एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

संचारबंदीत कारवाई करताना पोलीस अधिकाऱ्याने बनवले टिकटॉक व्हिडीओ!

पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाने संचारबंदीची कारवाई करताना टिकटॉक व्हिडीओ बनवत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पिंपरी चिंचवड : संचारबंदीची कारवाई करताना पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःचे टिकटॉक व्हिडीओ बनवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नंदकुमार कदम असं त्या टिकटॉक करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कारवाईदरम्यान खाकीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याकडून टिकटॉक केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कदम हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. संचारबंदी असताना बिनकामाचं बागडणाऱ्यांवर आणि दुकानं उघडून बसणाऱ्यांवर पोलिसांनी नक्कीच कारवाई करायला हवी. पण त्या कारवाईचा वापर टिकटॉक सारख्या सोशल मीडियावर टाकले जात आहेत. कारण त्यांनी स्वत: टिकटॉकचे हे व्हिडीओ समाजमाध्यमांत ही व्हायरल केले आहेत. पोलिसांनीच असे प्रताप केले तर मग सामान्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. टिकटॉकसाठी खाकीचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे. कोरोनाबाबत गैरसमज पसरवणे नेटिझन्सला महागात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावाने कोरोनाबाबत गैरसमज पसरवल्याने एका नेटिझन्सवर गुन्हा दाखल झाला आहे.. दीपक वाघ या व्यक्तीने फेसबुकवर एक कमेंट पेस्ट केली होती. 21 मार्चच्या या कमेंटमध्ये "आज रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कोणीही घरा बाहेर पडू नये, कोविड-19 ला मारण्यासाठी संपूर्ण शहरातील परिसरात हवेत फवारणी केली जाणार आहे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवा, ही विनंती. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर." असं त्यात नमूद होतं. हा संदेश वाऱ्यासारखा शहरभर पसरला. पालिका प्रशासन, पोलीस आणि माध्यमांना याबाबत शहरवासीय विचारणा करू लागले. शेकडो फोन ना उत्तरं देता-देता यंत्रणा वैतागून गेली. यातून पालिका आयुक्तांची बदनामी झाली. त्यामुळे पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये तसा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळं दीपक वाघ या नेटिझन्सला कधी ही अटक होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन वेळी घरात बसून नसत्या उठाठेव करू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 116 महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 झाली आहे. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी 14 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई शहर आणि उपनगर - 45 पिंपरी चिंचवड मनपा - 12 पुणे मनपा - 19 नवी मुंबई - 5 कल्याण - 5 नागपूर - 4 यवतमाळ - 4 सांगली - 9 अहमदनगर - 3 ठाणे - 3 सातारा - 2 पनवेल- 1 उल्हासनगर - 1 औरंगाबाद - 1 रत्नागिरी - 1 वसई-विरार - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Embed widget