पिंपरी चिंचवड: कोरोनाच्या संक्रमणानंतर जवळपास दहा महिन्यानंतर कोरोनावरील लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सामान्यांचा जीव भांड्यात पडलाय. राज्यात ठिकठिकाणी आरोग्य केंद्रावर लसीकरणाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रशासन करत आहे. काही राजकारण्यांना मात्र वेळ-काळाचं भान राहिलेलं दिसत नाही. पिंपरीत असाच प्रकार घडल्याचं समोर आलंय.


पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण सुरु असलेल्या आरोग्य केंद्रावरच राजकीय नेत्यांनी वाढदिवस साजरा करण्याचा प्रताप केलाय. महापालिकेचे मनसे गटनेते सचिन चिखले यांचा आज वाढदिवस आहे. सचिन चिखले यांचा वाढदिवस चक्क आरोग्य केंद्रावरच साजरा करण्याचा प्रताप राजकीय नेत्यांनी केला आहे.


Coronavirus Vaccination PM Modi Speech | कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; पंतप्रधान म्हणाले, 'दवाई भी, कड़ाई भी'


पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयात खासदार श्रीरंग बारणेंच्या उपस्थितीत महापौर माई ढोरे यांनी लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. मग प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना लस टोचली जात होती. एकीकडे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत लाभार्थी कोरोनाची लस टोचून घेत होते. या लाभार्थ्यांना लसीकरणानंतर काही रिअॅक्शन तर येत नाही ना याकडे प्रशासन लक्ष देत होते. पण त्याच्याच आतल्या बाजूच्या कक्षात मनसे गटनेते सचिन चिखले यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राजकीय नेते ऐकवटले होते.


Corona Vaccination | 'जे घरी परतलेच नाहीत...' कोरोना योद्ध्यांचं बलिदान आठवताना मोदी भावूक


महापौर ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सभागृह नेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष गटनेते कैलास बारणे, भाजप नगरसेवक संदीप वाघेरे, भाजप स्वीकृत नगरसेवक बाबू नायर या सर्वांनी मनसे गटनेते सचिन चिखले यांच्या हॅप्पी बर्थडेचा सूर आळवला आणि चिखलेंनी केक कापला. नंतर हा केक उपस्थित नेत्यांना भरवण्यात आला. ज्या कक्षात हा प्रकार घडला त्याच्या बाहेरच लसीकरणाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु होती.


या कोरोनाच्या लसीकरणामुळे कोणाला काही रिअॅक्शन तर येत नाही ना हे पाहण्याची जबाबदारी प्रशासनावर असताना महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक मात्र त्याच ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात गुंग होते. त्यामुळे या लसीकरणाचे राजकीय नेत्यांना गांभीर्य आहे का असा प्रश्न जनतेतून व्यक्त होताना दिसत आहे.


Corona Vaccine | आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे