By :
एबीपी माझा वेब टीम | Updated at : 22 Mar 2020 11:40 PM (IST)
23:40 PM (IST) • 22 Mar 2020
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानूसार नाशिकमध्ये आज रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आज पहाटेपासून बंदोबस्तावर असलेले पोलीस उद्या पहाटेपर्यंत रस्त्यावर पहारा देताय. दरम्यान रात्री 9 वाजता जनता कर्फ्यूची वेळ संपताच नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याच शहरात दिसून आलं. अनेकांना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची माहिती नसल्याने पोलिसांकडून त्यांना समज देण्यात येऊन कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घराबाहेर पडू नका असे आवाहनही करण्यात आले.
23:37 PM (IST) • 22 Mar 2020
ठाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सार्जनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि मार्केटस निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा प्रभाग स्तरावर तीन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.
23:14 PM (IST) • 22 Mar 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यावरून मोठ्या प्रमाणात मूळ रहिवासी असलेले नागरिक अमरावतीला परत येत आहे. मात्र, अमरावतीच्या बस स्थानक रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नसल्याचं वास्तव्य आज उघडकीस आलं. आमची तपासणी करावी अशी मागणी प्रवाशांची होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी मुंबईवरून परत आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. 22 प्रवाशांची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्यानंतर त्यांना 30 मार्चपर्यंत होम कॉरंटाईन करण्यात आले. या प्रवाश्यांना घरातच राहण्याचे सांगण्यात आले, बाहेर निघाल्यास कारवाई करू अशी तंबी आरोग्य विभागाने दिले. मात्र अनेक प्रवासी तपासणी न करता गावात गेले आहेत. तपासणी झाल्याने प्रवाश्यानी समाधान व्यक्त केलं आहे.
23:02 PM (IST) • 22 Mar 2020
मुंबईच्या नागपाड्यातील मुंबईबाग आंदोलन तूर्तास स्थगित. CAA, NRC आणि NPR विरोधात सुरू होतं आंदोलन. कलम 144 आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सुरू केलेल्या उपाययोजनांना पाठींबा देत असल्याचं आंदोलकांकडनं जाहीर
20:18 PM (IST) • 22 Mar 2020
नवी मुंबई -
पनवेल आणि कळंबोली परिसरात कर्फ्यू चे उल्लंघन गेल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल.
संचारबंदी असतानाही याचे उल्लंघन करून बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरणार्या ५५ लोकांना घेतले पोलिसांनी ताब्यात ..
नवी मुंबई पोलीसांकडून जोरदार कारवाई .