एक्स्प्लोर

Coronavirus | रत्नागिरीतील 34 पैकी 21 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तरी भारत दुसऱ्या स्टेजवर कोरोनाशी सामना करत आहे. त्यात रत्नागिरीतून दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील 35 कोरोना संशयितांपैकी 21 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

रत्नागिरी : पुण्याील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याला पाडव्याच्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. ही बाब कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंतर आता रत्नागिरीतील 34 पैकी 21 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट आले आहेत. या 21 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. तर उर्वरित 13 जणांचा अहवाल अद्याप आलेला नाही. सध्या तरी रत्नागिरीत एक जण कोरोनाबाधित असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती देखील सुधारत आहे. तर, त्याच्या पत्नी आणि भावाचे रिपोर्ट देखील यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तरी भारत दुसऱ्या स्टेजवर कोरोनाशी सामना करत आहे. सारी परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा मात्र या काळात सुरळीत सुरु राहणार आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आणि त्याला संपवण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असून देशवासियांनी सहकार्य करावे असं आवाहन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शिवाय, राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतलेल्या निर्णयांचं आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पण, यामध्ये नागरिकांचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे.

जिल्ह्यात कशी घेतली जात आहे काळजी? जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सध्या लॉकडाऊननंतर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सहकार्य करावं असं आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असून त्याकरता स्वयंसेवी संस्थाची देखील मदत घेतली जात आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात 11 संशयित क्वॉरन्टाईन असून जिल्ह्यातील होम क्वॉरन्टाईनची संख्या ही 639 इतकी आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या नागरिकांना सक्तीने स्वत:च्या घरात राहण्यास सांगितले आहे. तर, घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कलम 144 अंतर्गत आतापर्यंत जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी पोलीस, वाहतूक पोलीस जातीनं लक्ष ठेवून आहेत.

चाकरमान्यांचा गावाकडे कल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर आता मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये असलेले चाकरमानी सध्या गाव जवळ करताना दिसत आहेत. चारचाकीला बंदी असल्याने बाईकला पसंती दिली जात आहे. पोलिसांची नजर चुकवत जिल्ह्यातील इतर अंतर्गत रस्ते वापरले जात आहेत. शिवाय, काही जण समुद्रामार्गे बोटीने देखील गावात दाखल होत आहेत. पण, या साऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या कामगिरीबाबत नागरिकांनी कौतुक केले आहे.

Coronavirus | अखेर 'त्या' दाम्पत्याचा गुढीपाडवा गोड; दोन टेस्ट निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nursing Exam Paper Leak: नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?
नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?
Sugar Price Hike: साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र; खाण्याच्या अन् व्यवसायाच्या साखरेचे दर वेगळे ठेवा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची मागणी
साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र; खाण्याच्या अन् व्यवसायाच्या साखरेचे दर वेगळे ठेवा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची मागणी
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Devendra Fadnavis Gen Z Nagpur : नगरसेवक तो मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात? ते देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
नगरसेवक तो मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात? ते देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Embed widget