दापोली: आदित्य ठाकरे यांनी दापोलीत गुरुवारी घेतलेल्या सभेनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) तुमची औकाद आहे का? दिशा सालियन (Disha Salian Case) नावाची मुलगी होती, तिच्यावर बलात्कार झाला, तिला इमारतीवरुन ढकलून देण्यात आले. त्या प्रकरणात तुझं नाव होतं. तुला मी आज सांगतो, पुन्हा सत्ता आल्यावर या सगळ्या प्रकरणांची चौकशी नाही लावली तर मी माझं नाव रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणून लावणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आदित्य ठाकरे तू रात्री 12 ला बाहेर पडतो, सकाळी 5 वाजता घरी येतो गुपचूप, याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राला कळू दे. अरे आपली औकाद बघून बोलायचे असते. शिवसेना पक्ष आम्ही वाढवलाय, केसेस अंगावर आम्ही घेतल्या, जेलमध्ये आम्ही गेलो. तुमचं पक्षासाठी योगदान काय? तुम्ही आयत्या बिळावर नागोबा बसलेत. कोणावर काय बोलताय, याचं भान ठेवा, असे रामदास कदम यांनी म्हटले. रामदास कदम यांच्या जहरी टीकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेतील बंडावेळी रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यामुळे या दोघांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे गटाने दापोलीतील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी दापोलीत सभा घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम आणि उदय सामंत यांच्यावर आगपाखड केली होती. मी लहानपणापासून अनेकांना काका म्हणत होतो, पण त्यांनीच गद्दारी केली. तुम्हाला परत गुंडा फुंडांचे सरकार आणायचा आहे का? यांची गुंडगिरी एकाधिकारशाही संपवा. मी सभेसाठी मुद्दाम अशी काही ठिकाणे निवडली आहेत. मी फक्त तुम्हाला सांगतोय तुमच्यावर कोणी दादागिरी करत असेल कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर थांबा काळजी करू नका. आपलं सरकार येतंय त्यांना बर्फाच्या लादीवर झोपण्याची जबाबदारी ही माझी असेल असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता.
आणखी वाचा