारो गाड्या रस्त्यावर ये-जा करताना दिसत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरात प्रत्येक भागात गर्दी दिसत आहे.
संगमनेर शहरात 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. प्रशासन आता दुचाकी जप्त करण्याची मोहीम राबविणार आहे.
मुंबईतील धारावीमधल्या डॉ.बालिगा नगर इथे कोरोनाचा रुग्ण आढल्यानंतर महापालिका या इमारतीतील लोकांच्या स्वॅब टेस्ट करत आहे. आतापर्यंत या भागातील 45 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत
भारताने कोरोनाविरूद्ध व्यापक लढा देत आहे. जगभरातून भारताच्या नियोजनाचं कौतुक केलं जात आहे. जनता कर्फ्यू, लॉकडाऊनमध्ये भारतीयांचं मोठं सहकार्य मिळालं आहे : नरेंद्र मोदी
कोरोनाशी लढताना भारताने एक नवं उदाहरण दिले आहे. एवढ्या मोठ्या देशात नागरिक सेवाभाव आणि शिस्त पाळून आहेत. प्रत्येक नागरिक स्वतःला आणि देशाला वाचवण्यासाठी लढत आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांना पत्र पाठवण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती. लॉकडाऊनच्या अखेरच्या काही दिवसांत काळजी घेण्याची गरज आहे. काळजी घेतल्यास कोरोनावर नक्की मात करता येईल : शरद पवार
पुढच्या 6 महिन्यातील वाटचाल कशी असावी?; हे ठरवावं लागेल. केंद्र सरकारनं राज्यांना आर्थिक पॅकेज द्यावं. शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकारनं योग्य ते पाऊल टाकणं गरजेचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची जयंती संविधानाचा दिवा लावून साजरी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.
कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपले 30 टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.
 
मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
नालासोपाऱ्यात 60 वर्षाच्या कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे. नालासोपा-यातील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. नालासोपारा येथील रिद्धीविनायक रुगणालयात उपचार सुरू असताना रात्री साडे दहाच्या सुमारास मृत्यू झाला आहे. मयत कोरोना संशयित हा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करीत असून मागच्या 12 वर्षा पासून रुग्ण डायलेलीसवर होता. संशयित मयत रुगणाची एका मान्यताप्राप्त खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

पण कस्तुरबा रुगणालयाच्या अहवाल यानंतरच मयत रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ग्राह्य धरले जाईल.
वसई विरार महापालिका महापौर प्रवीण शेट्टी यांनी ही माहिती दिली. वसई विरार शहरात 11, वसई ग्रामीण भागात 3 तर पालघर मध्ये 2 जणांची नोंद आहे. त्यामुळे एकूण पालघर जिल्ह्यात हा आकडा 16 वर पोहचला आहे. आतापर्यंत पालघर मध्ये एकाचा तर नालासोपारात आता दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं. या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. मात्र, दुसरीकडे या लॉकडाऊनचा फायदा घेऊन तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे बेकायदा गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात आहे. यावर कारवाई करत बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा, पळशी झाशी आणि चोंढी इथे सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर तामगांव पोलिसांनी छापा टाकून मोहाच्या सडवाचे 100 डब्बे नष्ट केले. ही कारवाई तामगाव पोलिसांच्या चार पथकांद्वारे करण्यात आली आहे.
औरंगाबाद घाटी रुग्णालयातील एका पुरुष परिचारकाला (ब्रदर) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा परिचारक अपघात विभागात कार्यरत होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारांसाठी त्याला मिनी घाटी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. औरंगाबाद घाटी रुग्णालयाचे डीन कानन येळीकर यांनी ही माहिती दिली. यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या 11 झाली आहे.
वर्ध्याच्या आर्वी येथील भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्या वाढदिवसाला आज मोठी गर्दी उसळली होती. या वेळी सोशल डिस्टंन्सिंग पाळलं गेलं नसल्याचे आरोप झाले आहेत. शासनाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार केचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्वीचे आमदार आमदार केचे यांचा वाढदिवस झाला. त्या दिवशी त्यांच्या घरापुढं धान्य मिळवण्यासाठी मोठी लांबलचक रांग लागली होती. सध्या संचारबंदी आहेय. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं या आदेशाचं उल्लंघन झाल्याचा आरोप केल्या जात आहे. याप्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात आमदार केचे यांच्यावर वेगवेगळ्या कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आमदार दादाराव केचे यांनी हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचं म्हटल आहे. केवळ 21 जणांना धान्य वाटप करून गेल्यानंतर विरोधकांनीच लोकांना धान्यासाठी पाठवून गर्दी केल्याचा आरोप केचे यांनी केला आहे.

मॉर्निंग वॉक करणं सोलापूरकरांना महागात

पडलं आहे. सकाळी फिरणाऱ्या जवळपास 70 लोकांवर फौजदार चावडी पोलिसांची कारवाई

करण्यात आली आहे. संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कलम 188 नुसार ही कारवाई केली आहे.
मंत्रालयात आता पुढचे काही दिवस तोंडाला मास्क लावल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. राज्य सरकारनेच यासंदर्भात आदेश दिला आहे. हा आदेश सर्व अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयात येणारे अभ्यंगतांसाठी लागू असेल.
नर्सेस संघटनांनी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र लिहून रुग्णालयात असलेल्या गैरसोयींबद्दल माहिती दिली आहे. जन स्वस्थ अभियानतर्फे आयुक्तांना पत्र लिहिण्यात आलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, आवश्यक ते काळजी घेत जात नाही. नर्सेसना पीपीई किट मिळत नाही. रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांचे विलगीकरण योग्य पद्धतीने होत नाही. कोविड-19 रुग्णांना हाताळणाऱ्या नर्सेस घरी जातात आणि बसमधून प्रवास करुन रुग्णालयात येतात. योग्य काळजी नाही घेतली तर त्या कॅरिअर होतील. ज्या नर्सेसना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे, त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही.
वर्ध्याच्या आर्वी येथील भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्या वाढदिवसाला आज मोठी गर्दी उसळली होती. या वेळी सोशल डिस्टंन्सिंग पाळलं गेलं नसल्याचे आरोप झाले आहेत. शासनाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार केचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्वीचे आमदार आमदार केचे यांचा वाढदिवस झाला. त्या दिवशी त्यांच्या घरापुढं धान्य मिळवण्यासाठी मोठी लांबलचक रांग लागली होती. सध्या संचारबंदी आहेय. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं या आदेशाचं उल्लंघन झाल्याचा आरोप केल्या जात आहे. याप्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात आमदार केचे यांच्यावर वेगवेगळ्या कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आमदार दादाराव केचे यांनी हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचं म्हटल आहे. केवळ 21 जणांना धान्य वाटप करून गेल्यानंतर विरोधकांनीच लोकांना धान्यासाठी पाठवून गर्दी केल्याचा आरोप केचे यांनी केला आहे.
साता-यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या रुग्णाचा पहाटे मृत्यू
झाला आहे. 14 दिवसापूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल
केले होते. याच रुग्णाचे कालच्या फेर तपासणीत त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. कोरोना पॉझिटिव्हचे चार रुग्ण सध्या साताऱ्यात आहे.
संसर्ग टाळण्यासाठी 95 मास्क आणि पीपीई किट द्या या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर घाटीत डॉक्टरांनी घोषणाबाजी केली. मार्डचे अध्यक्ष आणि डीनच्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कोरोना संशयितांना तपासताना निश्चितच तिकीट देण्यात येईल असे आश्वासन या वेळी देण्यात आले.



सांगलीतील प्रसाद आणि आदिती कुलकर्णी या अभियंता जोडप्याला वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचा सुमारे दोन दशकांचा अनुभव आहे. या जोडप्याने सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांचे जीव
वाचवण्यास मदत होईल असे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीचेच रिझल्ट देणारे भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर तयार केले आहे. शासकीय रुग्णालयाचे
अधिष्ठाता, सांगलीतील कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या विशेष वैद्यकीय अधिकारी पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी या व्हेंटिलेटरची पाहणी केली आहे. त्यांनी सुचवलेले बदल करुन पुन्हा हे मशिन मान्यतेसाठी शासनाच्या तांत्रिक समितीला दाखवले आहे. त्यांची मान्यता आल्यानंतर या मशिनचे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.
पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रात्री 12 वाजून 18 मिनिटांच्या दरम्यान मोठा धक्का बसला. गेल्या आठवडा भरात तीन वेळा मोठे धक्के बसले. तलासरी डहाणू तालुक्यातील अनेक भागात धक्के जाणवले.
मुंबईनंतर आता मुंब्रा येथे देखील पोलिसांनी अद्ययावत उपकरणांद्वारे गर्दीवर नियंत्रण आणण्याचे ठरवले आहे. मुंब्रा विभागात ज्या ठिकाणी गर्दी आहे तेथील नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन पोलीस करणार आहेत. ठाणे पोलिसांनी ड्रोन कॅमेरा आणि त्याला जोडलेल्या लाऊडस्पीकरद्वारे गर्दी कमी करण्याचे ठरवले आहे. मुंब्रा विभागात नागरिक ऐकत नसल्याने हा मार्ग अवलंबावा लागला आहे. यामध्ये पोलीस ड्रोण कॅमेरा संपूर्ण विभागातील महत्त्वाच्या ठिकाणांवर उडवणार आहेत. त्या ठिकाणी जर गर्दी असेल तर याच द्रोण कॅमेऱ्याला लावलेल्या लाऊड स्पीकर मधून त्यांना सूचना करण्यात येईल. आणि घरी जाण्याचे आवाहन करण्यात येईल.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...


राज्यात कालपासून 113 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 748 वर


आज राज्यात 113 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 748 झाली आहे. आज राज्यात 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 8 जण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. कोरोनामुळेमुराज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 45 झाली आहे.


मृतांची माहिती


1. कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली येथील एका 67 वर्षीय महिलेचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते.
2. कस्तुरबा रुग्णालयात एका 64 वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
3. नायर रुग्णालयात एका 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
4. केईएम रुग्णालय 60 वर्षीय पुरुषाचा आज पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
5. कस्तुरबा रुग्णालयात एका 52 वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह या आजारासोबत तो एचआयव्ही बाधितही होता.
6. केईएम रुग्णालय मुंबई येथे एका 70 वर्षीय महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजार होता त्यामुळे ती डायलिसीसवर होती.
7. चेंबूर येथील एका खाजगी रुग्णालयात एका 55 वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केला नव्हता. तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याने अनेकदा तो प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळावर येत-जात असे.
8. कस्तुरबा रुग्णालयात एका 77 वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह हे आजार होते.
9. चेंबूर येथील खाजगी रुग्णालयात 80 वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. या रुग्णाने परदेश प्रवास केलेला नव्हता. या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधी होत्या. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला होता.
10. कोरोना बाधित रुग्णाची निकट सहवासित असलेल्या 60 वर्षीय महिलेचा काल मध्यरात्री पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते.
11. पुण्याच्या ससून रुग्णालयात 52 वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नाही. त्याला मधुमेहाचा त्रास होता.
12. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज एका 58 वर्षाच्या बॅंक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता. नजीकच्या काळात मुंबई वगळता त्यांनी कोठेही प्रवास केलेला नव्हता.
13. जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे आज दुपारी एका 77 वर्षीय आत्यंतिक स्थूल असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. शहरातील एका खाजगी रुग्णालयाने तिला संदर्भित केले होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.