LIVE UPDATES | 1 ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी होणार खुला
कोरोनाकाळात संसदेचं ऐतिहासिक अधिवेशन आजपासून, अनेक महत्वाच्या विधेयकांची मंजुरी अपेक्षित पाच महिन्याच्या कालखंडानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एसटी धावणार! मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह एकजूटीने प्रयत्न करणार : मुख्यमंत्री गर्दी कमी करा अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल; मंत्री जयंत पाटील यांचा सांगलीकरांना इशारा कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
14 Sep 2020 09:22 PM
गोंदीया : तीरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहगडाले यांना कोरोनाची लागण, दोन दिवस आधी आमदार राहगडाले यांना अस्वस्थ वाटत असल्याने गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात झाले होते दाखल, आज कोरोना चाचणी अहवाल आला पाझिटिव्ह, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार
1 ऑक्टोबर पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी खुला होणार आहे. तब्बल 6 महिन्यानंतर ताडोबा पर्यटकांसाठी खुला होणार आहे. 18 मार्च पासून कोरोनामुळे बंद आहे. ताडोबातील पर्यटनासाठी मात्र काही अटी-शर्ती पर्यटकांसाठी बंधनकारक असणार आहे. ताडोबाच्या बुकिंग साठी ताडोबा प्रशासनाने आता स्वतःची स्वतंत्र वेबसाईट सुरु केली आहे. www.mytadoba.org या संकेतस्थळावरून 16 सप्टेंबर पासून बुकिंग सुरु होणार आहे. एका जिप्सी मध्ये आता 6 ऐवजी 4 पर्यटक बसणार आहेत. गर्भवती महिला, 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना पर्यटनासाठी बंदी असणार आहे. मास्क, sanitizer, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक तर कोविड सदृश्य लक्षणं आढळल्यास पर्यटकाला प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
कोरोना साथीमुळे जनता हैराण झाली असतांनाच आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाल्याच समोर येत आहे. मुंबईतल्या पालिकेच्या दहिसर पश्चिम कानदरपाडा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये सुलोचना गिरकर वय 55 वर्षे राहणार बोरिवलीला उपचारासाठी 27 ऑगस्टला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. 9 सप्टेंबर रोजी कोरोना केअर सेटरमध्ये या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील लोक मृतदेह पाहण्यासाठी पोहोचले असता त्यांनी महिलेच्या मंगळसूत्र आणि मोबाइलबद्दल माहिती विचारली. पण केअर सेंटर कडून त्यांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी एम.एच.बी. पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच सेंटर बाबत अनेक गैरप्रकार होत असल्याच्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्याकडे तक्रारी आल्यावर त्या त्याठिकाणी पाहणी करण्यास गेल्या असता त्यांच्याशी सुद्धा गैरवर्तन करण्यात आले होते.सीसीटीव्ही असतांना सुद्धा चोरीचे प्रकार कसे होत आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे
औरंगाबाद कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू.. सामनाचे वरिष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांचा मृत्यू. 10 दिवसांपासून सुरू होते घाटी रुग्णालयात उपचार.
औरंगाबाद कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू.. सामनाचे वरिष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांचा मृत्यू. 10 दिवसांपासून सुरू होते घाटी रुग्णालयात उपचार.
औरंगाबाद कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू.. सामनाचे वरिष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांचा मृत्यू. 10 दिवसांपासून सुरू होते घाटी रुग्णालयात उपचार.
सोलापूर महानगरपालिकेची मागील महिन्यात तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज पार पडली. मात्र या सभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. सकाळी 11.30 वाजता ही सभा बोलवण्यात आली होती मात्र 12 वाजल्यानंतर देखील एकही अधिकारी तसेच मनपा आयुक्त सभेला उपस्थित झाले नाहीत. याचा निषेध म्हणून विरोधी पक्षातील नगरसेवकांनी थेट आयुक्तांची खुर्चीच सभागृहात उचलून नेली. महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या सभागृहात आयुक्तांची खुर्ची नेत विरोधी पक्षातील वंचित, एमआयएम, काँग्रेस, माकपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. मागील 6 महिन्यापासून सभा व्यवस्थित सुरू नाही, त्यात वारंवार सभा तहकूब केली जात आहे. अधिकारी आणि आयुक्त सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे आवश्यक असताना सभेसाठी येत नाहीयेत. अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केली. या गोंधळानंतर महापौर श्रीकांचना यन्नम आणि अप्पर आयुक्त विजय बोराटे हे सभागृहात दाखल झाले. मात्र महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दुखवटा प्रस्ताव मांडला त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. उद्या पुन्हा ही सभा बोलवण्यात आली आहे.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बैठक संपल्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र काम करत आहेत. पंधरा तारखेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांच्यासोबतही मराठा आरक्षण संदर्भात बैठक होणार आहे. आम्हाला कोणताही राजकीय वाद करायचा नाही, सामंजस्यांनं यावर तोडगा काढायचा आहे. मराठा समाजासोबत संपूर्ण राज्य सरकार आहे, त्यामुळे वादाचा कोणताही मुद्दा नाही. पुन्हा सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. विविध क्षेत्रातील तज्ञ यांचे सल्ला घेण्यात येत आहे.
शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण, आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी आज फेसबुकवर पोस्ट टाकून दिली, खोतकर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, आपण कोविडचे सर्व नियम पाळून देखील लोकहिताची कामे करताना कोरोनाची अखेर लागण झाली असे म्हणत खोतकरांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन देखील केले आहे.
शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण, आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी आज फेसबुकवर पोस्ट टाकून दिली, खोतकर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, आपण कोविडचे सर्व नियम पाळून देखील लोकहिताची कामे करताना कोरोनाची अखेर लागण झाली असे म्हणत खोतकरांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन देखील केले आहे.
तुळजाभवानीचे अलंकार गायब केल्या प्रकरणी गुन्हा दाखल,
तत्कालीन मंदिर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी वर गुन्हा दाखल,
७१ प्रचिण नाणी गायब झाल्याचे चौकशी समितीत सिध्द झाल होते,
तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या तक्रारीनूसार गुन्हा
पालघर जिल्ह्यातील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच शासनाचे आदेश धुडकावून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटक बिनधास्तपणे मोठी गर्दी करत आहेत. पर्यटकांकडून सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याच्या सूचनांचे उल्लंघन होत आहे. वांद्री प्रकल्पच्या धरणावर रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र संबंधित विभागाकडून या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसून दुर्लक्ष दिसून आले.
उद्यापासून एसटीची आंतर राज्य सेवा सुरू होणार. सुरुवातीला महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होणार. एसटीच्या धुळे विभागातून उद्यापासून धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत अशी आंतर राज्य बस सेवा सुरू होणार. एका सीटवर एकच प्रवाशी बसण्यास परवानगी. प्रवाशांना एसटीत बसल्यानंतर देखील मास्कचा वापर करणं आवश्यक राहणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता टप्याटप्याने अहमदाबाद, बडोदा, तसेच मध्यप्रदेशसाठी देखील आंतरराज्य बस सेवा सुरू होणार आहे. हळूहळू सर्वच मार्गांवरील एसटीची सेवा सुरळीत सुरू होणार आहे.
नागपुरात प्रायव्हेट लॅब्समध्ये टेस्टिंग आणि रिपोर्टिंगमध्ये तफावतीच्या तक्रारी, पालकमंत्री नितीन राऊत यांचे अशा लॅब्सची चौकशी करून कडक कारवाईचे प्रशासनाला निर्देश, तसेच पैसा कमावण्यास टेस्ट्स वाढवताना इतर नियमांच्या पालनावरही प्रश्नचिन्ह
नाशिक मध्य मतदारसंघाच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांना कोरोनाची लागण, काही वेळापूर्वी अँटीजेन टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन
कंगना रनौतकडून राज्यपालांची भेट, पालिकेच्या कारवाईसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, सेनेसोबतचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला.
पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. काही लोकं मास्क चुकीच्या पद्धतीनं घालतात. काही गोष्टी आपण जबाबदारीनं पाळल्या पाहिजेत.
महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गेलं नाही, मात्र संकट वाढत चाललं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून वाऱ्यासह मुसळधार पाऊस सतत पडत असल्याने त्याचा विपरीत परिणाम उभ्या राहिलेल्या भात शेतीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पावसामुळे उभी राहिलेली भात शेती अगदी कणीस निर्माण झाल्यावर आडवी व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटा बरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची भात शेतीचंही नुकसान होण्याची पाळी आल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे कृषी विभागाने ह्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी करण्यात येत आहे
बुलढाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात नीटची परीक्षा होत आहे. या परिक्षेसाठी देशभरात जवळपास 16 लाख विद्यर्थि देणार आहे. कोरोनामुळे गेल्या चार महिन्यापासुन लांबनिवर पडलेली नीट परिक्षेसाठी बुलढान्यात ही या परीक्षेची कोरोनाच्या नियमानुसार तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 4540 विद्यार्थी ही परीक्षा 19 केंद्रावरुन देणार असून यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. बुलढाणा शहरात एकूण 11 केंद्र आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी सर्वात मोठी परीक्षा आहे.
राज्यात आज होणाऱ्या नीट परीक्षेसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढपुरातील परीक्षा केंद्रावर अभूतपूर्व तयारी करण्यात आली आहे. पंढरपूरमधील सिंहगड कॉलेजवर असलेल्या परीक्षा केंद्रावरही अशीच तयारी करण्यात आली आहे. तसेच 2 वाजता सुरू होणाऱ्या पेपरसाठी 11 वाजल्यापासून मुलांना हॉल तिकीट वरील दिलेल्या वेळेनुसार तपासणी करून आत सोडण्यात येत आहे. प्रत्येक अर्धा तासाच्या अंतराने 60 मुलांना केंद्रावर सोडले जात आहे. या केंद्रावर 240 विद्यार्थी परीक्षा देत असून कोरोनामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना एक मीटर अंतर ठेवून बैठक व्यवस्था केल्याने एक ब्लॉक मध्ये केवळ 12 विद्यार्थी बसू शकणार आहेत
सोलापूर - सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढत केला निषेध, तिरडीवर पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांचे फोटो, अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
पालघर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात, हवामान खात्याकडून जिल्ह्यात सकाळी 9 ते 1.30 वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्ष होते. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगला होता. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे देखील ते प्रमुख पदाधिकारी होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील समाजवादी चळवळ पोरकी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय.
पुणे जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 4717 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद,
तर 90 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू,
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण मृतांची संख्या 5059,
एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 220692
महाराष्ट्र राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिला. म्हणून आता दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले होते. त्याबाबत एसओपी (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली. परंतु महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडली. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी केली आहे.
मंत्रालयात छगन भुजबळ, डॉ. नितीन राऊत, उदय सामंत यांच्या कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कार्यालय बंद करण्याचा निर्णय,कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ होम क्वॉरन्टाईन
ऑफिस तोडल्याप्रकरणी आता कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार.
युकेच्या ग्रीन सिग्नलनंतर अॅस्ट्रॅजेनेका कंपनीकडून कोरोना लसीची चाचणी सुरु
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत. त्यांच्यासोबत उपचारासाठी राहुल गांधीही अमेरिकेत. पुढचे दोन आठवडे ते उपचारासाठी अमेरिकेत थांबण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्षांना त्यांनी अनुपस्थितीबाबत कळवलेले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत. त्यांच्यासोबत उपचारासाठी राहुल गांधीही अमेरिकेत. पुढचे दोन आठवडे ते उपचारासाठी अमेरिकेत थांबण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्षांना त्यांनी अनुपस्थितीबाबत कळवलेले आहे.
दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांचीही नावे. फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत घडलेल्या दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपल्या पुरवणी आरोपपत्रात अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनाला रुग्णवाहिकेचा दर्जा देणार, लवकरच याबाबत आदेश निघणार.
गडचिरोली: जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा, गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणात धान आणि कापसाची शेती पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले, केंद्रीयपथकाकडून गडचिरोली तालुक्यातल्या पारडी, कनेरी गावांपासून पाहणीला सुरुवात झाली आहे. शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांसोबत पथकाचा संवाद
राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा, राज्य सरकारने मागणी केल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून मंजुरी, त्यासोबत स्पर्धा परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लोकल प्रवासाची मुभा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांतर्गत ट्रेन बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे विभागाने बारा गाड्यांना परवानगी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाड येथून पहिली ट्रेन मनमाड येथून प्रवाशांना घेऊन मुंबईला धावली .
लॉकडाउनच्या मागील सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात 8 जणांची 4 लाख रुपयांना ऑनलाईन फसवणूक; सावर्डे, चिपळूण, खेड, लांजा आणि संगमेश्वर येते गुन्हे दाखल
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संगमेश्वर तालुक्यातील आरवली, माखजन, असुर्डे, कडवई, नांदगाव या गावांचा स्वस्फूर्तीने आठ ते दहा दिवस जनता curfew चा निर्णय
रत्नागिरी- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या चिंतेची बाब; कर्मचाऱ्यांवर पडतोय अतिरिक्त ताण
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी देखील पांढऱ्या शुभ्र धुक्याची दाट चादर पसरली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धुईचा फटका पिकांना बसतो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना वारंवार सतावत आहे.
अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे आज पहाटे निधन. तो 35 वर्षांचा होता. अनेक महिने आजारीच होता मूत्रपिंड निकामी झाल्यानं निधन. अरुण व अनुराधा यांचा मुलगा.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड गावाजवळ अज्ञातांची प्रवाशी उतरवून बस वर दगडफेक, मराठा आरक्षणाची मागणी करत दोघांनी बसच्या काचा फोडल्या. दोन अज्ञात आरोपी विरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ, 97 हजार 570 ने वाढले कोरोना रुग्ण, तर मृतांचा आकडा 1 हजार 201 ने वाढला, गेल्या 24 तासात सर्वाधिक 81 हजार 533 रुग्ण बरे झाले आहेत तर १४ हजार ८३६ लोकांना कोरोनाची लागण झाली.
देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४६ लाख ५९ हजार ९८४.
त्यापैकी एकूण ३६ लाख २४ हजार १९६ रुग्ण बरे झाले आहेत.
म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट ७७.६५ टक्के,
सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण ९ लाख ५८ हजार ३१६,
देशात एकूण मृतांची संख्या ७७ हजार ४७२,
काल ११ सप्टेंबरपर्यंत देशात ५ कोटी ५१ लाख ८९ हजार २२६ कोविड चाचण्या झाल्या आहेत.
काल देशात १० लाख ९१ हजार २५१ कोविड चाचण्या झाल्या.
सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाल्याची माहिती.
काँग्रेस वर्किंग कमिटीची पुनर्रचना करण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांचे महत्त्व कायम राहिल्याचे दिसते आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव कुठेही नाही.
मुकुल वासनिक हे मध्य प्रदेशचे प्रभारी असतील आणि सोनिया गांधी यांना मार्गदर्शन करण्यासाठी जी स्पेशल कमिटी बनवण्यात आली आहे. त्यात पाच सदस्यांपैकी एक वासनिक आहेत. सहा लोकांची कमिटी आहे अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला. सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांच्या ऐवजी एच के पाटील आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी. खरगे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी. मुकुल वासनिक यांच्याकडे आधी चार राज्यांचा प्रभार होता. त्यातले तीन काढून घेतले आहेत. आणि एक कायम ठेवला आहे. गुलाब नबी आझाद, अंबिका सोनी, मोतीलाल वोरा, मल्लिकार्जुन खर्गे यांना महासचिव पदावरून हटवले.
स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडे हा जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा बेकायदेशीर हॉस्पिटल चालवायला सुरुवात केली होती. यावर बीडच्या आरोग्य विभागाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले होते. सुदाम मुंडे याला अटक केल्यानंतर पाच दिवसाची पोलीस कोठडी आज पूर्ण झाली त्यानंतर परळी पोलिसांनी त्याला परळी कोर्टामध्ये हजर केले असता त्याला पुन्हा एकदा चार दिवसाची पोलीस कोठडी परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावले आहे. म्हणजे सुदाम मुंडे यांचा परळीच्या पोलीस कोठडी मधला मुक्काम 15 तारखेपर्यंत वाढला आहे
स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडे हा जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा बेकायदेशीर हॉस्पिटल चालवायला सुरुवात केली होती. यावर बीडच्या आरोग्य विभागाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले होते. सुदाम मुंडे याला अटक केल्यानंतर पाच दिवसाची पोलीस कोठडी आज पूर्ण झाली. त्यानंतर परळी पोलिसांनी त्याला परळी कोर्टामध्ये हजर केले असता त्याला पुन्हा एकदा चार दिवसाची पोलीस कोठडी परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली आहे. म्हणजे सुदाम मुंडे यांचा परळीच्या पोलीस कोठडी मधला मुक्काम 15 तारखेपर्यंत वाढला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करावी अशी मागणी बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे पोलीस उपायुक्ताकडे करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून थोर पुरुष आणि महनीय व्यक्ती यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर घालून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 10 सप्टेंबर रोजी दोन व्यक्तींनी फेसबुकवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.हा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आहे.यासाठी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी बेळगावजिल्हा शिवसेनेतर्फे पोलीस उपायुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.यावेळी संपर्क प्रमुख अरविंद नागनूरी, जिल्हा शिवसेना अध्यक्ष प्रकाश शिरोळकर,बंडू केरवाडकर आदी उपस्थित होते.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण,
लक्षणे नसल्याने पुण्यामधील घरीच राहून घेत आहेत उपचार
उस्मानाबाद जिल्ह्यातील सांगवी येथील तरुणाचा कोरोनाचा चुकीचा रिपोर्ट मिळाल्याने विदेशातील नौकरी हुकली आहे. लाखोंच्या नुकसानासह मोठा मानसिक त्रास सोसावा लागलाय. अमोल मिसळे कामधंद्यासाठी दुबई इथं असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने इतरांप्रमाणे अमोलनेही आपलं गाव गाठलं होतं. परत दुबईला जाण्यासाठी परतीसाठी कोरोना टेस्ट करण्याची गरज होती. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील चाचणीत अमोल पाॅझिट्व्ह तर पुण्याच्या रुग्णालयात निगेटिव आला. अमोलला कसलेही लक्षण नाहीत. दरम्यान अमोलने दुबईला जाण्यासाठी विमानाचे तिकिट काढले होते. दोन परस्पर अहवालामुळे दुबईच्या विमानात बसतां आले नाही.
म्हशींनी शेताची नासधूस केल्याचा वादातून वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून हत्त्या करण्यात आली आहे. वाडा तालुक्यातील कांदिवली येथील घटना असून आरोपीला 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. रखुमाबाई धर्मा गवते 65 असे हत्त्या झालेल्या मृत वृद्ध महिलेचं नाव असून तिच्या वनपट्ट्या मध्ये आरोपी लहू कान्हू खाने याच्या म्हैसिनी पिकाची नासाधून केली म्हणून दोघांत शेतीवरच वाद झाला आणि ह्या वादात आरोपीने वृद्धेच्या डोक्यात दगड घालून ठेचून निर्घृण हत्त्या करून रखुमाबाईचा मृतदेह झुडपात लपविला,, मात्र तिच्या कुटुंबीयांनी वाड़ा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला ह्या खुनाचा छडा 24 तासात लावून आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याचायवर कल302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून , आरोपीला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,,अधिक तपास वाड़ा पोलीस करत आहेत.
मध्य रेल्वेतील मुंबई विभागाच्या बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने माल वाहतुकीत आक्रमक वाढ करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारे पुढाकार घेतले आहेत. या प्रयत्नांच्या फलस्वरूप भिवंडी रोड स्टेशन गुड्स आणि पार्सल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले.
रेफ्रिजरेटर, फर्निचर, औषधे, कॉस्मेटिक इत्यादी वस्तूंनी संपूर्णपणे भरलेल्या ५ पार्सल व्हॅनसहित प्रथम पार्सल ट्रेन दि. ९.९.२०२० रोजी महाराष्ट्रातील भिवंडी रोड स्टेशन ते बिहारमधील दानापूर पर्यंत धावली. अंदाजे ११५ टन पार्सलने भरलेल्या ह्या पार्सल ट्रेन पासून रू. ४,१३,९२८/ - चे उत्पन्न मिळाले. दानापूर (पाटणा) येथील पुढील प्रवासासाठी ह्या पार्सल व्हॅन देवळाली स्टेशन येथे किसान रेलला जोडण्यात येणार आहेत.
भिवंडी रोड स्टेशन गुड्स व पार्सल वाहतुकीसाठी विकसित करण्यासाठी रेल्वेच्या बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भिवंडी हे अनेक गोदामे आणि उद्योग असलेले प्रसिद्ध शहर आहे. भिवंडी रोड स्टेशन गुड्स व पार्सल वाहतुकीसाठी सुरू केल्याने संलग्न सेवा उद्योगांमध्येही रोजगार निर्माण होईल. हे स्थानक उत्तर-दक्षिण जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर आहे आणि जेएनपीटीशी देखील जोडले गेले आहे, त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरांच्या निकटतेमुळे त्याचा फायदा होतो. भिवंडी हे अनेक पॉवर लूम्समुळे वस्त्र उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे.
मध्य रेल्वे, औषधे, हार्ड पार्सल, रेल्वे मेल सेवा, ई-कॉमर्स वस्तू, नाशवंत माल इत्यादी पाठविण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) -शालीमार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष ट्रेन देखील दिनांक ३१.१२.२०२० पर्यंत चालवित आहे.
लॉकडाउन व अनलॉक झाल्यापासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ३७० पार्सल गाड्या चालवित आतापर्यंत १३,०६५ टन पार्सल व इतर वस्तूंची वाहतूक केली आहे.
मध्य रेल्वेत क्षेत्रिय आणि विभागीय स्तरावर बहु- अनुशासित व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) ची स्थापना केली आहे. वरीष्ठ अधिका-यांचा समावेश असलेला हा युनिट रेल्वेत अधिक वाहतूक संधी निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधत आहे.
नागपुरात तुकाराम मुंढे यांच्या शासकीय निवासाच्या बाहेर अभूतपूर्व गर्दी, शेकडोंच्या संख्येने तरुणाई, सामान्य नागरिक जमा झाले, कुणी हातात मुंढे समर्थनाचे बॅनर घेऊन तर कोणी फुलांचे गुलदस्ते घेऊन, अनेकांनी मुंढेंसाठी गिफ्टही आणले, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, तानाशाही नहीं चलेगी, आगे आगे मुंढे, पीछे पड गये गुंडे अशी घोषणाबाजी, लोकं हाटायला तयार नाहीत, पोलिसांसोबत लोकांचा वाद, सोशल डिस्टन्सिंगची मात्र ऐशी तैशी
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांची संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ, ९६ हजार ५५१ ने वाढली तर मृतांचा आकडा १ हजार २०९ ने वाढला,
गेल्या २४ तासात ७० हजार ८८० रुग्ण बरे झाले आहेत तर २४ हजार ४६२ लोकांना कोरोनाची लागण झाली.
देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४५ लाख ६२ हजार ४१४.
त्यापैकी एकूण ३५ लाख ४२ हजार ६६३ रुग्ण बरे झाले आहेत.
म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट ७७.७४ टक्के,
सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण ९ लाख ४३ हजार ४८०,
देशात एकूण मृतांची संख्या ७६ हजार २७१,
काल १० सप्टेंबरपर्यंत देशात ५ कोटी ४० लाख ९७ हजार ९७५ कोविड चाचण्या झाल्या आहेत.
काल देशात ११ लाख ६३ हजार ५४२ कोविड चाचण्या झाल्या.
पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिक भीतीच्या छायेत असून मध्यरात्री जवळपास सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे पाच धक्के बसल्याची नागरिकांनी माहिती दिली. तलासरी,धुंदलवाडी, चिंचले, सासवंद, कासा, बोर्डी, दापचरी, धानिवरी, आंबोली आणि आजू बाजूचा परिसर हादरला.
बुलढाणातील मेहकर तालुक्यामधील डोणगांव मध्ये कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या झपाट्याने वाढत असल्यामुळे, आरोग्य विभागाचे वैधकीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी व नागरिकांनी तातडीची मिंटीग घेऊन,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी स्वयंमस्पुर्तीने सात दिवसासाठी कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. दिवसेंदिवस मेहकर व सिंदखेड़ राजा तालुक्यात कोरोना चे वाढते रुग्ण बघता हा निर्णय घेण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 10 हजार 500 वर गेलीय.आतापर्यंत जिल्ह्यात 8 हजार 652 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 615 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.आतापर्यंत जिल्ह्यात 316 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय .गुरुवारी दिवसभरात 215 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दिवसभरात 141 कोरोना बाधितांची नोंद झालीय. तर गुरुवारी दिवसभरात 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसानंतर आज जिल्ह्याच्या काही भागात धुक्याची दाट चादर पसरलीय. दाट धुक्यामुळे रस्ते, शिवार, गाव हे धुक्यात काही वेळासाठी हरवले होते. 20 फुटा पलिकडचे काहीच दिसत नव्हते . त्यामुळे रस्त्यावर वाहनधारकांना लाईट लावून वाहने चालवावी लागत होती. पडलेल्या धुक्याचा काही प्रमाणावर कपाशी, हळद, यासह भाजीपाला पिकावर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील तासाभरापासून पुणे शहराच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना चालकांची कसरत होतेय. नोकरदार वर्ग घरी जाण्याच्या वेळेतच पावसाची सुरुवात झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.
तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरण कार्यभार दिला होता तो बदली आदेश सरकारने रद्द केला आहे.
किशोर राजे निंबाळकर सचिव मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ( तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करून)
एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर
ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर.
शिवसेना खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरु
सीरम इन्स्टिट्यूटने भारतातील कोरोना लसीवरील ट्रायल्स थांबवल्या.
तुकाराम मुंढे याना मुंबई जीवन प्राधिकरण कार्यभार दिला होता तो बदली आदेश सरकारने रद्द केला आहे.
किशोर राजे निंबाळकर सचिव मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ( तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करून)
एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर
ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर.
लातूरच्या मुलाची परिस्थिती नाजूक पण स्थिर. थायमेट नावाचे औषध प्रशान केले आहे. 24 तास निगराणीत ठेवणार आहे. मुलगा डीएड पदवीधर आहे. मराठा क्रांती मोर्च्याचा कार्यकर्त्या असून त्याच्या गावचा काँग्रेस शाखा प्रमुख आहे.
मंत्री रामदास आठवले अभिनेत्री कंगना रनौतच्या भेटीला मुंबईत.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण, महापौरांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती, लक्षणं नसल्यानं घरीच क्वारंटाईन
मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी घेतली शरद पवारांची भेट, परमवीर सिंह यांना पवारांनी 'आस्ते घ्या. भावनिक होवू नका. तुम्हाला उचकवण्यचा प्रयत्न सुरू आहे, त्याला बळी पडू नका,' अशा सूचना दिल्या असल्याची माहिती
भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता, 8 एप्रिल 2020 रोजी या आयोगाची मुदत संपली, कोरोनामुळे या आयोगाचे काम थांबले होते, या आयोगाच्या मुदतवाढीबाबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता, भीमा कोरेगाव बाबत शरद पवार यांनी बोलवली बैठक, बैठकीला अजित पवार,जयंत पाटील,अनिल देशमुख, काँग्रेस मंत्री नितीन राऊत,वर्षा गायकवाड उपस्थित,
अतिरिक्त गृहसचिव सीताराम कुंटे , अमिताभ गुप्ता देखील उपस्थित
कर्जवसुली स्थगितीची मुदत 28 सप्टेंबरपर्यंत वाढवली, सर्वोच्च न्यायालयाचा कर्जदारांना मोठा दिलासा, न भरलेले हफ्ते तूर्तास थकित कर्ज म्हणून घोषित करु नका, न्यायालयाची सूचना
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्टी नदीवरील पूल आजपासून 12 तारखेपर्यंत 12 ते 4 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार. हा पूल ब्रिटिशकालीन असून जीर्ण झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आजपासून तीन दिवस ठराविक वेळेत याचे स्ट्रक्चर ऑडिट होणार आहे. पुलावरील वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून चिपळूण बायपास फरशी तीठा मार्गाने वाहतूक वळवण्यात येण्यार आहे.
औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, सोलापुर व सातारा या जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार,
तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना राज्य सरकारचा दिलासा,
अहमदनगर येथील तलाठी भरतीबाबतही मात्र अजून निर्णय नाही
आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंट टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका
तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाजवळ वीज पडून दोघांचा मृत्यू. तलासरी पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल. संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना घडली घटना.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक सुरु. कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईच्या टायमिंगवर नाराज असल्याची चर्चा.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीवरही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय, न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाचा निर्णय, महाराष्ट्र सरकारला मोठा झटका
नंदुरबार शहराजवळ आसलेल्या शिवण नदी वर गाडी धुण्यासाठी गेलेले दोघे जण पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्याचा प्रवाहात अडकून पडले होते. पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने दोघांनी जुन्या पुलाच्या भिंती (पिलर) चा आसरा घेतला. त्या ठिकाणी ते दोघे दीड तास अडकून पडले होते. तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा उशिरा पोचल्याने प्रश्न चिन्ह आहे.
तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाजवळ वीज पडून दोघांचा मृत्यू. तलासरी पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल. संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना घडली घटना.
प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांना पुण्याला हलवण्यात आले,
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात होणार उपचार,
गेल्या चार दिवसांपासून घरीच राहून सुरू होते शेट्टी यांच्यावर उपचार,
चार दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण ,
अभिनेत्री कंगना रनौत मुंबईतील तिच्या घरी पोहचली.
रायगड -माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचं निधन,
श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जतच्या रूग्णालयात नेण्यात आले..
मात्र व्हेंटिलेटरची गरज असल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू .
रायगड -माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचं निधन,
श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जतच्या रूग्णालयात नेण्यात आले..
मात्र व्हेंटिलेटरची गरज असल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू .
मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही याचा निर्णय आज अपेक्षित, दुपारी दोन वाजता सुनावणी, दोन मुद्द्यांवर निकाल येऊ शकतो, हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही आणि दुसरं म्हणजे अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळणार की नाही? यावरील निर्णयाची अपेक्षा
मराठा आरक्षण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही याचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत. केंद्र सरकारच्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे गेलेला आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारनेही हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देण्याची मागणी केली होती. तर मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण देणे म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा विरोधकांचा आरोप होता.
ऊर्जा विभागात 10 जणांना कोरोनाची बाधा,
मंत्री नितीन राऊत यांचे पीए ,ओएसडी, ओपोरेटर स्टाफ, घराचा कुक असे 10 जण पॉझिटीव्ह,
मंत्री नितीन राऊत यांची टेस्ट मात्र निगेटिव्ह
कंगनाच्या ऑफिसमध्ये जे अनधिकृत बांधकाम केले गेले आहे त्यासाठी बीएमसीकडून कारवाई, तोड कारवाईसाठी गाडी आली, हातोडी आणि बाकी सामान घेऊन आले कर्मचारी, आज अनधिकृत बांधकाम तोडले जाणार
नाशिक- पैशांची गरज असल्याने एका इसमाने बँकेत घुसून मॅनेजर महिलेच्या गळ्याला चाकू लावत केला बँक लुटीचा प्रयत्न, 10 लाखांची मागणी करत महिलेच्या हातावरही केला चाकूने वार , नाशिक शहरातील मध्यवर्ती महात्मा गांधी रोडवरील IDBI बँकेतील सोमवारी भरदुपारी दीड वाजेची घटना , आरोपी अमर बोडकेला सरकारवाडा पोलिसांनी केली अटक, बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, IDBI बँकेआधी 2 बँकेतही घुसण्याचा आरोपीने केला होता प्रयत्न
चंद्रपुर : मॉर्निंग वॉक करणाऱ्या 10 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला... बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, सावली तालुक्यातील कापसी येथील घटना, संस्कार बुरले असं मृतक मुलाचं नाव, आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी कापसी-व्याहाड रोड वर इतर सहकाऱ्यांसोबत मॉर्निंग वॉक साठी गेला असता झाली घटना, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल
इयत्ता 9 ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छेने शिक्षकांच्या मार्गदर्शनखाली शाळेत जाता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाकडून गाईल्डलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. 21 सप्टेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी वर्गसाठी शाळा सुरू करण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली असून त्यासाठी काटेकोरपणे गाईडलान्सचे पालन करणे सुद्धा गरजेचं आहे.
कोल्हापूर शहरात 10 दिवसाचा जनता कर्फ्यू लागणार, 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत कोल्हापुरात जनता कर्फ्यू ,नागरिकांनी स्वतःहून या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे, पोलीस किंवा पालिका प्रशासनाचे कोणतेही निर्बंध नसणार, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा 10 ते 16 सप्टेंबरपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय
एल्गार परिषद प्रकरणात पुण्याच्या कोंढवा परिसरातून सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप यांना आज एनआयएने केली अटक, तिघेही कबीर कला मंचची सदस्य आहे.. शनिवार वाडा या ठिकाणी आणि झालेल्या एल्गार परिषदमध्ये यांचाही सहभाग होता...
रिया सराईत गुन्हेगार नसल्याने रिमांडची गरज नाही : सूत्र
परभणी- निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीसह 2 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक, साडेचार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक, विकास कामांचा निधी देण्यासाठी मागितली होती लाच, अव्वल कारकून अब्दुल हकीम आणि करभाजन यांच्या हस्ते घेतली लाच, गंगाखेड येथील विकास कामांचा निधी देण्यासाठी मागितली होती लाच, परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक
नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून एकमताने निवड.विरोधकांनी सभात्याग केल्यानं त्यांच्या अनुपस्थितीत नीलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नीलम गोऱ्हे यांचं स्वागत करण्यात आलं आहे.
रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ओमनी कारमध्ये बसून मेडिकल टेस्टसाठी घेऊन गेले आहेत.
अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. त्यावर मंत्री अनिल अरब यांनी मुख्यमंत्री आणि सभागृहातील इतर सदस्यांचा अवमान होत असल्याचा दाखला दिला. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ सुरू झाला. मात्र विरोधकांविरोधात सत्ताधार्यांमधून खरा किल्ला लढवला तो छगन भुजबळ यांनी. भाजा हा साधन सूचित पाळणारा पक्ष असल्याचं म्हणत त्यांनी गोस्वामी यांच्या उद्दामपणाचं समर्थन करू नये असा चिमटा घेतला. उदशवं ठाकरे आणि शरद पवार यांच्याविरोधात अवमानजनक वक्तव्य करण्याचा अधिकार गोस्वामी यांना दिला कोणी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी भुजबळांमधला माजी शिवसैनिक जागा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या गोंधळामुळे दुसऱ्यांदा सभागृहाचं कामकाज थांबवण्याची वेळ अध्यक्षांवर आली.
अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. त्यावर मंत्री अनिल अरब यांनी मुख्यमंत्री आणि सभागृहातील इतर सदस्यांचा अवमान होत असल्याचा दाखला दिला. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ सुरू झाला. मात्र विरोधकांविरोधात सत्ताधार्यांमधून खरा किल्ला लढवला तो छगन भुजबळ यांनी. भाजा हा साधन सूचित पाळणारा पक्ष असल्याचं म्हणत त्यांनी गोस्वामी यांच्या उद्दामपणाचं समर्थन करू नये असा चिमटा घेतला. उदशवं ठाकरे आणि शरद पवार यांच्याविरोधात अवमानजनक वक्तव्य करण्याचा अधिकार गोस्वामी यांना दिला कोणी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी भुजबळांमधला माजी शिवसैनिक जागा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या गोंधळामुळे दुसऱ्यांदा सभागृहाचं कामकाज थांबवण्याची वेळ अध्यक्षांवर आली.
वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची सभागृहात घोषणा, यापुढे
वन स्टेट, वन मेरिट राहिल, 70:30 मुळे गुणवंत विद्यार्थी वंचित राहतात, म्हणून राज्य सरकार हा कोटा रद्द करत आहे, अमित देशमुख यांची माहिती
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस, बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या अर्णब गोस्वामींविरोधात सभागृहात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी
विधानपरिषदेच्या उपसभापती निवडणुकीला भाजपने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. गोपीचंद पडळकर
परिणय फुके, प्रवीण पोटे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते मतदान करु शकत नाहीत, तसंच निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत. यामुळे भाजपने कोर्टात धाव घेत मुंबई उच्च न्यायलायत याचिका दाखल केली आहे. कोरोना काळात निवडणूक घेण्याच्या सभापतींच्या भूमिकेबाबत याचिकेद्वारे प्रश्न उपस्थित केले.
सातारा जिल्ह्याच्या हद्दवाढीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. साताऱ्याची महानगरपालिकेच्या दिशेने मोठी वाटचाल सुरु आहे.
हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील ईसापुर रमना गावामध्ये एका 26 वर्षीय तरुणाने गावाशेजारील स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. महेंद्र वाढवे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मध्यरात्री आत्महत्या केल्याचं समजते, आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. अद्याप तरी या प्रकरणी पोलिसात मृत्यूची नोंद झालेली नाही. ईसापुर रमना हे गाव बासंबा पोलीस ठाणे हद्दीत आहे.
अमरावती जिल्ह्यांमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दिड तास जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल सायंकाळी देखील अमरावती जिल्ह्यात सर्वत्र भागात मुसळधार पाऊस झालाय. मागील अनेक दिवसांपासून
अमरावतीकर उकाड्याने हैराण झाले होते. यापावसामुळे वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे.
एनसीबीच्या चौकशीनंतर काल रात्री रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस ठाण्यात गेली होती. या ठिकाणी तब्बल पाच तास बसून तिने आपली तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सिंगला त्याची बहीण प्रियंकाने प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. हे दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचे होते. त्यात असलेली औषधं ही आपत्ती जनक आणि एनडीपीएसमध्ये येणारी होती. याविरोधात रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे कळतं आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात एकीकडे दिवसागणिक कोरोना रुग्णाची संख्या वाढत जात असताना मनपा क्षेत्रात लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यूच्या मागणीवरुन राजकारण होऊ लागले आहे. सांगलीमधील व्यापारी एकता असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे 14 दिवस लॉकडाऊन करावा या केलेल्या मागणीला मिरज-कुपवाडमधील काही व्यापारी संघटनानी विरोध दर्शवला आहे. त्याच बरोबर सांगलीतील शिवसेना नेेते शेखर माने यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगलीत लॉकडाऊन किंवा जनता कफर्यु करू नये अशी विनंती कली आहे. यामुळे एकीकडे जिल्ह्यातील अनेक तालुका ठिकाणे ,गावे स्वयंघोषित जनता कर्फ्यु पाळत असताना सांगली महापालिका क्षेत्रात मात्र जनता कर्फ्यु वरून व्यापारी वर्गामध्ये दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. आता यातून जिल्हा प्रशासन नेमका कोणता तोडगा काढणार आणि महापालिका क्षेत्रातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या जाणार यावर रुग्ण संख्या कधिपर्यत आटोक्यात येऊ शकते याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे.
परभणी : दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी येथील एका रुग्णास जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र आज दुपारी 2 वाजता या कोरणा बाधित रुग्णांने रुग्णालयातून पळ काढला आणि थेट गाव गाठले कोरोना बाधित रुग्ण मुदतीच्या आधी गावात आल्याने गावकऱ्यांनी ही त्याला घराच्या समोरच प्रतिबंधित गेले घरच्यांनीही त्याला घरात न घेता घराबाहेर एक बाज टाकून दिल्याने हा कोरणा बाधित व्यक्ती तब्बल सहा तास गावातच होता वारंवार प्रशासनाला गावकऱ्यांनी कळूनही तब्बल 6 ते 7 तासांनी या रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका आली दरम्यान अचानक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गावात आल्याने गावकर्यांची मात्र मोठी घाबरगुंडी उडाली होती रात्री दहाच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची रुग्णवाहिका गावात दाखल झाली आणि या रुग्णास घेऊन गेल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये सकाळी तीन वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल सायंकाळी देखील जिल्ह्याच्या काही भागात एक तास मुसळधार पाऊस पडलाय. सध्या पडत असलेला पाऊस हा पिकांना अत्यंत फायद्याचा ठरणारा आहे. पडत असलेल्या पावसामुळे वातावरण देखील गारवा निर्माण झाला आहे.
पार्श्वभूमी
दिवसाला 8 लाख 90 हजार लिटर ऑक्सिजन लागतोय!
कोरोना बाधितांच्या उपचारामध्ये प्राणवायू (ऑक्सिजन) महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र काही दिवसांपासून या प्राणवायूची कमतरता राज्याच्या विविध भागात जाणवत असल्याच्या तक्रारी येत असून या सगळ्या परिस्थितीवर राज्याचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग लक्ष ठेवून आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर होत आहे, त्यानुसार सध्याच्या घडीला 890 मेट्रिक टन म्हणजेच दिवसाला 8 लाख 90 हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. भविष्यात ज्या पद्धतीने रुग्ण वाढतील त्याप्रमाणे आणखी प्रमाणात ऑक्सिजन लागण्याची शक्यता नाकारता येत नसून उत्पादकांना ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे.
काही दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80 % व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील.यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60% आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50 % या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा
मराठा समाजाने संयम बाळगावा :अशोक चव्हाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर पुढच्या पर्यायांवर चर्चा झाली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर चर्चा झाली. या वेळी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे निराश न होण्याचं आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, , सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे महाधिवक्ता, विधी विभागाचे सचिव आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर चर्चा झाली. पुढील रणनितीसंदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्यायांवर विचारविनिमय झाला. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, आरक्षणाच्या बाजूने लढलेली वकील मंडळी, अभ्यासक व जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी ( 11 सप्टेंबर) दुपारी 4 वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कंगनाला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा, मात्र कारवाई योग्यच असल्याची बीएमसीची ठाम भूमिका
कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलेला दिलासा 22 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवला आहे. गुरूवारी हायकोर्टात पार पडलेल्या सुनावणीत पालिकेनं कंगनाच्या कार्यालयातील तोड कारवाई तूर्तास करू नये असे निर्देश न्यायमूर्ती काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं जारी केलेत. 14 सप्टेंबरपर्यंत कंगनाच्या वकिलांना आपली बाजू सविस्तरपणे मांडत याचिकेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे, तर 17 सप्टेंबरपर्यंत पालिकेनं त्याला उत्तर देण्याचे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला घेण्याचं निश्चित केलं आहे.
दरम्यान गुरूवारच्या सुनावणीत मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई ही योग्यच असल्याची ठाम भूमिका घेतली. आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी पालिकेनं वकिलांची फौज उभी केली होती. पालिकेतर्फे त्यांचे जेष्ठ वकील अनिल साखरे यांच्यासाथीला जेष्ठ वकील आप्सी चिनॉयही उपस्थित होते. कंगानानं पालिकेकडून प्रमाणित करून घेतलेल्या आराखड्यात अनेक बेकायदेशीर बदल केले आहेत. त्यामुळे हे बांधकाम नियमबाह्य असल्याचं पालिकेनं हायकोर्टात स्पष्ट केलं. तसेच कारवाईला स्थगिती दिली असली तरी तिथली परिस्थिती जैसे थे ठेवण्याची मागणी पालिकेतर्फे कोर्टाकडे केली गेली. पालिकेनं या कारवाईपूर्वी कंगनाच्या कार्यालयातील पाणी आणि वीज जोडणी तोडल्यामुळे आता तिथं काहीच होणं शक्य नसल्याचं यावेळी कंगनाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.