LIVE UPDATE | पालघर साधू हत्याकांड प्रकरणी 54 जणांना जमीन मंजूर

राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी 15 जानेवारीपासून नियम बदलणार! क्रीडा जगतासाठी अतिशय दुःखद बातमी! महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Nov 2020 08:55 AM
देशाला हादरवून सोडणाऱ्या गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणातील 54 आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर ठाणे विशेष न्यायालयाने या आरोपींचा जामीन मंजूर केला असून आतापर्यंत या प्रकरणात 68 आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे. 16 एप्रिल 2020 रोजी टाळेबंदी काळात चोर समजून महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवर गडचिंचले येथे दोन साधू आणि एक त्यांचा चालक अशा तिघांची जमावाकडून चोर समुजन पोलिसांच्या समक्ष निर्घृण हत्या करण्यात आली होती.
मेघराज राजेभोसले यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पदावरून हकालपट्टी. संचालकांनी अविश्वास ठराव मंजूर करून प्रभारी अध्यक्षांची निवड केली आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसला, मी कोणालाही सोडणार नाही. या विरोधात कोर्टात धाव घेऊन मी पुन्हा पदावर बसणार. सुशांत शेलार हे सगळ्या कटाच्या मागे आहेत, त्यांना अध्यक्ष व्हायचं आहे : मेघराज राजेभोसले. उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
काही कलाकृती या कालातीत असतात. या कलाकृतींचा कितीही आस्वाद घेतला तरी रंजनाची भूक शमत नाही. अशा कलाकृतींच्या यादीतील 'नटसम्राट' या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट उद्या शुक्रवार 27 नोव्हेंबरपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे.

कोरोनामुळे गेले कित्येक महिने बंद असलेली चित्रपटगृहे अनलॉकअंतर्गत पुन्हा सुरु झाली आहेत. पुन्हा एकदा चित्रपटांचे दिमाखदार पोस्टर चित्रपटगृहांबाहेर झळकताना दिसू लागले आहेत. हळूहळू का होईना प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडे वळताहेत. अशावेळी या रसिकप्रिय चित्रपटांचे प्रदर्शन म्हणजे सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्स यांना नवचैतन्य देण्याचा प्रयत्न ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर. यावर्षीच्या पुरस्कारासाठी ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे यांची निवड. पाच लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने आज जाहीर केला पुरस्कार. हा पुरस्कार संत साहित्य संदर्भात लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार दिला जातो.
बीड-औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बायपासला भीषण अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू, तर 3 जण जखमी, लातूरहून औरंगाबादला जाणारी आय-20 कारने लेन क्रॉस करून औरंगाबादकडून येणाऱ्या टँकरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या झालेल्या भीषण अपघातातमध्ये कारमधील 2 जण जागीच मृत झाले असून अन्य तीन जण गंभीररित्या जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मृतांचे नाव अद्याप समजू शकली नाहीत
गेवराई शहरापासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या बायपास जवळ कारचा भीषण अपघात झाला. अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या चार पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतात लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा समावेश आहे. सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी असून ते लातूरहून बीड मार्ग औरंगाबादकडे जात होते. कारचालकाचा ताबा सुटल्याने कार ऑइल टँकरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही किंवा राजीनामा देणार नाही. अचानक माझ्या पाठीत खंजीर खुपसला, पण मला पर्वा नाही. माझ्या राजीनाम्याची केलेली मागणी घटनेत कुठंही बसत नाही. गरज पडल्यास कोर्टात देखील जाण्याची माझी तयारी आहे. आगामी निवडणुकीत सर्व जागा जिंकवून यांना त्यांची जागा दाखवून देऊ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इनस्टीट्युटला भेट देणार. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलंय. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इनस्टीट्यूटला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील लाहेरी -भामरागड मार्गावरील हिंदेवादा जवळ नक्षल्यानी एसटी महामंडळाची बस अडवली. झाडे तोडून मार्ग केला बंद, तोडलेल्या झाडांवर लावले नक्षल बॅनर. बॅनरमध्ये मोदी सरकारच्या हिंदू राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाचा विरोध करून 26 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय बंदला यशस्वी करण्याचा आवाहन, मोदी सरकाच्या देशविरोधी उद्देशाचा विरोध करून करून पुतळ्याला जाळण्याचे आवाहन देखील केलं आहे. या मार्गावर झाडे तोडल्याने या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली असून पोलीस जवान मार्ग मोकळा करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी टिकास्त्र सोडलंय. "आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का? अनिल परब आणि माझा प्रवास सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय करतं हे मला चागलं माहित आहे. जाऊन केबल वाल्यांना विचारुन घ्या, मग कळेल." असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केलाय. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेला सुपारी घेऊन काम करणारा पक्ष आहे. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देताना बाळा नांदगावकर यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकात भाजप सोबत युती करायची की नाही याचा अधिकार पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आहे. पक्षप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. सध्या एकला चलो रे अशी आमची भूमिका असल्याचे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं. ते सोलापुरात बोलत होते. वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेतर्फे सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
हिंगोली : येथील शासकिय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे वैद्यकिय देयक तयार करून सदर देयक कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतांना रुग्णालयातील लिपीक विनायक देशपांडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रुग्णालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं 60 व्या वर्षी निधन
"9 सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही.

तिघांमधील वादामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचं माथेरं झालंय. एमएसईबीच्याबाबतीत देखील मराठा समाजाची निराशा केली
.
अलौकीक पद्धतीने राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देणं गरजेचं होतं.

या सरकारने मराठा समाजाला गृहीत धरलं आहे. समाजात मोठा आक्रोश निर्माण होईल

. मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी जर मान्य केलं तर या आंदोलनाचे नेतृत्व भाजप करेल.

राज्य सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडू." ; असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनानं निधन झांल. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहिर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की, त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. 43 वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतःच्या सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली : राज ठाकरे



मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. मुंबई बाहेरून आल्यामुळे कोविड - 19 च्या नियमावलीनुसार ते क्वॉरंटाईन झाले आहेत. त्यांनी ED ला विनंती केली आहे की, विहंग सरनाईक यांच्या पत्नी हायपर टेन्शनमुळे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्या आहेत. त्यामुळे विहंग पत्नीसोबत ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत. त्यामळे पुढच्या आठवड्यात विहंग आणि मला एकत्र चौकशीसाठी बोलवावे अशी विनंती ED च्या अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज प्रताप सरनाईक यांचे मेहुणे विनंती पत्र घेऊन ED कार्यालयात जाणार आहेत. ED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंबीय संपूर्ण सहकार्य करणार, सरनाईक यांनी ED अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.
शिर्डी : इंदोरीकर महाराज वादगस्त वक्तव्य प्रकरणावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 2 डिसेंबरला होणार आहे. आज दोन्ही बाजुंनी युक्तिवाद केला जाणार होता, मात्र सरकारी वकिलांनी घेतलीय अचानक खटल्यातून माघार घेतल्याने 2 डिसेंबरला होणार आहे. आता पुढील सुनावणीपूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करण्याची मागणी अंनिसच्या रंजना गवांदे यांनी केली आहे.
अहमदनगर : पाथर्डीत पुन्हा बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसंगावधान दाखवून आजोबाच्या प्रतिकारामुळे मुलगा या हल्ल्यातून वाचवला. पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील धीरज बाळू गर्जे (वय-9 वर्षे) या मुलावर पहाटे साडेपाच वाजता बिबट्याने हल्ला केला. त्याचे आजोबा कारभारी गर्जे यांनी काठीने बिबट्याला प्रतिकार केला म्हणुन धीरजचा प्राण वाचला.
पुणे : नाट्यप्रयोगांना पुण्यातून सुरुवात होणार आहे. 12 डिसेंबर-13 डिसेंबरला पुण्यात एका लग्नाची पुढची गोष्टचे तीन प्रयोग होणार आहेत. पहिला प्रयोग यशवंतराव चव्हाण, कोथरूड येथे होणार असून 13चा दुसरा प्रयोग दुपार, बालगंधर्व आणि 13 ला रात्री चिंचवड येथे दोन दिवसांत तीन प्रयोग होतील. या नाटकात प्रशांत दामले, कविता लाड यांची मुख्य भूमिका आहे.
औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीस वस्तू अथवा कुठलाही माल विकला तर व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे . पहिल्या वेळेस विना मास्क व्यक्तीला वस्तू विक्री केल्यास 500 रुपये दंड. दुसऱ्या वेळी नियमांचं पालन केले नाही तर 7 दिवस दुकान बंद, आणि तिसऱ्या वेळी नियम मोडल्यास महिनाभर दुकान बंद केलं जाईल. या शिवाय मंगल कार्यालयाने नियमांचं पालन केले नाही तर मंगल कार्यालयही महिनाभर बंद करणार असल्याची माहिती औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे. यासाठी 70 लोकांचे पथकही तयार केले आहेत.आस्तिककुमार पांडेय यांच्याशी बातचीत केली आहे.
वीज बिल न भरल्याने महावितरणने तोडलेली वीज कनेक्शन वंचित बहुजन आघाडीतर्फे जोडण्यात आली आहेत. सोलापुरातील सफाई कामगार वसाहतीतील जवळपास 40 घरांचे कनेक्शन लॉकडाउनच्या काळात तोडण्यात आले होते. थकीत वीज बिलमुळे महावितरणतर्फे ही कारवाई करण्यात आली होती. महावितरणने काही घरांचे मीटर देखील नेले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करत या घरांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले. कोरोनाच्या काळात अनेकांचे व्यवसाय, उद्योग बंद होते. सफाई कामगार वसाहत ही श्रमिकांची वसाहत आहे. त्यांच्याकडे जगण्यासाठी पैसे नसताना हजारोंची बिले कशी भरणार? असे असताना देखील महावितरणने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्याचा विरोध म्हणून मीटर नसलं तरी आम्ही वीज कनेक्शन जोडू असे म्हणत वंचित बहुजन आघाडीने वीज कनेक्शन जोडले आहेत.
21 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले.. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान राज्यातील जयपूर येथून त्यांना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते..
भारत सरकारने 42 मोबाईल अॅप्सवर घातली बंदी, सार्वभैमत्वाला आणि एकतेला धोका असल्याची दिली माहिती
21 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले.. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान राज्यातील जयपूर येथून त्यांना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते..
ससुराल सिमर का, कुछ रंग प्यार के ऐसे भी, रिमिक्स आधी मालिकांमध्ये झळकलेले अभिनेते आशीष रॉय यांचं नुकतंच राहत्या घरी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते.

आशीष रॉय यांनी अनेक मालिकांतून काम केली आहेत. पण हा लॉकडाऊन त्यांच्यासाठी फार बरा नव्हता. अनेक कलाकारांप्रमाणे त्यांनाही आर्थिक अडचणींना समाोरं जावं लागलं होतं. किडनीच्या विकारामुळे त्यांना डायलिसीसवर करावं लागत होतं. या लॉकडाऊन काळात त्यांनी साठवलेले दोन लाख रुपयेही वैद्यकीय खर्चासाठी संपले असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

आशीष यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीने आणखी एक कलाकार गमावला आहे. सिंटाच्या अधिकृत सुत्रांनीही याला दुजोरा दिला आहे.
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर, आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय होणार,

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरा व्यतिरिक्त राज्य सरकार प्रति क्विंटल 700 रुपये बोनस देणार,

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना राज्यातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची भेट
प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना, ईडी कार्यालयात नेऊन विहंग यांची चौकशी करण्याची शक्यता
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा,
पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक पोहोचलं
बीड विभागातील 31 कर्मचाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून निषेध, एसटी महामंडळाने केलेली कारवाई चुकीची असल्याची संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची एबीपी माझाला माहिती, मुंबईत बेस्ट सेवेसाठी आल्यानंतर कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधा मिळत असल्याचा संघटनेचा आरोप, बीड विभागातील 120 कर्मचारी कोव्हिडं पॉझिटिव्ह निघाले याची जबाबदारी कोण घेणार? महामंडळाकडून 50 लाखांच्या विम्याची केवळ घोषणा मात्र लाभ तुलनेने खूपच कमी, कर्मचाऱ्यांवरील कारवाई तात्काळ मागे घ्या अन्यथा आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा
मनसे पदाधिकारी कार्यकर्त्याना पोलिसांच्या नोटीस, मनसेचे आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न, वीज बिल दरवाढी विरोधातील आंदोलनात सहभागी झाल्यास गुन्हा दाखल होणार, 26 तारखेला प्रत्यक्ष आंदोलन केले अथवा हस्तकांच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी झाला तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा, भाजपच्याही केवळ पाच सदस्यांना आंदोलनाची परवानगी दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सीन तयार केलं जातंय. त्या वॅक्सीन निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असुन विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी काल एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत या दौर्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता आहे.
ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचा अहवाल उद्या मुख्यमंत्र्यांना सादर करणार. ओबीसी समाजासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली होती. या मागणीवरून राज्य सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीती गठीत केली होती. या उपसमितीचा अहवाल उद्या मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि इतर ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. उद्या सायंकाळी सात वाजता हा अहवाल वर्षा वर मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे.
पालघर : 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद, वसई विरार महानगरपालिका, पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद क्षेत्र तलासरी, विक्रमगड, मोखाडा, वाडा नगरपंचायत क्षेत्र व बोईसर औद्योगिक क्षेत्र भागात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहतील, जिल्हाधिकारी पालघर यांची अधिकृत घोषणा.
“ "ती पहाट नव्हती, अंधकारच होता”, त्या अंधकारामध्ये सत्येची प्रकाशकिरणं परत कधीच दिसणार नाहीत"; पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांची खरमरीत टीका
मुंबईत ड्रग तस्कराचा एनसीबीच्या पथकावर हल्ला, अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एक जण जखमी, गोरेगावमधील कारवाईदरम्यानची घटना, तिघे अटकेत
वीज बिल सवलतीवरुन मंत्रिमंडळात समन्वयाचा अभाव, मंत्र्यांकडूनच सवलतीची घोषणा, त्यानंतर वीज बिल भरण्याचं आवाहन, वाढीव वीज बिलांवरून राज्यातील जनतेत सरकार विरोधात असंतोष : देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारचं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे सपशेल दुर्लक्षं; दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी आमच्या सरकारनं प्रयत्न केले, भाजप काळात मंजूर टेंडरला सध्याचं सरकार शीतपेटीत ठेवतंय : देवेंद्र फडणवीस
राज्यात 'लव जिहाद' नव्हे, तर कोरोना मुख्य संकट : संजय राऊत
भाजपचं आंदोलन कोरोना रोखण्यासाठी की वाढवण्यासाठी? विविध मुद्द्यांवर आंदोलन करणाऱ्या भाजपवर संजय राऊतांचं टीकास्त्र
जागतिक स्तरावर कच्चं तेल स्वस्त झालंय; इंधन दर कमी का होत नाहीत?; संजय राऊत यांचा सवाल
वाढीव वीज बिलांविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील : संजय राऊत
लव जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात बनवू, बिहारमध्ये भाजप सरकार काय कायदा बनवतं ते पाहणार : संजय राऊत
सोलापूर : जवळपास 8 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग आज पासून सुरु होतील. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आज सकाळपासूनच शाळेत हजर झाले आहेत. आधी निर्जंतुकीकरण आणि इतर व्यवस्था केल्यानंतर आज पुन्हा एकदा वर्गांची साफसफाई करण्यात आली. तयारी पूर्ण झाल्यानंतर आता शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे.
औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या सगळ्याच शाळा आज सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. कारण 17 टक्के शिक्षकांचीच नाही तर काही शिक्षकांची कोरोना टेस्टचा रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंत शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा आजपासून सुरु होण्याची शक्यता नाही. गेल्या तीन दिवसांपासून शिक्षकांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. अनेक शाळेतील शिक्षकांचे अद्यापही रिपोर्ट आले नसल्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत शाळेत बोलवले नाही.
आजपासून राज्यभरातील शाळा सुरु होणार आहेत. अशातच शाळा सुरु करण्याचा निर्णय पूर्णपणे स्थानिक प्रशासनावर अवलंबून असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक यांसारख्या अनेक शहरांनी शाळा आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं


क्रीडा जगतासाठी अतिशय दुःखद बातमी! महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट होऊ दे, असंही अजित पवारांनी विठुरायाला साकडे घातले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते.


आषाढी राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे , कोरोनाची लस लवकर उपलब्ध होऊन जगाची यातून सुटका कर असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातले . आज पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी कवडूजी भोईर व कुसुमाबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते.


लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी 15 जानेवारीपासून नियम बदलणार!


देशातील कोणत्याही मोबाईलवर 15 जानेवारीपासून लँडलाईनवरुन फोन करताना मोबाईल नंबर आधी 0 लावणे अनिवार्य असणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने सांगितलं की, फिक्स टू फिक्स्ड डायलिंग प्लॅन आणि मोबाईल टू मोबाईल कॉलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दूरसंचार विभागाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) प्रस्तावाला मान्यता दिली आहे. 29 मे 2020 रोजी ट्रायने अशा कॉलसाठी नंबर देण्यापूर्वी शून्य लावण्याची शिफारस केली होती. यामुळे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपन्यांना अधिक नंबर तयार करण्याची सुविधा मिळणार आहे.


दूरसंचार विभागाने 20 नोव्हेंबर रोजी एका परिपत्रकाद्वारे सांगितले की, लँडलाईनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याचा मार्ग बदलण्यासाठी ट्रायच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या आहेत. या परिपत्रकानुसार नियम लागू झाल्यानंतर लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी नंबरच्या आधी शून्य डायल करा. दूरसंचार विभागाने सांगितले की मोबाईल नेटवर्क कंपन्यांना लँडलाईनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायलिंग सुविधा द्यावी लागेल. ही सेवा सध्या आपल्या क्षेत्राबाहेरील कॉलसाठी उपलब्ध आहे. विभागाने निश्चित लाईन स्विचमध्ये योग्य ती घोषणा करण्यास सांगितले, जेणेकरुन फिक्स लाईन ग्राहकांना सर्व फोनवर कॉल करण्यासाठी 0 डायल करण्याची गरज आहे.


क्रीडा जगतासाठी अतिशय दुःखद बातमी! महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन


अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अर्जेंटिनाच्या मीडियाने याबाबत माहिती दिली. मॅराडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅराडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. एका स्कॅनमध्ये मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली. यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मॅराडोना यांची कोरोना टेस्ट देखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आली. 1986 मध्ये, त्यांनी अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता.


30 ऑक्टोबरला मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते. त्यांच्या बॉडीगार्डला कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यानंतर गेल्या आठवड्यात मॅराडोना स्वत: आयसोलेशनमध्ये गेले होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.