एक्स्प्लोर

एसटीच्या एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार! एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याचा फटका बसणार आहे.

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या होत्या. मात्र 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यानं तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची, एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता पुढील आदेश मिळेपर्यंत एसटीची सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. मात्र यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परवड होऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वीच फेब्रुवारी महिन्यात जेवढा पगार कर्मचाऱ्यांना दिलाय त्याच धर्तीवर मार्च महिन्याचा पगार देण्यात यावा असे आदेश एसटी प्रशासनाने निर्गमित केले होते. मात्र 31 मार्च रोजीच्या एसटीच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी यांच्या इमेल आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत अदा न करण्याबाबतचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. या आदेशामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काल, 31 मार्च रोजी एसटीच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी यांनी जारी केलेल्या इमेल आदेशात नमूद करण्यात आलंय की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून विधिमंडळाचे सर्व सदस्य, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या माहे मार्च महिन्याच्या वेतनात ठराविक कपात करून वेतन देण्यात येणार असल्याबद्दल निर्णय झालेला आहे. #Markaz | निजामुद्दीन 'मरकज'साठी गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावं : गृहमंत्री अनिल देशमुख या निर्णयाच्या धर्तीवर राज्य परिवहन कर्मचारी व अधिकाऱ्यांचे दिनांक 1 एप्रिल 2020चे अनुसूचित वेतन मध्यवर्ती कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये, असे या आदेश या सूचनेत नमूद करण्यात आले आहेत. या सूचनावजा आदेशात राज्य परिवहन कर्मचारी आणि अधिकारी असा शब्द असल्यानं हा आदेश राज्य परिवहन म्हणजे आरटीओ विभागासाठी तर नव्हे ना? असा देखील संभ्रम आहे. 'राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी' असा शब्द नसल्यानं एसटीच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय राज्य सरकार एकीकडे दावा करतंय की कोणाचेही वेतन थांबवले जाणार नाही. कामगार सचिव ,कामगार आयुक्त यांनी देखील कामगारांचे वेतन कपात करू नये, असे आदेश दिलेले असतांना या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे. वेतन कपात अथवा दोन टप्प्यात देण्याविषयी एसटी महामंडळाला हा नियम लागू होतो का? हे तर महामंडळ आहे? अशी चर्चा देखील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
देवेंद्र फडणवीस सगळ्यात अपयशी गृहमंत्री, कायदा सुव्यवस्था कोसळून पडलीय, राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल 
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget