मुंबई : राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 220 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये 8 रुग्ण मुंबईचे असून 5 रुग्ण पुण्याचे, 2 नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 39 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं आहे, तर आज 2 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे सध्या राज्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आज राज्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका 78 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते. तर कोरोना बाधित असलेल्या 52 वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या आता 10 झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती

  • मुंबई - 92

  • पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) - 43

  • सांगली - 25

  • मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा - 23

  • नागपूर - 16

  • यवतमाळ - 4

  • अहमदनगर - 5

  • सातारा, कोल्हापूर - 2

  • औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक - प्रत्येकी 1

  • इतर राज्य - गुजरात - 1


राज्यात आज एकूण 328 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 4538 जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 3876 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 220 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 हजार 161 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1224 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आतापर्यंत 39 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी पुढीलप्रमाणे
मुंबई- 14
पुणे- 7
पिंपरी चिंचवड- 9
यवतमाळ- 3
अहमदनगर- 1
नागपूर- 4
औरंगाबाद- 1

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या