सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. आगामी तीन दिवसांनंतर प्रचार संपणार असल्यामुळे नेते मंडळी दिवसरात्र एक करून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. एमआयएम या पक्षानेही विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी या पक्षाकडून पूर्ण ताकदीने प्रचार केला जातोय. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीने ओवैसीदेखील प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या महाराष्ट्रात हजारोंच्या सभा होत आहेत. दरम्यान, त्यांच्या सोलापुरातील एका सभेची सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे. भर सभेत ते मंचावरून आय लव्ह यू म्हणाले आहेत.
सभेत नेमकं काय घडलं?
एमआयएम या पक्षाने सोलापूर मध्य या मतदारसंघात फारूक शाब्दी यांना तिकीट दिलं आहे. त्यांच्या प्रचारासाठीच ओवैसी यांची या भागात एक जाहीर सभा बोलवण्यात आली होती. या सभेत ओवैसी जोरदार भाषण करत होते. मात्र अचानकपणे त्यांना एक लेटर मिळालं. खरं म्हणजे सोलापूर पोलिसांनी त्यांना एक नोटीस दिली होती. याच नोटिशीवर असदुद्दीन ओवैसी बोलत होते.
त्या कागदात काय आहे, हे सांगतो...
याच नोटिशीबाबत नंतर ओवैसी यांनी भाषण करताना सविस्तरपणे सांगितलं. मी मंचावर बसलो होतो. बसलेला असतानाच कोणीतरी माला एक कागद दिला. त्या कागदात काय आहे, हे सांगतो. खूप मजेदार लिहिलेलं आहे यात. मला जेलरोड पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कलम 168 बी एनएसएस नुसार नोटीस दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.
त्यांनी मला लव्ह लेटर दिलंय...
तसेच, त्यांनी मला लव्ह लेटर दिलं आहे. माझ्या सासऱ्यांकडून ही नोटीस आली आहे. दे जावयावर फार प्रेम करतात. ते आमचे सासरे आणि भाऊपण आहेत. आय लव्ह यू. त्यांचे फक्त माझ्यावर प्रेम आहे, दुसऱ्यांवर प्रेम नाही, असे ओवैसी मिश्किलपणे म्हणाले. दरम्यान, ओवैसी यांच्या या मिश्किल टिप्पणीमुळे सभेत एकच हशा पिकला.
हेही वाचा :
भर सभेतच ओवैसींना सोलापूर पोलिसांची नोटीस, औवैसींनीही फोटो काढला अन् इंग्रजीतील नोटीस मागवली