परभणी : परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्लू निष्पन्न झाल्यानंतर गावातील तब्बल साडेतीन हजार कोंबड्या मारण्यात आल्या. यानंतर सेलु तालुक्यातील कुपटा गावातही बर्ड फ्लूने 500 कोंबड्या दगावल्यानंतर हे गावही प्रतिबंधित जाहीर करून आज इथल्या एक किलोमीटर अंतरामधील 469 कोंबड्या मारण्याची प्रक्रिया सुरु आहे. हे काम सुरु असतानाच परभणीच्या पेडगाव तालुक्यातील कुक्कुटपालक राजेश कलंके यांच्या तब्बल 700 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागासह,जिल्हा प्रशासनाचे पथक गावात पोहोचले असून पुढील उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात ६ जानेवारीपासून सुरु झालेल्या बर्ड फ्लूचा संसर्ग कायम असल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.


Bird Flu in Maharashtra | परभणीच्या मुरुंब्यात कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात


परभणीच्या मुरुंबा गावात बर्ड फ्लूनेच 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावातील 1 किलोमीटरच्या परिसरातील उर्वरित साडेतीन हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. यासाठी पशुवैद्यकीय विभागाने अनेक विभागांच्या परवानग्या मिळवल्या त्यानंतर या नष्ट करण्यासाठी एकूण 7 पथकं तयार करण्यात आली. अगोदर कोरोना आणि नंतर बर्ड फ्लूने प्रतिबंधित असलेले मुरुंबा गाव पूर्वपदावर येत आहे. आठ जानेवारी रोजी याठिकाणी हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला तो बर्ड फ्लुने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे मुरंबा गाव हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. यानंतर दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी बर्ड फ्लूने संसर्गित उर्वरित साडेतीन हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होता. त्यामुळे हे गाव राज्याच्या केंद्रस्थानी होते. काल गावात ग्राम पंचायत निवडणूक होती. मात्र सर्वत्र स्मशानशांतता होती.


Bird Flu in Maharashtra | मुरूंबा येथील आठशे कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच; परभणी जिल्हा प्रशासनास अहवाल प्राप्त


मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तत्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.