India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड
त्यामुळेच ही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गावी परतण्यासाठी धडपडत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहातावरचं पोट असणाऱ्या गरिबांना तर दोन वेळचं जेवणंही मिळणं अवघड होऊन बसलं आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देशभरातील जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योगधंदे बंद झाले आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकडजण आपलं राहतं घर सोडून मोठ्या शहरांमध्ये दाखल झाले होते, पण देशातील लॉकडाऊनमुळे सर्वांनी परतीची वाट धरली आहे.
अनेकांनी तर आपल्या कुटुंबासह गावाची वाट धरली आहे. महिलांचाही आपली मुलं कडेवर घेत पायी प्रवास सुरू आहे.
कोणी आश्रयासाठी रस्त्यांचा आधार घेत आहे, तर कोणी रेल्वे रूळांचा; पण जगण्यासाठी आणि घरी परतण्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत.
अनेकांना तर प्रवासासाठी कोणतचं वाहन न मिळाल्यामुळे पायी प्रवास सुरू केला आहे.
दिल्ली, मुंबईमधून लोकांचे लोंढे घरी परतण्यासाठी मिळेत तसा प्रवास करताना दिसत आहे.
प्रत्येकजण तहान, भूक न पाहता आपल्या घराची वाट शोधत आहे.
देशभरातील मोठ्या शहरांच्या रस्त्यांवर घरी परतण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांची गर्दी दिसत आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे एक मोठा वर्ग घरात आहे, तर दुसरीकडे कामाच्या शोधात घरापासून शहरांमध्ये आलेले लाखो लोक आपल्या घरांकडे परतण्यासाठी धडपड करत आहेत. कोणी पायी, कोणी रिक्षाने तर कोणी लपून छपून आपल्या घरी पोहोचण्यासाठी प्रयत्त करत आहे. पाहा फोटो...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -