LIVE UPDATES | राज्यात आज 1672 रुग्ण कोरोनामुक्त, तर दिवसभरात 100 जणांचा मृत्यू

राज्यात बुधवारी (17 जून) 3307 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.68 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1315 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 59 हजार 166 झाली आहे. परत लॉकडाऊन लावणार ही अफवा आहे. आता आपण फक्त अनलॉकिंगविषयी बोलणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jun 2020 09:34 PM
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणारे सर्व पर्यटन गेटवर 19 जून पासून फक्त जंगल सफारी आणि इतर सुविधा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पर्यटकांना थांबण्याची सुविधा मात्र अद्याप नाही.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी आदेश जारी केले आहे. 19 जून पासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य, कटेपुर्णा वन्यजीव अभयारण्य, लोणार वन्यजीव अभयारण्य आणि टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य निसर्ग पर्यटन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव मंडळ, आजेगाव मंडळात 15 ते 20 मिनिटे मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. मात्र अजूनही हिंगोलीच्या काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या कामांना वेग आला.
पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकसोबत मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घ्या! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. कोल्हापूर, सांगली या भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत तातडीने मुख्यमंत्रीस्तरिय बैठक घेऊन विसर्ग कसा असावा, याबाबत संयुक्त करार करण्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून केली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3752 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,20,504 आहे. तर दिवसभरात 100 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1672 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर :
वाडा भिवंडी रोड पहिल्याच पावसात खड्ड्यात गेला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वाडा भिवंडी महामार्गावरील कुडूस कंचाड खिंडीमध्ये भयानक खड्डे असून गेल्या एका वर्षापासून काम रखडले असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशी हैराण झाले आहेत
. सार्वजनिक बांधकाम विभागाचे भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
कुर्ल्यात एका मोडकळीस आलेल्या इमारतीचा भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, कुर्ला स्टेशन रोडवर पालिका एल विभाग कार्यालयाला लागूनच असलेली ही तीन मजली जुनी इमारत, या इमारतीला पालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केलेले आहे. मात्र तरी देखील या इमारतीमध्ये अजून ही काही कुटुंब राहतात. आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान मुंबई उपनगरात जोरदार पाऊस सुरू झाला असताना या इमारतीचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिकेचे आपत्कालीन व्यवस्था अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या ही इमारत रिकामी करण्याचे काम सुरू आहे.
नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातून करोना हद्दपार झालेला असतांनाच पुन्हा नविन रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली,काल दिवसभरात तब्बल सोळा रुग्ण आढळल्याने येवल्यात आता पर्यंत रुग्णांचा आकडा 84 वर जाऊन पोहचला आहे. त्यातील 49 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून 29 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे शहरातील काही भागात अद्याप ही बॅरीकेटस लावून तेवढा परिसर सिल करण्यात आलाय, अनलॉक जाहीर झाल्यानंतर नागरीकांची बाजारपेठेत खरेदी साठी गर्दी होत असली तरी सोशल डिस्टन्स मात्र पाळले जात नसल्याच समोर आला आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी खुद्द पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यां समवेत बैठक ही घेतली होती. कोरोनाला येवल्यातून हद्दपार करायचे असेल तर नागरीकांनी सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे बनले आहे.
कोरोनाकाळातील विजबिले कमी करण्याची मुंबई भाजपची मागणी. कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण भारतात 23 मार्चपासून लॉकडाऊन (ताळेबंदी) घोषित करण्यात आली. मुंबईतील उद्योग व्यवसाय या ताळेबंदीच्या काळात पूर्ण बंद राहिले. दुकाने व कार्यालये बंद राहिल्याने व्यावसायिकांना या काळात प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. तसेच अनेक नागरिकांचा पगार किंवा उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे.
साडे अकरा लाख शेतकऱ्यांची कर्ज माफीची केवायसी पेडींग होती, ते पैसे खात्यावर जमा होत नव्हते, आजपासून केवायसी पुन्हा सुरु
काही विषयांवर समोरासमोर चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी आजची बैठक होती. यात नाराजीचा विषय नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आमचे विषय प्रशासकीय होते. त्यावर मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घ्यायचं होत.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 112 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात पडला असून, राजापूरमध्ये तब्बल 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राजापूरप्रमाणेच दक्षिण रत्नागिरीतील संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरीमध्येही 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात 146, रत्नागिरी तालुक्यात 139 तर संगमेश्वर तालुक्यात 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर रत्नागिरीतील दापोली तालुक्यात 130 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागरमध्ये 88, चिपळूण 75 मिमी, खेडमध्ये 70 मिमी तर मंडणगडमध्ये 74 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, अद्याप देखील पावसाचा जोर कायम असून अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
सातारा वन विभागाची सर्वात मोठी कारवाई,
शिकारीसाठी लावलेला सापळ्यात शिकारी जाळ्यात
12 जणांना अटक करण्यात आली आहे.
शिकारीच्या तब्बल 10 जाळ्या जप्त करण्यात आल्या असून सुमारे पाच लाखांचे साहित्य जप्त
केलं आहे. अंतराष्ट्रीय टोळी असल्याचा वन विभागाकडून प्राथमिक अंदाज
व्यक्त करण्यात येत आहे. कोयना पात्रात महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात शिकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मातोश्रीच्या पोहोचले, काँग्रेस मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बैठक
नाशिक महानगरपालिका महासभेत गोंधळ, ऑनलाइन सभेत तांत्रिक अडचणी येत असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार यांची दबंगगिरी, अर्वाच्य भाषेत भाजप गटनेते जगदीश पाटील आणि महापौरांशी घातला वाद, सुरक्षा रक्षकांना केली दमदाटी, महापौर रस्त्यावर फिरत नसल्याचा आरोप
कोरोना काळात महापौर कुठे होते केला सवाल, 15 मिनिटांसाठी ऑनलाईन सभा तहकूब, तांत्रिक अडचणी दूर करून पुन्हा होणार सभा
लॉकडाऊनच्या काळात महत्वाची कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण शीळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करून घेतली होती. त्यानंतर आता पत्री पुलाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. मे महिन्याअखेरीस हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र लॉकडाऊनमुळे मजुरांची कमतरता आणि पुलाच्या गर्डरचे भाग हैद्राबादला अडकून पडल्यामुळे हे काम थंडावलं होतं. आता हे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं असून पुढील 10 दिवसांत हैद्राबादच्या कारखान्यातून पुलाचे भाग कल्याणमध्ये दाखल होतील. त्यानंतर ऑगस्ट महिन्याखेर पुलाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. शिंदे यांनी पुलाच्या कामाची पाहणी करत ठेकेदाराला योग्य त्या सूचना दिल्या, तसंच याच ठिकाणी प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या पत्री पुलाच्या कामाचीही शिंदे यांनी पाहणी केली. जुलै महिन्यापासून हे काम पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून हा तिसरा पूल एक वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असणार आहे.
डोंबिवली पूर्वेच्या संत नामदेव पथ परिसरात राहणाऱ्या सुमती नार्वेकर या 92 वर्षांच्या आजीबाईंना 8 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर डोंबिवलीजवळच्या निऑन हॉस्पिटलमध्ये 9 दिवस उपचार करण्यात आल्यानंतर 17 जून रोजी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर मिलिंद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजीबाईंचा विशेष सत्कार करत त्यांना निरोप दिला. वय कितीही असलं, तरी इच्छाशक्ती प्रबळ असली की कोरोनावर मात करता येते, हे या आजीबाईंनी दाखवून दिलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बुरुजाला सुरुंग लागण्याची शक्यता, राजू शेट्टी यांचे विधानपरिषदेला नाव निश्चित झाल्यावर काही नेते नाराज

जालंदर पाटील आणि सावकार मदनाईक यांनी व्यक्त केली नाराजी, सूत्रांची माहिती, चर्चा सुरू झाल्यानंतर नाराज असलेल्या दोन्ही नेत्यांचे फोन स्विच ऑफ, संघटनेतील वादावर बोलण्यास राजू शेट्टी यांचा नकार, लवकरच सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया मांडणार
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 आणि प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे. कागल तालुक्यातील बस्तवडे बंधाऱ्यावर 2 फूट पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.
चेंबूरच्या प्रकाश थोरात मार्ग परिसरात पहाटे चारच्या सुमारास गोळीबार झाला आहे. यात सादिक इनायत खान नावाच्या व्यक्तीला दोन गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी सादिकची पत्नी मेहरुनिसाच्या भावांशी नवनीत राणा, यासिन अन्सारी आणि त्यांच्या साथीदारांची भांडण झाले होते. यात नवनीत राणा आणि त्यांच्या सहकार्यावर तलवारीने वार झाले होते. या प्रकरणाचा बदल म्हणून नवनीत राणा आणि
यासिन अन्सारी तसंच त्याच्या आणखी दोन साथीदारांनी पहाटे चार वाजता मेहरुमच्या घरी जाऊन दरवाजातून गोळीबार केला. यात साजिद खान हा मेहरुमच्या पतीला दोन गोळ्या लागल्या. यानंतर राणा आणि त्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला. साजिदवर सध्या सायनच्या टिळक पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
नागपुरात रात्रभरात 23 कोरोना बाधित रुग्ण वाढले, एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या पोहोचली 1132 वर, आतापर्यंत 690 रुग्ण बरे होऊन घरी परतले, आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण आधीच क्वारन्टाईन होते
ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात परीक्षा नको, असा सूर भाजपचा आहे, मग महाराष्ट्रात भाजपची वेगळी भूमिका का? उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा भाजपला सवाल
काँग्रेस मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज अखेरीस भेट होणार आहे. आज दुपारी दीड वाजता बैठक होईल.
पुण्यातील उद्यानं आजपासून पुन्हा बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उद्यानांची जबाबदारी असलेल्या कर्मचार्यांची कमी उपलब्धता यामुळे पुण्यातील उद्यानं पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी महापालिकेने लॉकडाऊनमधुन सुट देत शहरातील 33 उद्यानं सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या उद्यानांमधे लोकांची गर्दी दिसू लागली होती. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये नवीन कंटेनमेंट झोन तयार झालेत.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला नव्हता. तब्बल तीन महिन्यांनी इंग्रजी विषयाचा पेपर विद्यार्थ्यांनी दिला. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना थर्मल तपासणी आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यासाठी म्हणून दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आले होते. विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या आवारात आल्यावर त्यांची थर्मल तपासणी करून सॅनिटायझर देऊन आत सोडले जात होते.कोरोनाची परिस्थिती ध्यानात घेऊन परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.परीक्षा केंद्रात देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालकही परीक्षा केंद्रावर आले होते.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 70 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 31 स्त्रिया आणि 39 पुरूष रुग्णांचा समावेश आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या 3106  वर पोहोचली असून यापैकी 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 1231 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, कणकवली, मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 766 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.
एबीपी माझाच्या बातमीनंतर बुधवारी संध्याकळी सीएसएमटी स्टेशनवर मार्किंग करुन प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेऊन उभं करण्यात आलं. मंगळवारी दिवसभर जो घोळ झाला होता, तो सुधारण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केला. कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर नाही, पाससाठी रांगा लावल्या जात आहेत, मर्यादित तिकीट खिडक्या उघड्या आहेत, हे मुद्दे एबीपी माझाने उपस्थित केले होते. त्यानंतर रेल्वेला जाग आली आणि बुधवारी मार्किंग करुन, जास्त तिकीट खिडक्या उघडून प्रवाशांना उभं केलं.
एबीपी माझाच्या बातमीनंतर बुधवारी संध्याकळी सीएसएमटी स्टेशनवर मार्किंग करुन प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेऊन उभं करण्यात आलं. मंगळवारी दिवसभर जो घोळ झाला होता, तो सुधारण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केला. कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर नाही, पाससाठी रांगा लावल्या जात आहेत, मर्यादित तिकीट खिडक्या उघड्या आहेत, हे मुद्दे एबीपी माझाने उपस्थित केले होते. त्यानंतर रेल्वेला जाग आली आणि बुधवारी मार्किंग करुन, जास्त तिकीट खिडक्या उघडून प्रवाशांना उभं केलं.
हिंगोली जिल्ह्यात आणखी चार जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहेत. कतार या देशातून औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे आलेल्या 26 वर्षीय व्यक्तीसह अन्य तीन जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 233 झाली असून 200 पेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 33 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तात्पुरता सदस्य म्हणून आठव्यांदा निवड झाली आहे. भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली आहेत.

Corona Update | राज्यात आज 3307 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, आज एकूण 114 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, आज 1315 रुग्ण कोरोनामुक्त तर आजपर्यंत एकूण 59,166 रुग्णांची कोरोनावर मात
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण
भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात सुरु असलेल्या सलून दुकानावर भंडारा नगरपरिषदद्वारे 5 हजार रूपयाची दंडात्मक कारवाई करत असताना संतापलेल्या सलून दुकानदार प्रमोद केसलकर याने अंगावर पेट्रोल घेत केला आत्महनाचा प्रयत्न. पोलिसांनी कारवाई करत सलून दुकानदारास अटक केली. भंडारा पोलीस स्टेशनमध्ये सलून दुकानदारांनी गर्दी केल्याने तणाव वाढला.
पंतप्रधानांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रभावी सादरीकरण. मुख्यमंत्र्यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसेच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत, परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे अशा काही मागण्याही केल्या.
भारत-चीन बॉर्डर वर इतके जवान दगडाने मारून शहीद झाले यावर विश्वास नाही, बॉर्डर वर नक्की काय झालं हे समजलं पाहिजे, याबद्दल लोकांच्या मनात शंका, भारतीय सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणार, राजकारण सोडून आम्ही सगळे एक आहोत असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. कोरोनामुळं सरकारच्या घटक पक्षात मनमोकळी चर्चा होत नाहीये हे खरं, मुख्यमंत्री, काँग्रेसच्या नेत्यांना भेटतील, सर्व प्रश्न सुटतील, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडल्यानं काँग्रेस नेत्यांना वेळ देता आला नसेल, सरकारमध्ये तिन्ही पक्षांचं वर्चस्व, सरकार स्थिर राहणार असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
भारत-चीन बॉर्डर वर इतके जवान दगडाने मारून शहीद झाले यावर विश्वास नाही, बॉर्डर वर नक्की काय झालं हे समजलं पाहिजे, याबद्दल लोकांच्या मनात शंका, भारतीय सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणार, राजकारण सोडून आम्ही सगळे एक आहोत असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. कोरोनामुळं सरकारच्या घटक पक्षात मनमोकळी चर्चा होत नाहीये हे खरं, मुख्यमंत्री, काँग्रेसच्या नेत्यांना भेटतील, सर्व प्रश्न सुटतील, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडल्यानं काँग्रेस नेत्यांना वेळ देता आला नसेल, सरकारमध्ये तिन्ही पक्षांचं वर्चस्व, सरकार स्थिर राहणार असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 13 सप्टेंबर 2020 रोजी तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 ला, तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 होणार 1 नोव्हेंबर 2020 रोजी, एमपीएससीकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर
नाशिक : 15 वर्षाच्या मुलीने मित्रासाठी चोरले नातेवाईकांचे सहा लाख 59 हजारांचे दागिने, मित्राला मोबाईल आणि गाडी घेण्यासाठी होती पैशांची गरज, एका बारशाच्या कार्यक्रमात दागिने केले लंपास, गुन्हा दाखल होताच दोन तासात मुंबई नाका पोलिसांनी नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत तिचा 20 वर्षीय मित्राला अटक, त्याच्याकडून 6 लाख 40 हजारांचा मुद्देमालही केला हस्तगत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फेज 2 आणि ठाण्यातील कोविड रुग्णलाचे इ-लोकार्पण करण्यात आले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव आणि मुंबई व ठाणे महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झाले लोकार्पण.

मुंबईतील बिकेसी फेज 2 कोविड रुग्णालयामुळे अधिकच्या एक हजार रुग्णखाटा उपलब्ध होतील. यात 108 ICU खाटा तर 20 डायलिसिस आणि 500 ऑक्सिजन खाटांचा समावेश आहे.


निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या रत्नागिरीतील मंडणगड आणि दापोली तालुक्यांमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज मंडणगड येथे दाखल झाले. रमेश कुमार गणता यांच्या नेतृत्वात हे पथक जिल्ह्यात पाहणी करणार आहे. आज मंडणगड येथे आगमन झाल्यावर मंडणगड येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पावर पॉइंट द्वारे सादरीकरणात जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. मोठ्या प्रमाणावर घरांचे झालेले नुकसान सोबतच फळबागांचे नुकसान आणि वीज पुरवठा याबाबत विविध विषयांवर यावेळी पथकाने माहिती घेतली.
पंढरपूर : राज्यातील वारकरी संप्रदाय व विठ्ठल भक्तांना आषाढीला खुशखबर, मंदिर समितीने वारकऱ्यांसाठी मोबाईल वर केली विठुरायाच्यादर्शनाची सोय, विठ्ठलाचे चोवीस तास लाईव्ह दर्शन
उदगीर तालुक्यातील दावणगावजवळ अनोळखी व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आलाय. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दावणगाव आणि कुमदाळ हद्दीवर झुडपांमध्ये एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह सकाळी आढळून आला आहे. घटनास्थळावर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा व्यक्ती कोण याची माहिती पोलीस घेत आहेत. या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्य केलाय.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील माजी सभापती डी.ओ. पाटील यांची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. आज सकाळी ही घटना उघड झाली. या घटनेने संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत पोलीस आता या खुनातील कारणांचा आणि खुन्याचा शोध घेत आहेत.
अकोल्यात आढळले 9 नवे रूग्ण, जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 1082 वर, आतापर्यंत एकूण 56 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू. तर 676 रूग्ण आतापर्यंत झालेत कोरोनामुक्त. सध्या 350 रूग्णांवर उपचार सुरू.
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. काल दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं सकाळी काही वेळासाठी उसंत घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नदी, ओहळ यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. शिवाय, धबधबे देखील आता प्रवाहित झाल्याचं दिसून येत आहे. काल संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 147 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर रत्नागिरी , लांजा, राजापूर, खेड आणि चिपळूण येथे पावसाचा जोर पाहायाला मिळाला.
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्याची कर्तबगारी दाखविली. त्या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मुर्ती होत्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी अभिवादन केले आहे.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि लोककल्याणकारी राज्य स्थापनेची प्रेरणा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्याकडून मिळाली. त्या मातृत्वाची मुर्ती होत्या पण तितक्याच करारी कर्तृत्वान होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना शौर्य, धैर्य आणि नेतृत्व गुणांचे धडे दिले. यामुळेच परकियांच्या जुलमी राजवटी उलथून गेल्या. रयतेतील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण त्यांनी दिली. स्वराज्यात धर्मा इतकाच त्यांचा स्री रक्षण-सक्षमीकरणाबाबत कटाक्ष होता. त्यांच्या नजरेतील स्वराज्य व सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहू या. हेच विश्ववंद्य जिजाऊ माँ साहेब यांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि त्यांना मानाचा मुजरा.
नागपूर - रात्रभरात आणखी 7 नवीन करोना बधितांची भर, आजपर्यंतच्या कोरोना वाढीत रुग्णांची एकूण संख्या 1084 वर, तर 660 रुग्ण बरे होऊन घरी परतले
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार पार, आज सकाळी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 96 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 3028 इतकी आहे तर यापैकी 1658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी 165 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1207 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अमरावतीत आज सकाळी 7 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 375 वर गेली आहे. तर आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात आज दिवसभरात 18 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून तर चौघांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत शहरातील 1672 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 143 जणांचा मृत्यू
झाला आहे.
समाधानकारक बाब म्हणजे आज 47 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 872 जण कोरोनामुक्त

उर्वरित 657 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Live Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2701 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1,13,445आहे. तर दिवसभरात 81 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या शिवाय पूर्वीच्या 1328 मृत्यूची आज नोंद करण्यात आली आहे. तर आज 1802 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यातील एकूण मृतांचा आकडा वाढला, 4128 मृतांची नोंद होती, त्यात आता मुंबई महापालिका क्षेत्रात 862 तर इतर जिल्ह्यांत 466 मृत्यूंची नोंद, काल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आरोप केला होता त्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण

कोरोनाबाधितांवर मोफत उपचार मागणाऱ्या याचिकाकर्त्याला हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड, जनहित याचिका 'विवेकशून्य' असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून ताशेरे, राज्य सरकारच्या उपाययोजना योग्य असल्याचं स्पष्ट करत सागर जांधळे यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली
सहा जिल्ह्यात झालेल्या सिरो सर्व्हेचा निष्कर्ष, राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प
कोल्हापूर : पोलीस मुख्यालयात जलद कृतीदलात सेवेत असणाऱ्या पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, निलेश पडवळ असं गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव
राज्यपाल नियुक्त राष्ट्रवादीच्या कोट्यातील चार जागांपैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना देण्यात आली आहे. राजू शेट्टी यांची आज शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट झाली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधान परिषदेवर जागा देण्याचा शब्द दिला होता.
तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वासुदेव शंकर गवस यांच्या अंगणात हत्ती आला.आता हत्ती अंगणात येत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती प्रश्नासंदर्भात हत्ती पकड मोहीम राबवावी की हत्ती साठी अभयारण्य करावं यामध्येच नेते मंडळी अडकली आहे. तर वनविभाग हत्ती प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याच चित्र दिसत आहे. मात्र सध्या तरी केर, मोर्ले, हेवाळे, भेकुर्ली गावातील लोक हत्ती अंगणात येत असल्याने भीतीच्या छायेखाली आहेत.
सोलापुरातील प्रमुख उद्योगांपैकी असलेलं विडी उद्योग हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. सोलापुरातील काही विडी कारखान्यांमधून आज कामगारांना तेंदूपत्ता आणि तंबाखू तसेच विडी साठी लागणारे कच्चे साहित्य देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 80 ते 85 दिवस विडी कारखाने बंद होते. राज्यात अनलॉक सुरु झाल्यानंतर विडी उद्योग सुरु करण्याचे आदेश देखील सोलापूरचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले होते. मात्र या आदेशातील अटींमुळे कारखानदार, कामगार आणि प्रशासन यांच्यात काही काळ वाद सुरु होता. मात्र आयुक्तांनी आदेश काढत सुरुवातीच्या आदेशाती काही अटी शिथील केल्या. कामगारांची काळजी घेत विडी कारखाने सुरु करण्यात येत आहेत.
राज्यात मागासवर्गींयावर होणारे अत्याचार तात्काळ थांबवा अशी मागणी करत तसेच अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सोलापुरात युवा भीम सेना या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. मागासवर्गीय बांधवाच्या तक्रारी पोलिसांनी तात्काळ नोंदवून घ्याव्यात. दलित वस्तींवर पोलिसांनी गस्त घाली अशी मागणी देखील यावेळी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
कोकणातील प्रमुख घाटांपैकी एक दुवा मानला जाणारा घाट रस्ता म्हणजे भुईबावडा. मात्र संबंधित विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने या घाट रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. घाटात कधीही धोकादायक दरडी कोसळण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग घाटमार्गाच्या देखभाल दुरूस्ती करण्याऐवजी पडलेल्या दरडी हटविण्यातच धन्यता मानत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन घाटमाथ्यावर जाणारे मार्ग भुईबावडा, करुळ, आंबोली व फोंडाघाट यापैकी भुईबावडा व करुळ हे दोन घाटमार्ग पावसाळ्यात ‘डेंजरझोन’ बनतात. विशेषतः भुईबावडा घाट तर पावसाळ्यात वाहतूकीस धोकादायक बनतो. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारे महत्वपूर्ण घाटमार्ग म्हणून भुईबावडा, करुळ मार्गाची ओळख आहे. पावसाळा सुरू झाला की, भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याच्या मालिका सुरू होतात. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत अनेकदा घाट रस्त्यांवर मोठमोठया दरडी, दगड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले. त्यामुळे कोकणाला जोडणारे हे दोन्ही घाटमार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक वाटू लागले आहेत.
जळगाव :रावेर - यावल विधानसभा मतदार संघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय 67) यांचे आज दुपारी 12.30 वा. मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी 12.30 च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
येवला : 4 कोरोना बाधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता पर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून
येवल्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या पोहचली 67 वर पोहोचली आहे. कोरोनावर 47 जणांनी मात करत केली आहे. तर सध्या 14 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोलापूरात रोटरी क्लब तर्फे शासकीय रुग्णालयास रोबोट भेट देण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटात काम करताना रुग्णांच्या थेट संपर्कात आल्याने अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णांशी कमी संपर्क ठेवून त्यांच्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी रोबोट मदत करेल. या रोबोच्या साहयाने रुग्णांना औषध, जेवण आणि इतर साहित्य पूरवता येईल. सोबतच रोबोट असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंगद्वारे डॉक्टर रुग्णांशी बोलू देखील शकतील. आमदार प्रणिती शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या उपस्थितीत हे रोबो शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
सोलापूरात रोटरी क्लब तर्फे शासकीय रुग्णालयास रोबोट भेट देण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटात काम करताना रुग्णांच्या थेट संपर्कात आल्याने अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णांशी कमी संपर्क ठेवून त्यांच्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी रोबोट मदत करेल. या रोबोच्या साहयाने रुग्णांना औषध, जेवण आणि इतर साहित्य पूरवता येईल. सोबतच रोबोट असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंगद्वारे डॉक्टर रुग्णांशी बोलू देखील शकतील. आमदार प्रणिती शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या उपस्थितीत हे रोबो शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचं मुंबई इथे उपचारादरम्यान निधन
निसर्ग चक्रीवादळामुळे खूप नुकसान झालेलं आहे. बागा मोडून पडल्या आहेत. भविष्याच्या दृष्टीने रायगड उभं करावं लागेल. समुद्रकिनारी असलेल्या 62 गावांत सायक्लोन शेल्टर उभं राहिलं पाहिजे, यासाठी केंद्राकडून मदत अपेक्षित आहे, असं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या.
निसर्ग चक्रीवादळामुळे खूप नुकसान झालेलं आहे. बागा मोडून पडल्या आहेत. भविष्याच्या दृष्टीने रायगड उभं करावं लागेल. समुद्रकिनारी असलेल्या 62 गावांत सायक्लोन शेल्टर उभं राहिलं पाहिजे, यासाठी केंद्राकडून मदत अपेक्षित आहे, असं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या.
निसर्ग चक्रीवादळामुळे खूप नुकसान झालेलं आहे. बागा मोडून पडल्या आहेत. भविष्याच्या दृष्टीने रायगड उभं करावं लागेल. समुद्रकिनारी असलेल्या 62 गावांत सायक्लोन शेल्टर उभं राहिलं पाहिजे, यासाठी केंद्राकडून मदत अपेक्षित आहे, असं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या.
निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा आज रायगड दौरा आहे. प्रत्येक झाडानुसार मदत मिळावी, एनडीआरएफचे निकष बदलावे, एकूण नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची केंद्रीय पथकाकडे पाहणीआधीच केली.
तळकोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या तासाभरापासून गडगडाटासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग, देवगड, वैभववाडीत मुसळधार पाऊस सुरु असून येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 67.65 मी मी पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात 669 मी. मी. पाऊस झाला आहे. तर गेल्या 24 तासांत सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 125 मी मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी आहे. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव आणि हिरंगे गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या गावातील दारूविक्री बंद केली असून ती टिकवून ठेवण्यासाठी महिला सातत्याने प्रयत्न करीत आहे. पण काहीच अंतरावर असलेल्या कुलभट्टी या गावी अनेक जण दारू गाळून त्याची विक्री करतात. त्यामुळे या दोन्ही गावातील पुरुष दारू पिण्यासाठी कुलभट्टी या गावी येतात. परिणामी हे गाव दोन्ही गावासाठी डोकेदुखी बनले आहे. येथून दारू पिऊन मुरूमगावला परत येताना आतापर्यंत अनेकांचे दुचाकीने अपघात झाले आहे. हा प्रकार थांबण्यासाठी मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी कुलभट्टी येथे दारूविक्रेत्यांविरोधात बाजा बाजाओ आंदोलन छेडले आहे.
कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता 50 ते 52 कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्याची वेळ कोकण रेल्वेवर आली आहे. कोकण रेल्वेच्या सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील कर्मचारी 9 जून रोजी कामानिमित्त रोहा, कोलाड येथे आला होता. त्याचवेळी रत्नागिरी येथील देखील काही कर्मचारी तेथे गेले होते. दरम्यान, हा कर्मचारी मुंबई येथे परत गेल्यानंतर 13 जून रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर वेगानं पावलं उचलत कोकण रेल्वेनं त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी तयार करत त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सर्वांना आता रत्नागिरी येथे क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले असून त्यांचे स्वॅब देखील तपासणीकरता घेतले जाणार आहेत.
धुळे जिल्ह्यात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात धुळे शहरातील 65 वर्षीय महिला, तसेच शिरपूर येथील 67 वर्षीय महिला, एक 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 42 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 422 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 247 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात 30 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या रुग्णालयात 133 रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव धुळे शहरात आहे. धुळे शहरात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 230 आहे. तर धुळे शहरात आतापर्यंत 19 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात धुळे शहरातील 65 वर्षीय महिला, तसेच शिरपूर येथील 67 वर्षीय महिला, एक 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 42 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 422 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 247 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात 30 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या रुग्णालयात 133 रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव धुळे शहरात आहे. धुळे शहरात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 230 आहे. तर धुळे शहरात आतापर्यंत 19 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय पथक रायगडमध्ये दाखल झालं आहे. आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेलं केंद्रीय पथक रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा करणार आहेत. आज अलिबाग, चौल, श्रीवर्धन भागाची पाहणी करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले तर सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 602 मिमी पाऊस पडला असून जिल्ह्यातील नदी, ओहोळ प्रवाहित झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे माडखोल धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. जिल्ह्यात पावसामुळे सर्वच धबधबे प्रवाहीत झाले आहेत. शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीला आधुनिकीकतेची जोड देत शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे.
मुंबईची लोकल ट्रेन सुरु झाली पण तिकिटसाठी भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे रांगा लावताना कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्स पाळलं जात नाही. स्थानकांवरही तशी काही व्यवस्था केलेली नाही. कर्मचारी मोठ्या प्रमाणात असल्याने तिकिटासाठी गर्दी झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 93  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून त्यामध्ये 54 पुरूष आणि 39 महिला रुग्णांचा समावेश आहे.  
एकूण रुग्ण संख्या 2918 वर पोहोचली असून यापैकी 1549 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 158 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता एकूण 1211 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात 83 पॉझिटिव्ह आणि 8 मृत्यूंची नोंद झाली.
यासह रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित 2068 रुग्ण आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1305 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 634 बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर 129 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नागपुरात इतवारी इथल्या चुना ओळी परिसरात प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाला सकाळी पाच वाजता आगीची माहिती देणारा कॉल मिळाला होता. दाटीवाटीचा आणि अरुंद परिसर असल्याने अग्निशमन दलाला आगीच्या ठिकाणी पोहोचायला बराच वेळ लागला.
कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता 50 ते 52 कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्याची वेळ कोकण रेल्वेवर आली आहे. कोकण रेल्वेच्या सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील कर्मचारी 9 जून रोजी कामानिमित्त रोहा, कोलाड येथे आला होता. त्याचवेळी रत्नागिरी येथील देखील काही कर्मचारी तेथे गेले होते. दरम्यान, हा कर्मचारी मुंबई येथे परत गेल्यानंतर 13 जून रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर वेगानं पावलं उचलत कोकण रेल्वेनं त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी तयार करत त्यांना क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सर्वांना आता रत्नागिरी येथे क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले असून त्यांचे स्वॅब देखील तपासणीकरता घेतले जाणार आहेत. त्यामुळे या साऱ्यांचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट काय येतात हे देखील पाहावं लागणार आहे. पण, यावेळी कोकण रेल्वेकडून काळजी घेण्यामध्ये काही कमी राहिली का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
नंदुरबार : नंदुरबार शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत आजपासून चार दिवस शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेच. शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. यासंदर्भातील सर्व आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
इंदापूर : इंदापुरात कोरोनाचा संसर्ग वाढला एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी इंदापूर शहरातील कसबा रामवेस नाका परिसरात आढळून आलेल्या 38 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 व्यक्तींमधील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इंदापूर शहरात खळबळ उडाली आहे.
इंदापूर शहरात रविवारी दिनांक 14 रोजी 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नऊ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इंदापूरकरांच्या चिंता वाढल्या आहेत.

इंदापूर तालुक्यात कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या 17 वर पोहोचलेली असून यात चार जण बरे झाले आहेत. तर अकरा जणांवर उपचार सुरु असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

पार्श्वभूमी

राज्यातील कोरोनाची परिस्थिती
राज्यात बुधवारी (17 जून) 3307 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.68 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1315 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 59 हजार 166 झाली आहे. सध्या राज्यात 51 हजार 921 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात 114 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. यासह आतापर्यंत 5651 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 77, मीरा भाईंदर 1, जळगाव 7, नंदूरबार 2, मालेगाव 2, पुणे 3, पुणे मनपा 18, पिंपरी चिंचवड 1, लातूर 2, यवतमाळमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.


पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
परत लॉकडाऊन लावणार ही अफवा आहे. आता आपण फक्त अनलॉकिंगविषयी बोलणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले. काही राज्यांत प्रादुर्भाव आहे. गर्दी, लोकसंख्या, वाहतूक यामुळे आपल्यासमोरचे आव्हान मोठ आहे. तरीही प्रशासनाने प्रयत्न केल्याने, कोविड योद्ध्यांमुळे आणि लोकांच्या सहकार्याने संक्रमणातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होते आहे. आयसीयूचा कमी वापर करावा लागतोय. जनतेने विषाणूच्या गुणाकाराला रोखले आहे. उपचार, प्रशिक्षित मनुष्यबळ, साधन सामुग्रीची इतर देशांशी तुलना केली तर आपण चांगल्या परिस्थितीत आहोत, असं पंतप्रधानांनी सांगितलं.


गेल्या दोन अडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असताना आम्ही मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करुन अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


निषेध करताना चीनचा उल्लेखही का नाही, राहुल गांधींचा संरक्षणमंत्र्यांना सवाल
जवानांना श्रद्धांजली वाहताना संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यात चीनचा उल्लेखही का नाही, असा प्रश्न काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झालेत. या घटनेवर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या रुपानं तब्बल 36 तासानंतर पहिली सरकारी प्रतिक्रिया आली. त्यावर राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. राजनाथ सिंह यांनी जवानांना श्रद्धांजली वाहणारं जे ट्विट केलं आहे, त्यात चीनचा उल्लेखही नसणं हा जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जर खरोखर इतक्या वेदना झाल्या असतील तर अशी सुरुवात करुन राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात त्यांचा पुढचा प्रश्न आहे की जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन दिवस का लागले? जवान शहीद होत असतानाही राजकीय सभा का सुरु ठेवल्या जातायत?


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.