LIVE UPDATES | मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ

एकही काळा कपडा नको, कर्नाटक सरकारची बेळगावात दमदाटी, तर महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून काम करणार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि मुश्रीफांमध्ये वाग्युद्ध साताऱ्यातील दोन 'राजें'मधला संघर्ष मिटला! खासदार उदयनराजे-रामराजे नाईक निंबाळकरांची खास भेट! बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराजांचं निधन, आज पोहरागड येथे अंत्यसंस्कार RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर पाच गडी राखून पराभव दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Nov 2020 07:45 PM
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये पुन्हा एकदा करण्यात आली वाढ. आजपासून 2020 फेऱ्या सुरू केल्यानंतर, उद्यापासून त्यात आणखीन वाढ करून 2773 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 552 तर पश्चिम रेल्वेवर 201 फेर्यांची वाढ करण्यात आली. असे करून रेल्वे आता राज्य सरकारवर लवकर निर्णय घ्यायचा दबाव टाकत आहे. रेल्वेने दिलेल्या अभिप्राय वर राज्य सरकारने लवकरात लवकर उत्तर द्यावे असेही रेल्वेने सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारचा टायर फुटल्याची घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणगाव ते अमळनेर रस्त्यावर घडली. कारचा टायर फुटल्यानंतर कार चालकाने वेगावर नियंत्रण मिळवल्याने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. खडसे या अपघातातून बालंबाल बचावले.
लष्करामध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून शारीरिक चाचणी घेतली होती. फेब्रुवारीत चाचणी घेतल्यानंतर आज वानवडीच्या एआयपीटीच्या मैदानावर लेखी परीक्षा घेतली. या प्रकरणात राजस्थानच्या एजंटसह लष्करातील एका लीपीकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेला आलेल्या 30 उमेदवारांकडून 3 ते 4 लाख घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बनावट भरती रॅकेटमधील इतर संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गप्पू गुप्ता यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केले असताना आता राष्ट्रवादी कांग्रेसला गळती सुरू झाली असून राष्ट्रवादीचे उच्च पदाधिकारी असलेल्या 48 लोकांनी काँगेस मध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांच्या बाल किल्यात गळती सुरू झाली आहे,यात आजी माजी ग्राम पंचायत सदस्य .जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील समावेश आहे
पुण्यातील गड-किल्ल्यांवर जाण्यास आणि गिर्यारोहण, ट्रेकिंग करण्यास पुणे प्रशासकीय यंत्रणेने परवानगी दिली आहे. अटी व शर्ती नियम लागू करून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही परवानगी दिलीय.

अटी शर्ती

एका ग्रुपमध्ये पंधरा गिर्यारोहकांपेक्षा जास्त नसावेत.

ट्रेकिंग करताना प्रत्येक ट्रेकर्ससाठी मास्क बंधनकारक.

ट्रेकिंग करताना सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक

दहा वर्षाच्या आतील तसेच 65 वर्षाच्या वरील व्यक्तींना ट्रेकिंग करता येणार नाही.

ताप सर्दी खोकला असल्यास ट्रेकिंगला जाता येणार नाही

स्थानिकांच्या घरात भोजन करता येणार नाही व मुक्काम करता येणार नाही.

ट्रेकिंगच्या कालावधीत एकमेकाचा वस्तू वापरता येणार नाहीत.

अशा विविध अटी व शर्ती लागू करून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रेकर्ससाठी ट्रॅकिंग करण्यासाठी सर्व गड-किल्ले खुली केली आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गप्पू गुप्ता यांनी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गोंदियात गळती सुरू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील 48 आजी माजी राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी पदावर असलेल्या लोकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँगेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रफुल पटेलांचा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गळती सुरू झाली असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे, तर राष्ट्रवादी पक्षाला गळती सुरू झाल्याने स्वतः प्रफुल पटेल आता जिल्हाभर दौरे करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लष्करामध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून शारीरिक चाचणी घेतली होती. फेब्रुवारीत चाचणी घेतल्यानंतर आज वानवडीच्या एआयपीटीच्या मैदानावर लेखी परीक्षा घेतली. या प्रकरणात राजस्थानच्या एजंटसह लष्करातील एका लीपीकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेला आलेल्या 30 उमेदवारांकडून 3 ते 4 लाख घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बनावट भरती रॅकेटमधील इतर संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे.
वाशिम: बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज अनंतात विलीन, भाविकांनी आपलं छत्र हरविल्याची भावना व्यक्त केली
पुणे - आंबेगाव येथे असलेल्या कचरा डेपोला आग लागली. अग्निशमन दलाच्या 5 फायरगाड्या व टँकर घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
पुणे : वेल्हे तालुक्यातील दापोडे येथील हॉटेलचालक तरुणावर सकाळी साडेआठच्या सुमारास गोळीबार, या हल्ल्यामध्ये विलास नथू बोरगे
जखमी , एका दुचाकीवरुन तीन जण गोळीबार करून गेल्याची माहिती , जखमी तरुणाचे मुळ गाव वेल्हे तालुक्यातील करंजावणे, हल्लेखोर कुसगाव खिंड मार्गे खेड शिवापुरकडे पसार
मंत्रोचाराच्या घोषात बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरु आणि डॉ. रामराव महाराज अंत्यसंस्कार विधी सुरू, मात्र अंत्यसंस्कारासाठीच्या ओट्यावर प्रचंड गर्दी झाली
कणकवली पटवर्धन चौकातील बाणे ब्रदर्स यांचे तंबाखू आणि किराणा दुकानाला भीषण आग लागली. आगीची झळ आजूबाजूच्या दुकानानाही बसली. नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
पालघरमध्ये पुन्हा एकदा गडचिंचले हत्याकांडाची पुनरावृत्ती  पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली आहे . पालघर मधील विक्रमगड तलवाडा येथे संशयास्पद फिरणाऱ्या एका इसमाला गावकऱ्यांनी घेरलं होतं  .  सदर माहिती मिळताच पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अधिकारीया ठिकाणी दाखल झाले असून त्यांनी घेराव घातलेल्या इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू  केली .  तपासाअंती सदर इसम हा मुंबईतून फरार आरोपी असल्याची माहिती समोर आली .  या आरोपीने हैदराबाद येथील एका सोने व्यापाराला 1किलो बनावट सोने देऊन 39 लाखांचा गंडा घातला होता  . मात्र अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तो फरार होऊन विक्रमगड मधील जंगलाचा आश्रय घेत होता .  त्याला गावकऱ्यांनी घेरल्या नंतर  या ठिकाणी तातडीने पोलिस प्रशासन दाखल झालं .यामुळे गडचिंचले येथे झालेल्या हत्याकांडाचे पुनरावृत्ती होता होता टळली आहे . 
कर्नाटकातील पहिला निषेध बेनकनहळ्ळीतून,

काळ्या दिनी गावागावात होतोय निषेध-केंद्राचा भाषावार प्रांतरचनेचा धिक्कार
LIVE UPDATES : वाशिम : बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक भाविक आपल्या दैवताला भावपूर्व निरोप देण्यासाठी पायी प्रवास करत त्यांच्या मूळ गावी पोहरादेवी इथे अंत्यसंस्कारासाठी पोहचत आहे.
सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे शहरातील उद्यान पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 7 या दोन तासात उद्याने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय 10 वर्षाखालील मुलांना आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात प्रवेश देण्यात येणार नाही..
बेळगाव काळा दिन, बेळगाव इथल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात निषेधाचा कार्यक्रम घ्यायला कर्नाटक पोलिसांची मनाई, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र यायला मनाई, शिवसेना कार्यालया बाहेर कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त, कार्यकर्त्यांनी एकत्र येवू नये - कानडी पोलिसांचा दम
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जवळ आज संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी रिश्टर स्केल वर 3.2 एवढ्या क्षमतेचा भूकंप नोंदवला गेला आहे. तर मध्यप्रदेशमधील सिवनी जवळ 6 वाजून 16 मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का नोंदवला गेला आहे. हा दुसरा धक्का रिष्टर स्केल वर 3.5 एवढ्या क्षमतेचा होता. विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वीच (27 ऑक्टोबरला) सिवनी जवळ 3.3 क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.
बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज याचं पार्थिव वाशीम जिल्ह्यातील मूळगावी पोहचलय. बापूंच अखेरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
ऊस दराच्या संदर्भातील पहिली बैठक निष्फळ

तोडणी, ओढणी प्रमाणे एफआयआरमध्ये 14 टक्के वाढीची स्वाभिमानीची मागणी

स्वाभिमानीच्या मागणीला साखर कारखानदार यांनी नकार दर्शवला

स्वाभिमानीचे नेते बैठकीतून बाहेर पडले
वर्धा : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आज सेवाग्राम येथे कॉंग्रेसच राज्यव्यापी आंदोलनाला सुरूवात झाली आहे. आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार , नितीन राऊत , यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील , महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांची उपस्थिती आहेत..
सांगलीत काँगेस भवनसमोर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन सुरू. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, काँगेसचे युवा नेते विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी
शिवसेनेचं हिंदुत्व राजकीय नाही : संजय राऊत
आजही शिवसेना आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडते : संजय राऊत
पुण्यातून शिवसेना खासदार संजय राऊत लाईव्ह
वसई : वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने वसईतील 'गो ग्रीन' टीम ने आज वसईच्या सुरुची बाग या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली आहे. वसईतील 'गो ग्रीन' टीम ने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचा आज 25 वा दिवस आहे. रोज सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत ही मोहीम राबवल्या जात आहे. आज सकाळी वसई विरार नालासोपारा च्या कानाकोपऱ्यातून 50 च्या वर तरुणांनी एकत्र येऊन सुरुची बाग हा बीच पूर्ण क्लीन केला आहे. मागच्या 25 दिवसात तब्बल सहा हजार किलो कचरा जमा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन ठिकाणी टोळक्यांनी हैदोस घातला. पहिली घटना पिंपरी पोलिसांच्या हद्दीतील नेहरूनगरमध्ये घडली आहे. तिथं वीस-पंचवीस वाहनांवर आलेल्या टोळक्याने सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. तर दुसरी घटना ही वाकड पोलिसांच्या हद्दीतील रहाटणीत घडली. एकमेकांना मारहाण केली आणि त्यानंतर एकाने टोळक्यासह समोरच्या तरुणाच्या घरावर दगडफेक करत त्याच्याच वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी आठ अटकेत आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता राज्यातील मुदत संपत असलेल्या जवळपास 65 नगरपंचायतींवर जर प्रशासक नेमण्यात आले तर यामध्ये गावपातळीवर आरोग्य विषयक उपाययोजना राबविताना अडचणी निर्माण होतील अशा परिस्थितीत या मुदत संपत असलेल्या नगरपंचायत,नगरपरिषदांचा तीन महिन्यांचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे
पाचवं शक्तीपीठ असलेल्या खान्देशची कुलस्वामिनी धुळे शहरातील एकविरा देवीच्या मंदिरात यंदा कोरोनामुळे कोजागिरीचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. देवीला 56 भोग चा नैवेद्य दाखवण्यात आला. मंदिर बंद असल्यानं भाविकांनी दुरूनच दर्शन चा लाभ घेतला .कोजागिरी निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती .
पत्नीवर वाईट नजर ठेवून अश्लील संवाद साधणाऱ्या मित्राची पतीकडून मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या. सोनेगाव शिवारात दोन दिवसापूर्वी आढळला होता अनोळखी इसमाचा मृतदेह. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून दोघा मारेकऱ्यांना अटक. सुधीर जवादे याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत अश्लील संवाद साधल्याने संतापलेल्या सुधीर जवादेन निखिल ढोबळेच्या मदतीन अविनाशची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलं आहे.
अरुणाचल प्रदेश येथे सिमेवर कर्तव्य बजावत असताना मालेगावच्या चिखलहोळ येथील जवान मनोराज सोनवणे यांचे निधन. सोनवणे हे 21 पॅराट्प स्पेशल फोर्समध्ये होते. थंड वातावरण आणि अती उंचीच्या प्रदेशांमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांची तब्येत बिघडल्यानंतर दहा दिवसांपासून त्यांच्यावर कोलकता कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात होते. उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले.
शिवसेना पक्षाकडून विधान परिषदेवर जाण्याबाबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी होकार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या बैठक

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर बैठकीचा निर्णय

उद्या शासकीय विश्रामगृह इथं सायंकाळी सहा वाजता होणार बैठक

ऊस परिषदेत आधीच सुरू झालेले काही कारखाने, थकवलेली रक्कम यावर होणार चर्चा
भेंडी बाजारात फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे अवमाजनक पोस्टर्स चिटकवल्या प्रकरणी रझा आकादमीवर बंदी घाला. शिवसेनेने फ्रान्समधल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतांना भेंडी बाजारातला हा प्रकार निंदनीय आहे, असं मत भाजप आमदार अतुल भातखळकर मांडलं आहे.
सीमा भागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू!असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.


बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे असेही जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.
राज्यातील शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सुचना देणारा दि. 29 ऑक्टोबर 2020 चा शासन निर्णय संदिग्ध व अनाकलनीय आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील अशा सूचना शासन निर्णयात दिलेल्या असून 1 नोव्हेंबर पासून शाळा उघडणार का असा प्रश्न राज्यातील शैक्षणिक संस्था व मुख्याध्यापकांना पडला आहे. व्हॅक्सीन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय उघडू नये अशी मागणी पालकांकडून होत असतांना 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतरांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करणारा शासन निर्णय तातडीने मागे घ्या अशी मागणी आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने केली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षक शिक्षकेतरांना प्रवेश देण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, हँडवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, सहा फुट अंतर ठेवणे, 3 ते 4 तासानंतर सॅनिटायझेशन करणे, शाळेत प्रवेश करतांना थरमल स्कॅनरने तापमान तपासणे, अध्यापन साहित्य, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर या उपकरणांचे 70 टक्के अल्कोहल वाईफने निर्जंतुकीकरण इत्यादी बाबींचा समावेश केला आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी शैक्षणिक संस्थाना किमान 25 हजार ते 1 लाखापर्यंत खर्च येणार आहे. त्याची कोणतीही आर्थिक मदत शासनाने जाहीर केलेली नाही. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांची परवानगी न घेता शाळा सुरु करणे म्हणजे लहान मुलांच्या आयुष्याशी खेळ केल्यासारखे होईल. शासनाने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना व्हॅक्सीन दिल्याशिवाय बोलावू नये. अशी मागणी केली आहे.
सिंधुदुर्गातील आंबोली मधील नांगरतासवाडी येथे रात्री नाचणीच्या शेतीची राखण करणाऱ्या दोघा शेतकऱ्यांचा टस्कराने पाठलाग केला. प्रसंगावधान राखत दोघेही धावत जाऊन बाजूच्या मांगरात लपल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आक्रमक झालेल्या टस्कराने रात्रभर परिसरात घिरट्या घातल्या. त्यामुळे नांगरतास परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रथमेश गावडे व दादू गावडे या दोन शेतकऱ्यांची तस्कर हत्तीने पाठलाग केली. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात हत्तीचा वावर नव्हता. मात्र अचानक आंबोलीत ऐन भातकापणी व नाचणी काढणीच्या वेळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करायला किंवा शेताची राखण करायला भीती वाटत असल्याने वनविभागाने लवकरात लवकर हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आज होणारी मराठा आरक्षण परिषद अचानक रद्द, खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून बैठक रद्द करण्यात आल्याचा निरोप आमंत्रितांना देण्यात आला, दुपारी दोन वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमधे ही आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.
एसटी कामगारांचे वेतन अन्य देणी देण्यासाठी एसटी महामंडळाने २ हजार कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे कांही आगार बस स्थानक तारण ठेवली जाणार आहेत
जर मुंबईकर मास्क घालत नसतील आणि त्याबद्दल दंड म्हणून 200 रुपयेही भरत नसतील तर आता मुंबईतील रस्ते साफ करावे लागतील. अंधेरी पश्चिम विभागात ही संकल्पना राबवली जातेय. अंधेरी पश्चिम येथील फेरीवाल्यांनी मास्क घातले नव्हते, त्यांना शिक्षा म्हणून अंधेरीतील रस्ते त्यांच्याकडून साफ करुन घेतले गेले.
कांदा कोंडी सोडविण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न. केंद्र सरकारचा व्यापाऱ्यांना अंशतः दिलासा. खरेदी केलेला कांदा, विक्रीसाठी 3 दिवसांची मुदत. पॅकेजिंग आणि कांदा ट्रान्सपोर्टसाठी दिला 3 दिवसांचा अवधी. केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यावसायिकाच्या गाडीला लावलेली पिशवी घेऊन चोरट्यांचा पोबारा. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल. सायंकाळची घटना. चोरट्यांच्या शोधासाठी पथक रवाना.
पुण्यातील उद्याने एक नोव्हेंबरपासून सुरु होणार. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे महापालिका हद्दीतील सर्व उद्याने मागील काही महिन्यांपासून बंद होती. मात्र, आता अनलॉकच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत पुणे महापालिकेने शहरातील 81 उद्याने नागरिकांसाठी एक नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेतलाय. ही उद्याने सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी पाच ते सात या कालावधीत खुली राहतील. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करणं बंधनकारक असेल.
जर मुंबईकर मास्क घालत नसतील आणि त्याबद्दल दंड म्हणून 200 रुपयेही भरत नसतील तर आता मुंबईतील रस्ते साफ करावे लागतील. अंधेरी पश्चिम विभागात ही संकल्पना राबवली जातेय. अंधेरी पश्चिम येथील फेरीवाल्यांनी मास्क घातले नव्हते, त्यांना शिक्षा म्हणून अंधेरीतील रस्ते त्यांच्याकडून साफ करुन घेतले गेले.
भिवंडी शहरातील इदगाह रोड परिसरात बंद पडलेला यंत्रमाग कारखान्याला भीषण आग. संपूर्ण कारखाना जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची 1 गाडी दाखल. अकरम यासीन अंसारी असे कारखाना मालकाचे नाव असून कारखाना बंद असल्याने जीवित तसेच मोठी वित्तहानी टळली आहे.
सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठात आज दिवसभर सुरू असलेलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन आता मागे घेण्यात आलं आहे. विद्यपीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमलकर यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याच सोबत तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, परत परीक्षा देण्याची संधी मिळेल, 10 नोव्हेंबरच्या आत अंतिम वर्षाचे 95 टक्के निकाल लागतील असं आश्वासन कुलगुरूंनी दिलं. यानंतर अभाविपने आंदोलन मागे घेतलं.
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. नुकतीच त्यांची करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही.
अकरावीचे प्रवेश लवकरच सुरू होणार, प्रवेश सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने थांबवले होते अकरावीचे प्रवेश. कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच अकरावीचे प्रवेश सुरू करण्याचा सरकारचा विचार. अकरावीच्या प्रवेशाची पहिली फेरी पार पडल्यानंतर राज्य सरकारने प्रवेश थांबवले होते.
केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही अनलॉक ऑक्टोबर गाईडलाईन्सला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाईन,ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू व्हावं लागणार आहे. त्यासाठी 50 टक्के उपस्थिती आवश्यक आहे.
राज्यपाल नियुक्त 12 जागांची नावं अद्याप गुलदस्त्यातच. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 जागांच्या नावाचा ठराव मांडण्यात आला. हा ठराव चर्चा करून मंजूर करण्यात आला. ही नावं मुख्यमंत्र्यांमार्फत राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रीमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. त्यामुळे 12 जागांची नावं घेऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही नावं सादर करणार. मुख्यमंत्री त्यानंतर ही नाव राज्यपालांकडे पाठवणार. मात्र 12 नावं कोणती याबाबत सरकारकडून प्रचंड गुप्तता पाळली जात आहे.
सांगली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची तक्रार केली आहे.
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात अतिशय संताप आणणारी घटना घडली आहे. एका तीन वर्षांच्या बालिकेवर 55 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि आजोबा शेतात गेले असताना बालिका दारात खेळत बसली होती. त्यावेळी तिला आरोपी यशवंत नलवडे याने घरामध्ये बोलवून अत्याचार केले. चिमुकलीची प्रकृती बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. आता गावकऱ्यांनी संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा केला जाणार असून सरकारचे लक्ष या घटनेकडे वेधण्यासाठी दररोज वेगवेगळी आंदोलनं केली जाणार आहेत.
मंत्री दिलीप वळसे पाटील कोरोना बाधित, आज सकाळी मंत्रालयात हजर होते वळसे पाटील, कॅबिनेट बैठकीआधी कोरोना टेस्ट रिझल्ट आल्यानंतर दिलीप वळसे पाटील घरी निघून गेले, वळसे पाटील यांना लक्षण नसल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले, त्यांना थोड्या वेळाने रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. वळसे पाटील आज सकाळी मंत्रालयात होते. कॅबिनेट बैठकीआधी कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर दिलीप वळसे पाटील घरी निघून गेले. वळसे पाटील यांना कोरोनाची लक्षणं नसल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. त्यांना थोड्या वेळात रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. वळसे पाटील आज सकाळी मंत्रालयात होते. कॅबिनेट बैठकीआधी कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर दिलीप वळसे पाटील घरी निघून गेले. वळसे पाटील यांना कोरोनाची लक्षणं नसल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. त्यांना थोड्या वेळात रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील कोरोना बाधित, आज सकाळी मंत्रालयात हजर होते वळसे पाटील, कॅबिनेट बैठकीआधी कोरोना टेस्ट रिझल्ट आल्यानंतर दिलीप वळसे पाटील घरी निघून गेले, वळसे पाटील यांना लक्षण नसल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले, त्यांना थोड्या वेळाने रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे
पुणे विद्यापीठात अभाविपचं आंदोलन, आंदोलनकर्ते विद्यापीठाच्या मेन हॉल मध्ये घुसले, कुलगुरुंशीच बोलायचं असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं. पण आज कुलगुरु विद्यापीठांत नाहीत. प्र कुलगुरु एन एस उमराणी आंदोलनकर्त्यांशी बोलण्यासाठी आले. पण कुलगुरुंशीच बोलायचं आणि ते आल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. उमराणींना घातला घेराव, आंदोलनकर्ते म्हणत आहे की, कुलगुरूंना फोन लावा. जोपर्यंत कुलगुरु येत नाही तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही असं उमराणींना म्हणत आहेत
लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी राज्य सरकारने बिना मास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार रेल्वे पोलिसांना दिले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वे पोलिस आयुक्तांना पत्र लिहले आहे. लोकल मध्ये किंवा रेल्वे स्थानक परिसरात कोणी बिना मास्क आढळल्यास त्यांच्यावर रेल्वे पोलिसांकडून कारवाई होणार. 9 सप्टेंबर रोजीच्या मुंबई महापालिकेच्या परिपत्रकानुसार या कारवाईची अमंलबजावणी केली जाईल.
दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून, प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून ३० टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी १० ते १५ टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे. मात्र यंदा कोविड - १९ च्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या " प्रवासी देवो भवः" या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे असे मंत्री परब यांनी सांगितले .
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, औरंगाबाद शहरात सकाळपासून मराठा क्रांती मोर्च्यांच्या समन्वयकांची धरपकड सुरू असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला.

औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर मराठा आरक्षणावरून सरकारच्या भूमिकाबाबत मराठा क्रांती मोर्च्यांच्यावतीने देसाई यांना जाब विचारला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी मराठा क्रांती मोर्च्यांच्या समन्वयक रमेश केरे यांना ताब्यात घेतले असून, त्यांना पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात नजर कैद केले असल्याचा आरोप केरे यांनी केला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची सुरवात झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद-पैठण रोडवर टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला होता.
पुणे: शहर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या नीता राजपूत यांचे पती जयंत राजपूत यांनी रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक कयास आहे. पुण्यातील फार्मास्यूटिकल्स क्षेत्रातील व्यावसायिक जयंत राजपूत यांनी त्यांच्या लॉ कॉलेज रस्ता रस्त्यांवर असलेल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच समोर आलंय. आर्थिक विवंचनेतून त्यांनी ही आत्महत्या केल्याचं निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.
नालासोपारा : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांच्या पथकाने नालासोपारा येथे सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. सध्या गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यात आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेतलं आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव येथील सुंदरम प्लाझा येथे पहिल्या मजल्यावर "बेसिन कॉल सेंटर" या नावाने बनावट कॉल सेंटर चालवले जात होते. यात अमेरीकेतील नागरिकांना फसवलं जात होतं.
माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती ठणठणीत,

सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल, थोड्याच वेळात मिळणार डिस्चार्ज,

कोरोनानंतर विश्रांती न घेतल्याने जाणवला त्रास,

डॉक्टरांनी सक्तीने विश्रांती घेण्यास सांगितले,
माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती ठणठणीत,

सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल, थोड्याच वेळात मिळणार डिस्चार्ज,

कोरोनानंतर विश्रांती न घेतल्याने जाणवला त्रास,

डॉक्टरांनी सक्तीने विश्रांती घेण्यास सांगितले,

पुण्यातील हडपसर गावातील राम मंदिराजवळ एका कागद पुठ्ठ्याच्या गोडाऊनमध्ये आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
बाळासाहेब माने, पंकज जगताप, अक्षय गायकवाड, साहेब जाधव आणि नितीन जाधव हे पाच तरुण 15 ऑक्टोबरला तुळजापूरहुन मंत्रालयात इथे चालत आले. मराठा आरक्षण मिळावे म्हणून हे तरुण चालत आले आहेत. त्यांनी मंत्री जयंत पाटील, दादा भुसे यांना भेटून आरक्षण देऊन हा प्रश्न सोडवावा ही मागणी केली.
मुंबईत नव्याने रुजू झालेल्या सांगली जिल्ह्याच्या आगारातील 400 चालक-वाहकांची 31 ऑक्टोबरपासून नियुक्ती रद्द करण्याचे आदेश. सांगली जिल्ह्यातील आगारातील 100 बसेस 1 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात परत येणार. एसटी महामंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे आदेश. मुंबई रिटर्न आलेल्या 100 हुन अधिक एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खबरदारी म्हणून एसटी महामंडळाचा निर्णय. बेस्ट बसेसवरचा प्रवाशाचा ताण कमी करण्यासाठी राज्यभरातुन एस टीची घेतली गेलीय मदत.
मुंबईत सर्वांसाठी लोकस सेवा सुरु होण्याची शक्यता. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकारची रेल्वेला विनंती
दहा दिवस कांदा साठवणुकीवरचे निर्बंध हटविण्याची मागणी भाजप खासदार भारती पवार यांनी केली आहे. केंद्राने अचानक घेतलेल्या निर्णयाने शेतकरी व्यापारी अडचणीत आले आहे. 10 दिवसासाठी निर्बंध हटविल्यास कांद्याचे व्यवहार सुरळीत होऊन शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल .दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेची भेट घेतली.
बिहारमध्ये आज एकूण सोळा जिल्ह्यात 71 जागांसाठी झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी 53.54 टक्के इतकी आहे. मागच्या वेळी या मतदार संघात 54.75 टक्के मतदान झालं होतं.
मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीतील आरक्षणसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्रीगटाची आज स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाने आज काढला आहे जी आर. अजित पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेली ही समिती कर्नाटक शासनाच्या धर्तीवर राज्यात नवीन कायदा करण्यासाठी कार्यवाही करणार. 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षण अवैध ठरवून शासन निर्णय रद्द केला होता, त्तपश्चात सर्वोच्च न्यायालयात राज्याची विशेष अनुमती याचिका प्रलंबित आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या विरोधात निर्णय दिला तर ही समिती मागासवर्गीय पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी कर्नाटक कायद्याच्या धर्तीवर नवीन कायदा करेल. अजित पवारसह समितीत छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, वर्ष गायकवाड, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, संजय राठोड, के सी पाडवी, अनिल परब, शंकरराव गडाख आणि धनंजय मुंडे आहेत. सामान्य प्रसंगासन सचिव हे मंत्रीगटाची सदस्य सचिव राह्तील. सुरू असलेल्या याचिकेचे नियंत्रण ही मंडळी करणार आणि ह्या याचिकेच्या आधीन राहून मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण कसे देता येईल किंवा कसे द्यायचे याची तपासणी करेल

निवृत्ती महाराज इंदोरीकर वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, आज होणारी सुनावणी टळली,
पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला,
दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावर होणार होती सुनावणी,
दिवाणी न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे दिले होते आदेश,
आज यावर होणारी सुनावणी पुढे ढकलली,
संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे प्रकरण,

निवृत्ती महाराज इंदोरीकर वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, आज होणारी सुनावणी टळली,
पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला,
दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावर होणार होती सुनावणी,
दिवाणी न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे दिले होते आदेश,
आज यावर होणारी सुनावणी पुढे ढकलली,
संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे प्रकरण,
माजी खासदार राजू शेट्टींना अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले, दिल्लीहुन पुण्यात आल्यानंतर शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागले होते
माजी खासदार राजू शेट्टींना अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले, दिल्लीहुन पुण्यात आल्यानंतर शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागले होते
कांदा प्रश्नावर शरद पवार लाईव्ह, कांद्याच्या दरात कायम चढ उतार आहेत, हा कठीण प्रश्न आहे, यावर राज्य नव्हे तर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज, शरद पवारांचं मत, राज्य सरकारकडून फारशी अपेक्षा करू नये, राज्य सरकारचे काही अधिकार नाहीत, निर्यात, आयात, यात राज्य सरकारचा सबंध नाही, हे सर्व केंद्राचे अधिकार, जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा वगळला आणि दुसरीकडे कारवाई करतात हा विरोधाभास आहे, शरद पवारांचा आरोप
नाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक, व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नाशिक कृषी उत्पन्न बाजार सभापती देविदास पिंगळे, पिंपळगाव बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर , जिल्हाधिकारी सूरज मांढरे बैठकीला उपस्थित
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने सगळे नदी-नाले भरून वाहिले. जवळपास सगळी धरणे पाण्यानी तुटुंब भरली. मांजरा धरण सगळ्यात उशिरा भरले आहे.. आज मांजरा धरण शंभर टक्के भरले आहे. लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी याच मांजरा धरणाचा आधार आहे.. मांजरा नदीतुन धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता धरणाचे दरवाजे उघडायचे की कालव्याचे दरवाजे उघडून पाणी सोडायचे याचा निर्णय प्रशासीय पातळीवर घेण्यात येईल असे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शरद पवार नाशिकला पोहोचले, दिवंगत विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी दाखल, कटुंबियांचे सांत्वन केले, चार दिवसांपूर्वी विनायकदादा यांचे निधन झाले शरद पवार आणि माजी मंत्री विनायकदादा यांचे घनिष्ठ सबंध होते, पवार यांच्या प्रत्येक दौऱ्यात विनायकदादा यांची ते भेट घेत असत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाच्या प्रादुर्भावातून लवकरात लवकर बरे व्हावे व ते पुन्हा आपल्या कार्यात सक्रिय व्हावे यासाठी आज तुळजापुर येथे तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर महाआरती करुन साकडे घातले. राष्ट्रवादी युवक प्रदेश व राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापुर यांच्या वतीने महाआरती केलीे. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने दादा लवकरात लवकर बरे होऊन ते लवकरच घरी येतील व पुन्हा जनतेच्या सेवेसाठी येतील.यासाठी प्रार्थना केली.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे,प्रदेश सरचिटणीस तथा उस्मानाबाद जिल्हा प्रभारी प्रशांत बाबर,अरुण असबे, शहराध्यक्ष अमर चोपदार उपस्थित होते.
महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं आवाहन,

काल रात्री १० ते १ अशी चालली जिल्हाप्रमुख आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक,

शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यात थोड्या अडचणी आहेत पण त्यावरही आपण मात करू,

जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांवर भर द्यावा, उद्धव ठाकरेंच्या सूचना
सलग तिसऱ्या दिवशी लासलगावसह जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती मध्ये कांदा लिलाव ठप्प,
कांदा लिलाव होत नसल्याने करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झालीय,
केंद्राने व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने 2 दिवसापासून बाजार समिती मधील कांदा लिलाव बंद आहे.
लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होतेय.
सहाय्यक निबंधकांनी व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत
सातारा :
साताऱ्यातील पाटण तालुक्यातील महिंद येथील घटना,

गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू ,

काल घराच्या छतावर खेळत असताना घडलेली घटना ,

शेजल यादव आणि अनुष्का यादव अशी दोन चिमुकल्यांची नावे,

शेजल आठ वर्षाची तर अनुष्का अकरा वर्षाची,

गांधील माशांच्या या हल्ल्यात आणखी दोन मुलीसह दोन महिलांही जखमी,

दुर्दैवी घटनेने महिंद गाव परिसरात हळहळ
परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात दिली आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

खासदार संजय जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड येथील रिंदा गॅंगला तब्बल दोन कोटी रुपये देऊन त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आलाय यासाठी परभणीतील एका बड्या व्यक्तीने हे दोन कोटी रुपये देऊन त्यांची सुपारी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे
मराठा आरक्षणाच्या स्थगितीबाबतची सुनावणी पुढे ढकल्याने मराठी क्रांती मोर्चा आक्रमक. औरंगाबाद-पैठण रस्त्यावर टायर पेटवून सरकारचे करण्यात आले निषेध. औरंगाबाद पैठण रोडवरील निलजगाव फाट्यावर पेटवले टायर ...
राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाविकास आघाडी कडून एक वेगळं नाव येण्याची शक्यता, उर्मिला मातोंडकर याना उमेदवार मिळण्याची शक्यता
मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रस्ताव नेमकी कोणत्या स्वरूपात येणार याबाबत अनिश्चितता
- उद्या मंत्रिमंडळ बैठकीत 12 नावांसह प्रस्ताव आणायचा की 12 जागांवर आमदार नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्याबाबत प्रस्ताव आणायचा यावर अद्याप निर्णय नाही
- 12 जागांवर नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देऊन काही काळाने ही नावं राज्यपालांकडे देण्याचा पर्याय
- त्यामुळे उद्या थेट 12 नावांसह प्रस्ताव येणार की मुख्यमंत्र्यांना नियुक्तीचे अधिकार देऊन नंतर मुख्यमंत्री राज्यपालांना नावं पाठवणार हे अजून अस्पष्ट
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेसची नावे अजून ही ठरली नाही
,
दिल्लीतील वरिष्ठांनी अजून ही नाव अंतिम केली नाही
,
याबाबत अपेक्षित चर्चा देखील दिल्लीतील पक्षश्रेष्ठीनी केली नाही
,
त्यामुळे काँग्रेसच्या राज्यपाल चार नावबाबत संभ्रम
खासगी सावकाराला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील टॉवरवर चढून आंदोलन, पंढरपूर येथील शेतकरी इब्राहिम याकूब मुलाणी, असे या आंदोलक शेतकऱ्याचे नाव, कर्ज फेडल्यानंतर देखील खासगी सावकार तगादा लावून त्रास देत असल्याचा आरोप, प्रहार संघटनेच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन, जवळपास 1 तासानंतर आंदोलन मागे
जम्मू काश्मीरमध्ये आता कोणालाही जमीन खरेदी करता येणार, उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
मराठा आरक्षण स्थगिती मिळाल्यानंतर अकरावी प्रवेशाला स्थगिती देण्यात आली होती. आज कोर्टात सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकारने महाधिवक्ता यांच्याकडून याबाबत संपूर्ण माहिती मागीवली आहे. मराठा आरक्षण आणि अकरावी प्रवेश याबाबत उद्या कॅबिनेट बैठकीतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
सुरेश धस यांना शरद पवारांनी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आतमध्ये बोलावले आहे. त्यामुळे सुरेश धस धरणं आंदोलन आटोपतं घेऊन बैठकीसाठी वसंतदादा शुगर इनस्टीट्युटमधे गेले आहेत.
वसंतदादा शुगर इनस्टीट्यच्या समोर आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घोषणाबाजी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून बैठकीला जाणाऱ्या इतरांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर गाड्या आतमधे गेल्या.
मुराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलली असून मराठा आरक्षण स्थगितीवर आता चार आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार
इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी शिवसेना आक्रमक, इचलकरंजी नगरपालिका बरखास्त करण्याची शिवसेनेची मागणी
मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सणासुदीच्या तोंडावर सुरक्षा यंत्रणा सतर्क, मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी, ड्रोन उडवण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी
मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी थोड्या वेळासाठी तहकूब
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली. तसेच माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानच्या पेशावरमधील एका मदरशाजवळ स्फोट झाला आहे. दिर कॉलनीत असलेल्या मदरशाजवळ झालेल्या स्फोटात 7 बालकांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू झालं आहे. जखमी बालकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक बालकांची प्रकृती गंभीर आहे.
छावा संघटना आणि पोलीस मित्र संघटनेच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मुंबई पोलिसांना कोविडपासून सुरक्षितेसाठी 4000 - KN 95 मास्कचे वाटप करण्यात आले. एकीकडे पोलिसांवर हल्ल्याचे प्रकार वाढत आहेत, परंतु छावा संघटना आणि पोलीस मित्र संघटना नेहमी पोलिसांसोबत आहे, हे सांगत असताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, कोविड असो किंवा सामाजिक सुरक्षा सर्व ठिकाणी पोलीस बांधवांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. संभाजीराजे आणि छत्रपती कुटुंब सदैव पोलीस प्रशासनाला सहकार्य करत राहणार. या उपक्रमाचे आयोजन छावाप्रमुख धनंजय जाधव, सुमित दरंदले, पोलीस मित्र संघटनेचे वैभव ठक्कर, पंकज निघोट यांनी केले होते.
सांगली : मुंबईहून सेवा बजावून सांगली जिल्ह्यात परतलेल्या एस.टी मधील चालक-वाहकाचा कोरोना बाधित आकडा 100च्या वर गेला. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 डेपोमधील 105 चालक-वाहक बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एस.टी प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा नासाने केला आहे. नासाने पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा नासाने केला आहे. नासाने पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे.
नवरात्रीमध्ये अंबाबाईच्या चरणी 7 लाख 68 हजार 486 रुपयांच्या सोन्याचे दान, तर नवरात्रीमध्ये 1 कोटी 12 लाख 7 हजार 799 रुपयांची ऑनलाईन पद्धतीने देणगी, नवरात्रीत 87 लाख 73 हजार 216 भक्तांनी घेतलं देवीचं ऑनलाईन दर्शन
ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल,

अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदान्वये गुन्हा दाखल,

पंकजा मुंडे सोबतच महादेव जानकर, भागवत कराड यांच्यावरही गुन्हा दाखल
उद्धव ठाकरे हे खेळण्यातले मुख्यमंत्री : नारायण राणे
बेईमानी करुन मुख्यमंत्री पद मिळवलं, हिंदुत्वाला मूठमाती देऊन हे पद मिळवलं : नारायण राणे
कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये सामाजिक कार्यकर्त्याने नगरपालिकेच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतलं. नगरपालिकेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. गेल्या आठवड्यात मेलेले डुक्कर घंटा गाडीला मागे बांधून ओढत घेऊन जाणाऱ्या घंटागाडी चालकाला नरेश भोरे यांनी जाब विचारला होता. त्यावेळी संबंधित वाहनचालकाने भोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. याविरोधात कचरा उचलणाऱ्या ठेकेदारविरोधात कारवाईची मागणी भोरे यांनी केली होती. कारवाई न केल्यास आज स्वतःला पेटवून घेऊ असा इशारा दिला होता. त्यानंतर आज नरेश भोरे यांनी नगरपालिकेच्या आवारात स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. त्यांची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसचं या घटनेनंतर नगरपालिका परिसरात एकच गोंधळ उडाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुण्याच्या लोणावळ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. राहुल शेट्टी असं त्यांचं नाव होतं. सकाळी 10च्या सुमारास घरा लगतच्या चौकात उभे असताना, अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात तीन गोळ्या त्याच्या शरीरात असल्याची प्राथमिक माहिती लोणावळा पोलिसांनी दिली. मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्लेखोरांचा शोध पोलीस घेतायेत. तत्पूर्वी काल रात्री ही एका गुन्हेगाराची वार करून हत्या झाली होती. गणेश नायडू असं त्याचं नाव होतं. दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध नसल्याची पोलिसांची माहिती.
कोरोना संकटाचा साधा उल्लेखही मुखमंत्र्यांनी केला नाही, मुख्यमंत्र्यांचं भाषण ताळमेळ नसलेलं : नारायण राणे
कोरोनाच्या संकटामुळे अनेक पालकांच्या उद्योग धंदा, व्यवसाय व नोकरीवर परिणाम झाला आहे. अनेकजन आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही शैक्षणिक संस्थांना फी वाढ करू नये असा आदेश देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर ज्या पालकांना शक्य होईल त्या प्रमाणे टप्प्या टप्प्यात फी भरण्याची मुभाही पालकांना देण्यात आली आहे. असे असतानाही कळंबोली येथील सेंट जोसेफ शाळा अतिरिक्त शुल्क वसूल करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. या विरोधात आज पालकांनी शाळेत येऊन निदर्शन करत मुख्याध्यापिका यांचा कडे निवेदन देत अतिरिक्त शुक्ल न घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान याबाबत शाळा व्यवस्थापनाने काही बोलण्यास नकार दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी मधील करुळ भट्टीवाडी नजिक एका धोकादायक वळणावर चालकाचा स्टेअरिंगवरील अचानक ताबा सुटल्याने मैद्याने भरलेला ट्रक करूळ घाटात 200 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. तर चालकाचा ताबा सुटत असल्याचे लक्षात येताच क्लीनरने चालत्या गाडीतून उडी मारली आहे. वैभववाडी पोलीसांनी जखमी चालकाला मोठ्या धाडसाने दरीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ट्रक दोनशे फूट दरीत गेल्याने ट्रकचा चक्काचूर झाला आहे. तर मैदा पिठाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक चालकाला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पुण्यातील सिंहगड शिक्षण संस्थेने पगार थकवल्याने या संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता खाजगी सुरक्षा रक्षकांशी त्यांची झटपट झाली . अखेर या सुरक्षारक्षकांनी बळाचा उपयोग करून या कर्मचाऱ्यांना संस्थेच्या आवारातून हुसकावून लावलं . मारुती नवले प्रमुख असलेल्या या सिंहगड शिक्षण संस्थेने या संस्थेच्या विविध शाखांमध्ये काम करणाऱ्या जवळपास आठ हजार कर्मचाऱ्यांचे पगार मागील पंधरा महिन्यांपासून दिलेले नाहीत असा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे . या आधी देखील या कर्मचार्यानी पगार मिळावा यासाठी वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत. आज पुन्हा एकदा हे कर्मचारी संस्थेच्या आवारात आंदोलन करण्यासाठी जमले होते.
नांदेड : बाजारात सध्या लाल मिरची आणि मिरची पावडर ला चांगले दिवस आले आहेत. सध्या बाजारात मिरची पावडरचे दर हे प्रतिकिलोला 300 रुपये झाले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आणि हॉटेल्स देखील आता सुरु झाले आहेत. त्यामुळे बाजारात मिरची आणि मिरची पावडरला मागणी अचानक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत मिरचीचा पुरवठा कमी आहे. मध्य प्रदेशात मिरची पिकावर रोग आला आहे आणि महाराष्ट्र तेलंगणात अति पावसाने मिरची पीक पूर्णपणे वाया गेले आहे. या सर्वांचा परिणाम मिरचीच्या दारांवर झाला असून मिरचीचे भाव वधारले आहेत. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात वर्षाकाठी मिरचीचा सुमारे दोनशे कोटींचा व्यवहार होतो. पण याही बाजारात मिरचीच्या भावाचा ठसका ग्राहकांना लागतोय.
मान्सूचा परतीचा प्रवास सुरु, येत्या २४ तासात महाराष्ट्रातून माघारी फिरेल, हवामान विभागाची माहिती
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल, खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
रत्नागिरी : परतीचा पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात मागील दोन दिवस पावसानं हजेरी लावली आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे भातपिकाची मोठी हानी झाली. त्यामुळे पाऊस गेला अशा समजात शेतकरी असताना पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागांमध्ये तर दुपारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. पण, पाऊस कोसळेल की नाही याबाबत मात्र काहीशी शंका होती. पण, दुपारनंतर वरूणराजा जोरदार बरसला. त्यामुळे उरलं-सुरलं पिकं देखील आता हातचं जाण्याची भीती आहे. काल झालेल्या पावसामुळे आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशीच अवस्था सध्या शेतकऱ्याची झाली आहे.
मुंबईच्या वाडी बंदर परिसरात चोर असल्याच्या संशयातून एकाची पालिकेच्या कंत्राटदाराच्या सुरक्षा रक्षकांनी हत्या केली आहे. मंगेश कोडर आणि सूरज बोलके अशी या आरोपींची नावे आहेत. तर हत्या झालेल्या तेवीस वर्षीय तरुणाचे नाव माजिद आली आहे. काल वाडी बंदर येथील तंबाकू गल्लीमध्ये पालिकेच्या कंत्राटदाराचे तात्पुरते बनविण्यात आलेल्या ऑफिस बाहेर माजिद अली संशयास्पद रित्या घुटमळत होता. हे तेथील कंत्राटदाराचे सुरक्षा रक्षक मंगेश आणि सूरज यांनी पाहिले. त्यांनी त्याला हटकले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी सूरज आणि मंगेशने लाकडी दांड्यानी माजिदला मारहाण केली आणि तिथून ते पळून विरारला घरी गेले. इकडे रक्ताच्या थारोळ्यात व्यक्ती पडला असल्याची तक्रार डोंगरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा शोध घेतला. तसेच मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


'भाजप व्यक्तीनिर्भर नाही, कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष', खडसेंच्या सोडचिठ्ठीवर गिरीश महाजनांचं भाष्य


एकनाथ खडसेच काय तर मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या सात ते आठ नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही पक्षाला कोणत्याही प्रकारचा फरक पडला नव्हता. भाजपकडून मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष सोडून निघून गेली होती. नंतर पक्षात परत देखील आली होती. भाजप हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा आहे, अशा शब्दात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर पलटवार केला.


भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक काल पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला. खडसेंनी पक्षांतर केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी घडत आहेत. सध्या खडसे आणि महाजन यांच्यातही शाब्दिक युद्ध रंगले आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना 'पुढच्या कालखंडात कोण किती सक्षम आहे, कुणाच्या मागे किती लोक आहेत, हे चित्र दिसेलच', असे वक्तव्य केले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली.


एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ; मुंबईत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण, व्हिडीओ व्हायरल


मुंबईत लोकल अद्याप सर्वांसाठी खुली करण्यात आलेली नसल्यामुळे बेस्टवर प्रचंड ताण येत होता. अशातच बेस्टच्या मदतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एसटीच्या विविध विभागातून एसटी बसेस आणि सोबत त्या-त्या भागांतील एसटीचे काही कर्मचारी देखील सध्या मुंबईत सेवा देण्यासाठी हजर राहिले आहेत. मुंबईत आलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केल्याचा दावा एसटी प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. असं असलं तरी एसटी कर्मचाऱ्यांना उघड्यावर झोपावं लागत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अशातच आता एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा देखील निकृष्ठ असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.


कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली. अनलॉक प्रक्रियेत सर्व पूर्ववर्त करण्यासाठी बेस्ट सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे बेस्ट सेवेवर संपूर्ण ताण पडत होता. त्यामुळे राज्यांतील प्रमुख एसटी बस डेपोमधून काही बसेस या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. या सर्व बसेससोबत एसटी कर्मचारीही मुंबईत दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांची सोय अगदी उत्तम केल्याचा दावा सातत्यानं एसटी प्रशासन करत आहे. परंतु, सोशल मीडियावर एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे एसटी प्रशासनाच्या दाव्यां संदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे.


काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निधी दिला : अशोक चव्हाण


शिवसेनेसोबत जाण्याबाबत दिल्लीतील नेते नाराज होत, मात्र राज्यात भाजपकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे मी स्वतः जाऊन त्यांना भाजपला सत्तापासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेलच हे पटवून दिल्याने आपण महाविकास आघाडीत सामील झाल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.


अशोक चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेलेचं खड्डे बुजवण्याचे काम सध्या मला आहे, तेच मी करतोय. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाहीतर कारने जास्त फिरतोय, असा सणसणीत टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना परभणीत लगावला आहे.


IPL 2020, RRvs KXIP: राजस्थान रॉयल्सने पंजाबचा विजयरथ रोखला; प्ले ऑफसाठीची चुरस वाढली


राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेलं 185 धावांचं आव्हान राजस्थानने 17.3 षटकात पूर्ण करत मोसमातील सहावा विजय साजर केला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने सुरुवातीला केलेली फटकेबाजी निर्णायक ठरली. राजस्थानकडून बेन स्टोक्सने 26 चेंडूत 50 धावा केल्या तर संजू सॅमसनने 25 चेंडूत 48 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने 23 चेंडूत 30, स्टीव्ह स्मिथने 20 चेंडूत तर जोस बटलरेने 11 चेंडूत 22 धावा केल्या.


त्याआधी किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला 186 धावांचे लक्ष्य दिले. पहिल्याच षटकात सलामीवीर मनदीपसिंग खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. जोफ्रा आर्चरने त्याला माघारी धाडलं. पंजाबची सुरुवात खराब झाली. त्यानंतर केएल राहुल आणि ख्रिस गेलने दुसर्‍या विकेटसाठी 120 धावांची मजबूत भागीदारी केली. राहुलने 41 चेंडूत 46 धावा केल्या. राहुलने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले.. तर पंजाबकडून ख्रिस गेलने 63 चेंडूत 99 धावांचे तुफानी खेळी केली. गेलने या खेळीत आठ षटकार आणि सहा चौकार लगावले. त्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरनने अवघ्या 10 चेंडूत 22 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन षटकार लगावले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने चार षटकांत 26 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. तर बेन स्टोक्सने चार षटकांत 32 धावा देऊन दोन बळी घेतले.


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.