LIVE UPDATES | अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या कपाशी पिकाच्या शेतात शेतकऱ्याची विजेचा शॉक घेऊन आत्महत्या
निवडणूक आयोजनाच्या धर्तीवर कोरोना लस वितरण प्रणाली विकसित करा, पंतप्रधान मोदींची सूचना IPL 2020, DCvsCSK : दिल्लीची चेन्नईवर 5 विकेट्सनी मात, शिखर धवनची शतकी खेळी विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे कृतीतून उत्तर! अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर राज्यात प्रतिदिन चाचण्या 92 हजाराहून 75 हजारांवर, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना चाचण्या वाढीसाठी पुन्हा पत्र दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
18 Oct 2020 04:40 PM
मालेगाव शहरातील पवारवाडी, ओवाडीनाला परिसरात गुफ्रान शेख नामक केबल ऑपरेटरवर मुद्दसिर नावाच्या हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात केबल ऑपरेटर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पूर्ववैमनस्यातून गुफ्रान शेख याच्यावर गावठी पिस्तुल मधून 3 गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील एक गोळी त्याच्या हाताला लागली.गोळीबार केल्यानंतर मुद्दसिर मात्र फरार झाला.रात्री उशिरा पवारवाडी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवरील सरडेवाडी टोल प्लाझावर टोल फ्री आंदोलनास सुरुवात झाली आहे. अपूर्ण असलेला सर्व्हिस रोड पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. युवा शेतकरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले आहे. आंदोलनच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. शेकडो वाहने टोलवरुन विनामूल्य सोडण्यात येत आहे.
पुण्यातील भिडे पुलावरून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुठा नदीत पडलेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज नदीपात्रात सापडले. दोन दिवसांपूर्वी ओंकार तुपधर आणि सौरभ कांबळे हे भिडे पुलावरून नदीत पडले होते. पावसामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते वाहून गेले होते.
पुण्यातील भिडे पुलावरून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुठा नदीत पडलेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज नदीपात्रात सापडले. दोन दिवसांपूर्वी ओंकार तुपधर आणि सौरभ कांबळे हे भिडे पुलावरून नदीत पडले होते. पावसामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते वाहून गेले होते.
मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, 481 ऐवजी आता धावणार 706 लोकलच्या फेऱ्या, 225 फेऱ्या अतिरिक्त चालवल्या जाणार, यात हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा देखील समावेश, 19 ऑक्टोबर पासून म्हणजेच सोमवार पासून या अतिरिक्त फेऱ्या सेवेत दाखल होणार
जिम व्यवसायिकांना दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परावनगी देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चेत आश्वासन दिलं आहे. तयार करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन तत्वांचे काटेकोरपणे पालण करण्याचं आवाहन.
पुणेकरांसाठी आणखी एक चांगली बातमी आली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांच्या अॅक्टीव रुग्णसंखा तब्बल चार महिन्यांनी दहा हजारांच्या खाली आली आहे. यापूर्वीच रुग्णसंख्येत घट झाल्याने शहरातील 10 कोविड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.
जिम व्यवसायिकांना दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परावनगी देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन.
आज मुख्यमंत्री आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा प्रतिनिधींशी व्हीसीद्वारे झालेल्या चर्चेत आश्वासन.मार्गदर्शन तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचं केलं आवाहन
पुणे : सेल्फी काढण्याचा प्रयत्नात पाय घसरून पडल्याने पुण्यातील बाबा भिडे पुलावरून दोन तरुण नदीपात्रात वाहून गेल्याचा घटना उघडकीस आली आहे.ओंकार तुपधर, वय 17 सौरभ कांबळे वय 20 अशी दोघांची नावे आहेत.काल सायंकाळी 5.35 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अग.काल सायंकाळच्या सुमारास हे तरुण बाबा भिडे पूलावरून वाहून गेले.कालपासून आतापर्यत शोधकार्य सुरू आहे.पण अजूनपर्यंत ही मुलं सापडली नाहीत.यात महापालिका आपत्ती व्यवस्थापन मदत करत नसल्याचा आरोप कुटूंबातील नातेवाईकांनी केला आहे.डेक्कन पासुन मांजरी पर्यत कालपासून शोध सुरु आहे.
जलयुक्त शिवारची चौकशी CAG च्या अहवालानंतर सुरू झाली. मात्र, ED ने सिंचन घोटाळ्याबाबत जी नोटिस दिलीय, त्याबद्दल मी बोलणार नाही. याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने मी बोलणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात भातशेती पंचनामे केले जातात की नाही, हे पाहण्यासाठी आज आमदार वैभव नाईक स्वतः तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ तालुका कृषि अधिकारी रमाकांत कांबळी यांच्या समवेत कुडाळ तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीच्या पंचनाम्याचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भात शेती जमीनदोस्त झाली असून भाताला कोंब फुटले आहेत. मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत आहेत.
लोणार तालुक्यातील बिबी येथील शेतकरी रामकिशन मुंढे यांनी शेतातील सोयाबीन सोंगुन जमा करुन शेतात गंजी (सुडी) लावली होती. शुक्रवारच्या मध्यरात्री सोयाबीन गंजी अचानक जळुन खाक झाल्याचे सकाळी समजले. यामध्ये 27 किंटल सोयाबीन जळुन खाक झाले असून मुंढे यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रामकिशन मुंढे यांनी बिबी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
भिवंडी व शहापूर ग्रामीण भागात होणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना देखील प्रशासन पंचनामा करण्यासाठी येत नसल्याने नक्की दाद मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . गेले चार दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे भिवंडी व शहापूर तालुक्यातील अनेक गावांत भातपिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या पिकांचे त्वरीत पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना अर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावळी बळीराजा प्रशासनाकडे करीत आहे. मात्र आदेश नसल्याने पंचनामे होऊ शकत नाही अशी उत्तरे अधिकारी बळीराजाला देत असल्याने बळीराजावर जणू दुहेरी संकट उभं ठाकलं आहे. अशी अवस्था भिवंडी ,शहापूर ,पडघा, किरवली, अंबाडी, दाभाड इत्यादी गावांची आहे.
आज सकाळी सात वाजल्या पासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करीत आहेत. अजित दादांच्या दौऱ्याच्या पाठोपाठ सुप्रिया सुळेंनेही बारामतीच्या नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरु केलेला आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून ते बारामती तालुक्यातील कर्हावागज यानंतर जळगाव क.प. येथील नुसकान ग्रस्त भागांचा भागाची पाहणी करून ते जेजुरी त्यानंतर पुरंदर, हवेली या भागांची पाहणी करणार आहेत, काल सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध भागांचा दौरा करून दौंड तालुक्यातील ही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती, त्यानंतर आज त्या बारामती पुरंदर आणि हवेली या गावांच्या दौऱ्यावर ती आहेत.
चंद्रपूर शहराजवळील शक्तीनगर वसाहतीतुन एक बिबट जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलय. शक्तीनगर वसाहत ही Western coalfield limited च्या कर्मचाऱ्यांची वसाहत असून या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून एक बिबट येत असल्याची लोकांनी वनविभागाकडे तक्रार केली होती. वसाहतीत फिरत असलेल्या या बिबट्यामुळे कोणाच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून हा बिबट जेरबंद करण्यात आला आहे. जेरबंद करण्यात आलेला बिबट मादा असून त्याचं वय अंदाजे 4 वर्ष आहे. सध्या या बिबट्याला चंद्रपुर च्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात ठेवण्यात आलं आहे.
बुलढाणा : अतिवृष्टीने सोयाबीन पिकांना तडाखा दिल्यानंतर आता काढण्यात आलेल्या सोयाबीन सुड्यांना आग लावून जाळण्याच्या घटना समोर येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या बुलढाणा जिल्हयातील सावळा येथील शेतातील कापून ठेवलेल जवळपास 70 ते 75 क्विंटल सोयाबीनच्या सुडीला अज्ञाताने आग लावून दिली. यात सगळं सोयाबीन नष्ट झालं. या प्रकरणी रविकांत तुपकर यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. आता नुकसानीतून शेतकऱ्यांसाठी लढनारे नेते सुद्धा सुटत नाही या बद्दल शेतकरी संतप्त झाले आहेत.
पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली, 40 घरांमध्ये शिरलं पाणी, पाण्याच्या प्रेशरनं 9 जण जखमी, पाण्याचे लोट थेट नागरिकांच्या घरात,
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीची अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असताना राज्यात हॉटेल्स, बार तसेच मेट्रो सुरू झालेली आहे. परंतु अजूनही मंदिरं बंदच आहेत. हिंदू समाज हा अत्यंत धार्मिक असून हिंदू समाजाला उपासनेतुन संकटांशी दोन हात करण्याची शक्ती मिळते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर तसेच कोंकण प्रांत सह मंत्री व प्रवक्ता श्रीराज नायर यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यासाठी विनंती केली. ही मागणी मान्य न केल्यास भविष्यात विश्व हिंदू परिषदे कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला. नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा गठन आणि स्थगिती उठवण्यात बाबत दाखल याचिकांवर सुनावणी.
सांगली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानची दुर्गामाता दौड यंदा रद्द,
घटस्थापनेपासून दुर्गामाता दौडीस होत असते सुरुवात
मराठा आरक्षणाचे प्रकरण-3 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे लागलेलं आहे,
प्रकरण लार्जर बेंच कडे गेलेलं असताना पुन्हा तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणी लागल्यामुळे गोंधळ,
स्थगिती उठवण्याबाबतचा निर्णय तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ घेऊ शकणार का?
हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे विस्तारित खंडपीठाच्या गठनासाठी लागेल असं वाटत असताना ही घडामोड
त्यातही ज्या नागेश्वर राव यांनी मागच्यावेळी स्थगिती दिली त्यांच्याच खंडपीठाकडे हे प्रकरण लागलं आहे..
भिवंडीत 1 कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, ठाणे अन्न सुरक्षा पथकाची कारवाई, गुजरात येथून दोन ट्रकमधून आणला जात होता गुटखा, 1कोटी 1 लाख 90 हजार रुपयांचा गुटखा आणि 20 लाख रुपयांचे दोन ट्रक जप्त
विधानसभेतील हक्कभंग प्रकरण तसेच सभेतील कामकाज परवानगी नसताना सुप्रीम कोर्टात वापरल्याने विधानसभा अध्यक्षांनी रिपब्लिक चॅनेलच्या संपादकांना नोटीस दिली होती. आपली बाजू मांडण्यासाठी अर्णव गोस्वामी विधानसभा अध्यक्षपुढे हजर राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमान केल्याप्रकरणी अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग मांडण्यात आला होता. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल हक्कभंग केला होता. विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग दाखल करून अर्णव गोस्वामी यांना नोटीस बजावली होती. या नोटीसीला गोस्वामी यांनी उत्तर दिले नव्हते तसेच विधानसभेचे कामकाज परवानगी नसताना सुप्रीम कोर्टात वापरले होते. त्यामुळे अध्यक्षांनी अर्णव गोस्वामी यांना नोटीस पाठवली होती.
बॉलिवुडमधील आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास पोलीस करणार. एनसीबीने तपास केला नाही तर चार ते पाच दिवसात पोलीस तपास सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन तक्रार केली. यापूर्वी सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एनसीबीकडे पाठवली होती. मात्र, एनसीबी याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहेत का? सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत, जर एनसीबीने तपास केला नाही तर पोलीस याचा तपास करतील, असे देशमुख म्हणाले. ड्रग्ज कनेक्शनमधीस संदीप सिंहचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध. तसंच भाजपचे मागील निवडणुकीतील स्टार प्रचारक विवेक ऑबेरॉय यांचे ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्याची सचिन सावंत यांची मागणी आहे. विवेक ऑबेरॉय हे नरेंद्र मोदी बायोपिकचे निर्माते आहेत. बंगलोर पोलीस मुंबईत येऊन विवेक ऑबेरॉयची चौकशी करतात, मग एनसीबी तपास का करत नाही? असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
जलयुक्त शिवार प्रमाणेच मागील पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाच्या चौकशीची गरज. गेल्या पाच वर्षात हायब्रीड अन्यूइटी अंतर्गत झालेले राज्यातील रस्ते खराब झाले आहेत. ठेकेदार पसार झालेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकात पाटलांवर निशाणा. चौकशी बाबत मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मुश्रीफ यांनी मागणी केली आहे.
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी आज देखील विधानसभा अध्यक्षांपुढे हजर राहिले नाही. पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली आहे.
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी आज देखील विधानसभा अध्यक्षांपुढे हजर राहिले नाही. पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रामदेव त्यागी यांचे गुरूवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 1995 -96 या कालावधीत त्यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली. आयपीएस अधिकारी असलेल्या रामदेव त्यागी यांना कॅन्सरने ग्रासले होते. हिंदुजा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते
चार अल्पवयीन बालकांची कुराडीने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावातील शेत शिवारात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बोरखेडा शेत शिवारात भिलाला नावाचं सालदारी करणार कुटुंब राहत आहे. दोन मुलं आणि दोन मुली असलेली चार भावंड घरी ठेऊन भिलाला दाम्पत्य गावाला गेले असता रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने या चार ही जणांची कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या केल्याचं उघड झाले आहे,या हत्येमागील कारणाचा आणि आरोपींचा तपास पोलीस आता करीत आहेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वैभववाडी मार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या करुळ घाट आणि गगनबावडा घाट मोठ्या प्रमाणात खचला आहे. घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गगनबावडा पासून दोन किमी अंतरावर घाटाचा काही भाग दरीत कोसळला आहे. कोसळल्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असल्याने खचण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जात पाहणी केली. याठिकाणी खबरदारी म्हणून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मार्ग बंद करण्यात आल्याने वैभववाडी संभाजी चौक, गगनबावडा या ठिकाणी वाहने थांबवण्यात आली आहे. पावसाने जोर असाच कायम पुढे ठेवल्यास हा घाट मार्ग आणखी खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वैभववाडीतील करुळ घाट रस्ता खचला, या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प असून या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे.
औरंगाबाद वडगाव कोल्हाटी गावात 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, झोपेतून उचलून नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न, पत्र्याच्या शेडमध्ये मुलगी झोपली आपल्या मामा शेजारी झोपली होती. मुलीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आलं आहे., वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू
नागपूर मेट्रोची सेवा आजपासून पुन्हा सुरू, मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाय, सेवा सुरू होण्याच्या पहिला दिवस असल्याने मुख्य स्थानक असलेल्या बर्डीच्या इंटरचेंज स्टेशन वर प्रवाशी संख्या फार कमी, प्रवाशांना प्रोत्साहित करण्यासाठी मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने तिकीटांचे दर अर्धे केले, विशेष म्हणजे लॉकडाउन पूर्वी मेट्रोची एक लाईन सुरू झाली होती, त्यामुळे प्रवाशी वाढत असताना मेट्रोला कोरोनाचा जोरदार फाटका बसला होता..
सांगली : जिल्ह्याला कोरोना आणि पावसाच्या परिस्थितीवर मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी आणि मृत्यूचा आकडा घटला तर दुसरीकडे पाऊस कमी झाल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर स्थिरावली आहे. जिल्ह्यात काल 247 कोरोना रुग्ण आढळले तर केवळ 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नांदेडमधील दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे एकाच दिवशी मृत्यू झाला. एकाने नांदेडमध्ये तर दुसऱ्याने लातूरमध्ये प्राण सोडला. नांदेड तालुक्यातील वडवना गावात हे दोघे भाऊ राहत होते. दोघांनी 35 वर्ष गावात सरपंचपद भूषवले होते. दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिसाला मारल्याच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाला आहे. या प्रकरणी त्यांना 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड झाला. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसकर्मी देखील शिक्षेस पात्र झाला आहे.
नाणार प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी खरेदीतील गैरव्यवहारातील होणार चौकशी. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले निर्देश. नाणार जमीन व्यवहार प्रकरणी आज बैठक बोलवली होती. एक महिन्यात चौकशी करून देणार अहवाल.
औरंगाबाद शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेने तोडफोड केली आहे. मनसेने तोडफोडीचा व्हिडीओ करुन एबीपी माझा पाठवला. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन शिक्षणाची फी सक्तीने वसूल करत होती. जे विद्यार्थी फी भरत नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लिंकही दिली जात नव्हती, असा मनसेचा आरोप आहे. तर दुसरीकडे ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केली आहे त्यांच्यापैकी कोणाचेही पाल्य आमच्या शाळेत शिक्षण घेत नव्हते. शिवाय मनसेने जो आरोप केला आहे तो शाळेने फेटाळून लावला आहे.
औरंगाबाद शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेने तोडफोड केली आहे. मनसेने तोडफोडीचा व्हिडीओ करुन एबीपी माझा पाठवला. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन शिक्षणाची फी सक्तीने वसूल करत होती. जे विद्यार्थी फी भरत नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लिंकही दिली जात नव्हती, असा मनसेचा आरोप आहे. तर दुसरीकडे ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केली आहे त्यांच्यापैकी कोणाचेही पाल्य आमच्या शाळेत शिक्षण घेत नव्हते. शिवाय मनसेने जो आरोप केला आहे तो शाळेने फेटाळून लावला आहे.
पुढील 12 आठवड्यांसाठी टीआरपीला स्थगिती, टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर बार्क संस्थेचा निर्णय, एनबीएकडून BARC च्या निर्णयाचं स्वागत
बिहारपाठोपाठ मध्य प्रदेशातही शिवसेना भाजपच्या समोर उभी ठाकणार आहे. मध्य प्रदेशातील 28 जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार उभे करणार आहे. 3 नोव्हेंबरला हे मतदान होत असून महाराष्ट्रातून शिवसेनेचे काही नेते प्रचाराला जाण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या 27 आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक पार पडत आहे. तसंच एका आमदाराचा मृत्यू झाल्याने त्या जागेवरही पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे हिंदुत्त्ववादी विचारांच्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेसला होणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल. बिहारमध्ये सुमारे 50 जागा लढवत असताना मध्य प्रदेशातही 28 जागा लढवून राज्याबाहेर पक्षाची ताकद वाढवण्याचा शिवसेना नेतृत्त्वाचा प्रयत्न आहे.
नाशिक : लासलगाव बाजार समितीतील कांद्यांचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. आयकर विभागाने लासलगाव परिसरातील 9 कांदा व्यापाऱ्यांवर काल छापे मारल्यामुळे आज एकही व्यापारी लिलावात भाग घेण्यासाठी आले नाही. निर्यात बंदी केल्यानंतर देखील कांद्यांचे भाव वाढत असल्याने आयकर विभागाने छापे मारले आहेत.
कोल्हापुरात मास्कवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रिंट केल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक
,
आदर्श ग्रुप ऑफ पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात लगावली
,समस्त शिवप्रेमींनची माफी मागायला लावली आणि मास्क वाटप बंद केलं
ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, उपसमितीमध्ये छगन भुजबळ, विजय वड्डेटीवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांचा समावेश, ही समिती ओबीसी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार, महाज्योती संस्थेला निधी देण्याबाबतही समिती चर्चा करणार
अकृषी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू होणार
आजपासून सातव वेतन आयोग लागू करण्याचा कॅबिनेटचा निर्णय
जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, एसआयटीमार्फत चौकशी होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती, जलयुक्त शिवार योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम योजना होती, कॅगने या योजनेवर ताशेरे ओढले होते, त्या अनुषंगाने चौकशी होणार
नैसर्गिक आपत्तीमुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 14 आणि 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टी आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने ऑनलाईन परीक्षा देताना नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना येत आहे. यामुळे या दोन दिवसांच्या परीक्षा अनुक्रमे 19 आणि 20 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होतील, असं विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
ग्रंथालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा आदेश; मेट्रो देखील 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीआधी मास्कच्या किमतीवर नियंत्रण आणण्याबाबत चर्चा झाली. पण असा निर्णय घायला नकार. त्यामुळे समितीच्या अहवालानंतरही राज्यात मास्कच्या किमतीवर नियंत्रण येणार नाही.
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर अपघात, तीन प्रवासी कारमध्ये अडकले. खोपोली एक्झिटजवळ टँकरची कारला धडक. कारमधील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश.
नंदुरबार : घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. कट्टर खडसे समर्थक असलेल्या माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी दावा केला आहे. माजी आमदार यांनी खडसे यांच्या आदेशानेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सांगली : महापालिकेने उभारलेले कोविड हॉस्पिटल आजपासून बंद करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा आयुक्त नितीन कापडणीस यांनी निर्णय घेतला आहे. हॉस्पिटल बंद केले असले तरी रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने उभारलेल्या हॉस्पिटलचे स्ट्रक्चर तसेच ठेवले जाणार आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 56 दिवसांत 648 रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
मुंबईच्या महापौरांचं महापालिकेतील अधिकाऱ्यांविरोधातच आंदोलन, महापौर दालनातच किशोरी पेडणेकर यांचा ठिय्या, प्रभाग समितीच्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे महापौर नाराज
अहमदनगर : जामखेड तालुक्यातील चौंडी येथील सीना नदी पात्रात काका पुतण्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
दोघेही मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेले असताना पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली तर आज सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आले. तुषार गुलाबराव सोनवणे वय 22 वर्ष आणि सतीश बुवाजी सोनवणे वय 43 वर्ष अशी मृतांची नावं आहेत.
मुंबईत लोकल ट्रेन बंद असल्याने बेस्टवर अतिरिक्त ताण पडलेला आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्यभरातून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा मदत घेतली जात आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना इथे प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती आहे. एसटीच्या सांगली विभागातून 50 गाड्यांसह सुमारे 200 कर्मचाऱ्यांचा ताफा मुंबईच्या सांताक्रूझ बेस्ट डेपोत दाखल झाला आहे. मात्र राहायला निवारा नाही, झोपायची सोय नाही, पुरेसं अन्न नाही अशा अवस्थेत यांना इथे काम करावं लागत आहे. एकतर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये बस चालवण्याची सवय नाही, त्यात या हालअपेष्टा ज्यामुळे काम करण्याची मानसिकताच राहिलेली नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही ते दाद देत नाहीत. त्यामुळे एकतर तातडीने सर्व कर्मचाऱ्यांची योग्य ती सोय करा नाहीतर परत जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत या एसटी कर्मचाऱ्यांनी सांताक्रुझ डेपोत कामबंद आंदोलन सुरु केलं आहे.
नंदुरबार : साक्री रस्त्यावर नांदरखेडा फाट्याजवळ वाळू वाहतूक करणारा डंपर घरात घुसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघातानंतर वाहन चालक फरार आहे. नंदुरबार तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद : मुंबईत कांही काळ वीज गेल्यामुळे काल गोंधळ उडला. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. पण राजाच्या आनेक भागांत विज जाण्याचे प्रसंग घडतात. त्याची दखलही कोणी घेत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी, भूम, कळंब तालुक्यांतील काही शहरे आणि कांही गावात आज चौथा दिवस झाला वीज गायब आहे. 25 हजार लोकसंख्येचा वाशी शहरात चार दिवसापासून वीज बंद आहे. कळंब शहरातही हीच अवस्था आहे. भूम शहर ते पार्डी गाव ह्या दरम्यानच्या लाईनमध्ये दोन दिवसापासून बिघाड झाल्यापासून ही वाहिनी बंद आहे. कळंब शहरातही दोन दिवस नव्हती ग्रामीण भागात सध्या नाही. 24 तास झाले वीज गुल आहे. एकुण चार उपकेंद्र अंतर्गत असलेल्या 40 गाणे आणि पारा आणि वाशी गावातील वीज बंद आहे.
सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून आज पहाटेपासूनच संततधार सुरु आहे. गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण शहरात सलग पाऊस पडत आहे.
पार्श्वभूमी
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
NEET 2020 Result : नीट परीक्षेचा रिझल्ट आज, कसा आणि कुठे पाहाल निकाल
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल आज 16 ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्वीट करत देखील माहिती दिली होती. 12 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टानं कोविड -19 किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असं म्हटलं होतं. तसंच या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला घोषित करावा असंही कोर्टानं म्हटलं होतं.
विखुरलेल्या मराठ्यांनो राजकीयदृष्ट्याही एकत्र या : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर कोल्हापूरमध्ये गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकल मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मराठा समाज हा प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये विखुरला आहे. त्या मराठा समाजाने राजकीयदृष्ट्या देखील एकत्र यावे अशी इच्छा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी त्या बैठकीमध्ये बोलून दाखवली आहे.
"आजच्या घडीला आपला मराठा समाज विखुरलेला आहे. थोडे काँग्रेसमध्ये, थोडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, थोडे शिवसेनेत आणि थोडे भाजपमध्ये देखील आहेत. मराठ्यांनी आपले नेतृत्त्व सिद्ध केलं पाहिजे. मराठा हा सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. आपल्या सगळ्या बंधूंवर आपलं लक्ष पाहिजे, कुणावर अन्याय होता कामा नये. मात्र असं असताना आपल्यावर देखील अन्याय करुन घेऊ नये हे देखील पाहा. आरामात बसून आपल्याला काहीही मिळणार नाही. आपापल्यात वाद होतील अशी वक्तव्य कुणी करु नका," असंही शाहू महाराज म्हणाले.
प्रकृतीबाबतच्या चर्चा सुरु असताना अमित शाह बिहारच्या रणधुमाळीत सक्रीय होणार, 12 जाहीर सभांना संबोधित करण्याची शक्यता
अमित शाहांची प्रकृती हा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात कुजबुजीनं चर्चिला जाणारा विषय. पण याबाबतच्या सगळ्या शंका कुशंकांना मागे टाकत अमित शाह भाजपच्या मिशन बिहारसाठी स्वत: मैदानात उतरणार आहेत. बिहारमध्ये 243 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. त्यासाठी अमित शाह यांच्या किमान 12 रॅली होणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. यातल्या काही रॅली व्हर्चअुल असतील, पण किमान 9 रॅली ते प्रत्यक्षपणे संबोधित करतील असं सांगितलं जातंय.
पंतप्रधान मोदी यांच्याही 12 रॅलीज बिहारच्या रणधुमाळीत होणार आहेत. त्यांच्या पहिल्या सभेची तारीख अद्याप अंतिम झालेली नाही. पण 22 किंवा 23 ऑक्टोबरला पंतप्रधानांची पहिली जाहीर सभा होऊ शकते. बिहारमधल्या आरामधून ते भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करतील. जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यासोबतची ही संयुक्त सभा असेल. कोरोनाच्या संकटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांचा सार्वजनिक वावर कमी झालेला आहे. पण बिहारच्या निवडणुकीत जनतेशी संवाद साधण्यासाठी अनेक पक्षांचे नेते व्हर्चुअल रॅलीपेक्षा थेट संबोधनावरच भर देण्याची शक्यता आहे. त्यात अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत अनेक चर्चा सुरु असल्यानं त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती या रणधुमाळीत किती दिसतेय हे पाहणंही महत्वाचं असेल.