(Source: Poll of Polls)
Coronavirus in Maharashtra Live Update | एकाच दिवशी 8381 कोरोना बाधितांना डिस्चार्ज -आरोग्यमंत्री राजेश टोपे
Coronavirus in Maharashtra Live Updates : राज्यात गुरुवारी (28 मे) कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 38,939 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात काल 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 698 कोरोनाबाधित रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 31.26 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
LIVE
Background
Coronavirus in Maharashtra : राज्यात गुरुवारी (28 मे) कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 38,939 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात काल 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1982 जणांचा मृत्यू झाला आहे. 698 कोरोनाबाधित रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 31.26 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे.
काल झालेल्या 85 मृत्यूंपैकी 37 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू हे 15 ते 25 मे या कालावधीतील आहे. या कालावधीत झालेल्या 48 मृत्यूपैकी मुंबई 22, सोलापूर 5, अकोला 4, औरंगाबाद 3, सातारा 3, ठाणे 3, वसई विरार 3, जळगाव, नांदेड, नवी मुंबई, पुणे, रायगडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 19 हजार 417 नमुन्यांपैकी 59,546 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 122 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
काल झालेल्या मृत्यूंपैकी 60 पुरुष तर 25 महिला आहेत. त्यातील 45 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 31 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 9 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 105 रुग्णांपैकी 45 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.