*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2020 | सोमवार*
1. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 216 वर, पुण्यात 5, मुंबईत 3, तर नागपुरातही दोन रुग्णांची भर, पुण्यात एकाचा मृत्यू
2. देशात कोरोनाव्हायरस दुसऱ्या टप्प्यातचं, सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा, आरोग्य मंत्रालयाचे आवाहन
3. देशात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही, केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन
4. रेशन दुकानावर तीन महिन्यांचे मोफत धान्य मिळणार; मुंबईतील दुकानांची यादी जाहीर तर रेशनकार्ड नसलेल्यांनाही मोफत अन्न धान्य मिळणार
5. वीजेचे दर पुढील पाच वर्षांसाठी कमी होणार, राज्य वीज नियामक आयोगाची माहिती, घरगुती, औद्योगिक आणि शेतीसाठीच्या वीज दरात कपात होणार
6. आरोग्य विभागातील 25 हजार जागांवर भरती प्रक्रियेला सुरुवात, उस्मानाबादेत 7 डॉक्टरांची भरती, जिल्हाधिकाऱ्यांना भरतीचे अधिकार
7.मुंबईतला वरळी कोळीवाडा पोलिसांकडून सील, 4 संशयित रूग्ण आढळल्यानं संपूर्ण परिसरात सॅनिटायझेशन सुरू
8. द्राक्षाला उठाव नसल्यानं उभ्या पिकांवर कुऱ्हाड, पाच हजार एकरवरील द्राक्ष निर्यातीविना पडून, पालघरमध्ये चिकूंची विक्री ठप्प झाल्यानं बागायतदार चिंतेत
9.नाशिकमध्ये पाचशेहून अधिक कामगार ताब्यात, गावी निघालेले तीन ट्रक जप्त तर सोलापुरात रथोत्सव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 22 जणांना अटक
10. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड लाखांच्या घरात, इटलीत 10 हजार तर स्पेनमध्ये सहा हजार मृत्यूमुखी, जगभरात 7 लाख 24 हजार जण कोरोनाबाधित
*BLOG* : BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना ,पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
*BLOG* |‘गेम झीरो’च्या ‘त्या’ काळरात्री फुटबॉल रसिक बनले जैविक बॉम्ब, विजय साळवी यांचा ब्लॉग
*BLOG* | गोष्ट एका डॉक्टरांच्या फोटोची, समीर गायकवाड यांचा ब्लॉग
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2020 | सोमवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Mar 2020 06:59 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -