(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | राज्यात आज 286 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 3202 वर
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3202 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 286 ने वाढला आहे, तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 286 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3202 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी तीन जण मुंबईचे तर पुण्याचे चार रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 56 हजार 673 नमुन्यांपैकी 52 हजार 762 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 2916 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 71 हजार 76 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 6108 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 300 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 5 पुरूष तर 2 महिला आहेत. त्यातील 4 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 3 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 7 रुग्णांपैकी 6 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 3202
मृत्यू - 194
मुंबई महानगरपालिका- 2073 (मृत्यू 117)
ठाणे- 13
ठाणे महानगरपालिका- 109 (मृत्यू 3)
नवी मुंबई मनपा- 68 (मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली- 50 (मृत्यू 2)
उल्हासनगर- 1
भिवंडी, निजामपूर - 1
मिरा-भाईंदर- 51 (मृत्यू 2)
पालघर- 5 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 34 (मृत्यू 3)
रायगड- 6
पनवेल- 12 (मृत्यू 1)
नाशिक - 3
नाशिक मनपा- 5
मालेगाव मनपा - 40 (मृत्यू 2)
अहमदनगर- 19 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 9
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव- 1
जळगाव मनपा- 2 (मृत्यू 1)
पुणे- 16
पुणे मनपा- 419 (मृत्यू 44)
पिंपरी-चिंचवड मनपा- 38 (मृत्यू 1)
सातारा- 7 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 12 (मृत्यू 1)
कोल्हापूर- 3
कोल्हापूर मनपा- 3
सांगली- 26
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा- 28 (मृत्यू 2)
जालना- 2
हिंगोली- 1
परभणी मनपा- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-3
बीड - 1
अकोला - 7 (मृत्यू 1)
अकोला मनपा- 7
अमरावती मनपा- 5 (मृत्यू 1)
यवतमाळ- 13
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर- 1
नागपूर मनपा - 55 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 3
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 5664 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 20.50 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
संबंधित बातम्या :
COVID 19: देशात 24 तासात 941 नवीन रुग्ण : आरोग्य मंत्रालय
दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू
Corona Effect | दूध आणि दुग्ध पदार्थांना कोरोनाचा फटका; पेढा विक्रेत्यांवर कोरोनामुळे आर्थिक संकट