LIVE UPDATES | कर्नाटकातून पुण्याकडे कारमधून निघालेला बेकायदा गुटका पंढरपूरमध्ये पकडला

दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Feb 2021 11:04 PM
पंढरपूर : सध्या गुटख्यावर पोलिसांनी कारवाया वेगाने सुरु केल्या असल्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून इरटिका सारख्या आलिशान कार मधून गुटका घेऊन जाणाऱ्या दोघांना आज अन्न व औषध विभाग आणि पंढरपूर शहर पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करीत शहरातील सरगम चौकात पकडला. कर्नाटकातील चडचण येथून सासवड येथील निलेश म्हेत्रे आणि निखिल पोतदार हे दोघे आपल्या इरटिका कारमधून महाराष्ट्र सरकारने बंदी केलेला पण मसाला व गुटका घेऊन चालले होते . याची खबर अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यावर पंढरपूर शहरातील सरगम चौकात ही कार पकडण्यात आली असता त्यामध्ये 2 लाखाचा गुटखा सापडला . पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत 11 लाखांची कार आणि 2 लाखांच्या गुटक्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे .
मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात असताना प्रियकरालाच आग लागली. यात प्रियकराचा शनिवारी जळून मृत्यू झाला आहे. तर प्रेयसीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला. विजय खांबे असे मृत तरूणाचे नाव आहे. तर तो नीलिमा पासकळे असे तरुणीचे नाव आहे. विजयचे नीलिमासोबत प्रेम संबंध होते. दोघांचे अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यासाठी विजयच्या कुटुंबियांनी नीलिमा च्या घरच्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र नीलिमीच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या विजयने दारुच्या नशेत प्रेयसीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे निलिमाने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तसेच विजयाच्या त्रासाला कंटाळून आठवड्याभरापूर्वी फिनाईल पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. प्रेयसी उपचारानंतर घरी आल्याने विजय तिला भेटण्यासाठी गेला आणि तिला जाळण्याच्या हेतून पेट्रोल घेऊन गेला. विजयने तिच्या तब्येतीची विचारपूस करत होता. दरम्यान त्याने खिशातून पेट्रोलची बाटली काढली आणि प्रेयसीवर टाकली. जेव्हा नीलिमा आगीत होरपळत होती. तेव्हा विजयला दया आणि तिला वाचवण्याच्या नादात आग लागून विजयचा मृत्यू झाला. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे.
पालघर : वाडा तालुक्यातील तिळसे येथे वैतरणा नदीवर असलेल्या शिव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला अतिभव्य यात्रा भरते ज्यासाठी अनेक जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
तिळसेश्वर येथे पश्चिम वाहिनी मानल्या जाणाऱ्या पवित्र वैतरणा नदी तीरावर उंच चबूतऱ्यावर नंदिकेश्वर शिव मंदिर आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून नदी पात्रात असलेल्या मास्यांमुळे व पूर्वापार चालत आलेल्या परंपरेमुळे महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. ठाणे, पालघर सह अगदी गुजरात राज्यातून येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागते.
यावर्षी कोरोनाचा काळ असल्याने सतर्कता म्हणून मंदिर प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून मंदिरात मुखदर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे असे फलक लावण्यात आले आहेत. यात्रा रद्द झाल्याने अनेक व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार असून भविकांमध्येही नाराजीचे वातावरण पसरले आहे.
पंढरपुर मध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या आलिशान कार वर पंढरपुर पोलीस व अन्नभेसळ विभागाची संयुक्त कारवाई. दोन व्यक्तीसह 2 लाखांच्या गुटख्याची वाहतूक करणारी आलिशान इर्टिका गाडी जप्त
बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती, एक मोठा उद्योगपती पॉर्नोग्राफी रॅकेटला पैसा पुरवत असल्याची खळबळजनक माहिती उघड
सिंधुदुर्ग : वैभववाडीमध्ये भाजपला मोठा धक्का, सात नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा, वैभववाडी नगरपंचायतची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असतानाच मोठी उलथापालथ, सातही नगरसेवक शिवबंधन बांधणार असल्याची माहिती, या सात नगरसेवकांमध्ये चार माजी नगराध्यक्षांचा समावेश, वैभववाडी नगरपंचायतीमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती, 17 च्या 17 नगरसेवक हे भाजपच्या गोटातील होते, पक्षांतर्गत धुसफूसीतून निर्णय घेतल्याचे समजते, या प्रकरणामुळे सिंधुदुर्गात मात्र मोठी खळबळ, वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द
भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे निकटवर्तीय आणि सायन कोळीवाड्यातील माजी नगरसेवक प्रेसिला कदम, अनिल कदम यांनी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
हिंगोलीत सरपंच निवडीवरून जोरदार राडा. सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील घटना. बिनविरोध आलेली बेपत्ता महिला सदस्य ऐन निवडणुकीच्या वेळी आल्याने दोन्ही गट भिडले

गावात तणावाचे वातावरण

भाजप पदाधिकारी शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळे फासून मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचा आज शिवसेना नेते प्रा शिवाजी सावंत यांनी पंढरपुरात सत्कार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी 5 फेब्रुवारी रोजी अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी भाजप पदाधिकार्याच्या तोंडाला काळे फासून मारहाण केली होती. त्यानंतर भाजप नेते राम कदम आणि किरीट सोमया यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता सर्वांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष करत भाजप पदाधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणाऱ्या सर्व शिवसैनिकांचा सत्कार केला. कोणी शिवसेनेच्या नेत्यावर असभ्य भाषेत टीका करेल तर त्याला यापेक्षा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रा शिवाजी यांनी दिला.
अमरावती जिल्ह्यात आजही 200 पेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात 235 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 23 हजार 293 झाली आहे.
सचिन तेंडुलकरच्या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं' असं वक्तव्य केलं होतं. यावर रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी पवारांना लक्ष्य केलं. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धी ची गरज आहे असे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनीळ बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयांत मीडिया शी बोलताना केलें शेतकरी कायद्या चे राज ठाकरे समर्थन करीत आहेत काय या विषयी जयंत पाटलांना मीडिया ने विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केलं.
कोणतं प्रकरण किती महत्त्वाचं हे ठरवत त्यात वकील नेमायचा प्रशासनाला पूर्ण अधिकार- हायकोर्ट कंगना रनौतच्या ऑफिसविरोधातील कारवाई प्रकरणी मुंबई महापालिकेची बाजू कोर्टात मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलासाठी लाखो रुपये फी मोजल्याला विरोध करत सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली
सचिन तेंडुलकरच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निदर्शन सुरु, स्वाभिमानीचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांचे सचिनच्या घरासमोर आंदोलन सुरु, "सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? सचिनला सवाल
शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला, 'जामीन नाकारण्याच्या विशेष #NIA कोर्टाच्या निर्णयात आम्ही दखल द्यावी असं कोणतंही कारण दिसत नाही' - हायकोर्ट
सोलापूर ब्रेकिंग :

- गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांची रेल्वेखाली येवून आत्महत्या

- दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावात आहेत गोकूळ शुगर्स हा साखर कारखाना

- सोलापुरातील रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

- मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यानंतर घरी परतलेच नाहीत

- आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरु
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू असणाऱ्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात आता फेरीवाले संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांनी आज ठिय्या आंदोलन केल आहे. शिवाजी चौक परिसरात असणाऱ्या शिवाजी मार्केटच्या आवारात या सर्व फेरीवाल्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. यावेळी कोल्हापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. गेल्या कित्येक दिवसापासून पालिकेकडून फेरीवाल्यांना विनाकारण अतिक्रमणाची भीती दाखवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत आहे, असा आरोप फेरीवाल्या संघटनांनी केलाय. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन फेरीवाला संघटना काम करत असल्याचा दावा यावेळी फेरीवाला संघटनेचे केलाय.
19 फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती यंदा सहयाद्री देवराईच्या वतीने अनोख्या पद्यतीने साजरी करण्यात येणार आहे. यंदा सहयाद्री देवराईचे सदस्य आपल्या जवळ असणाऱ्या गड किल्ल्यावर जाऊन वृक्ष लागवड करणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी गड किल्ले नाही त्याठिकाणी वृक्ष दिंडी काढण्यात येणार आहे. आणि त्यानंतर मोकळ्या जागेत झाडं लावून त्याचं संगोपन करणार आहेत. याबाबत बोलताना सहयाद्री देवराईचे प्रमुख अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, झाडांची मूळ ओलावा शोधत राहतात. घट्ट होत जातात. तसेच झाडांवर प्रेम करणारे लोक एकमेकांना शोधूनच काढतात. नातं घट्ट होत जातो. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो. आणि बघता बघता महाराष्ट्रात 28 देवराई उभ्या राहिल्या आहेत.
अहमदनगर -
अंधश्रद्धेतून मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याची घटना,
पंडित प्रदीप जाधव आणि माजी विश्वस्त संदीप पालवे पोलिसांच्या ताब्यात,
पाथर्डी पोलिसांनी दोघांनाही घेतले ताब्यात,
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी केली कारवाई
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊर्जा भवन येथे आंदोलन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या काळात ग्राहकांना वाढीव वीज बिल देण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हे वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा ऊर्जामंत्री यांनी केली होती. परंतु पुन्हा एकदा सरकारनं सक्तीने वीज बिल वसुली सुरू केली. यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी अतिरिक्त विजबिलाची होळी करण्यात आली. बारामतीतील महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
परभणी जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून थंडी वाढली आहे.आज तापमान हे घसरून 8.7 अंशावर गेले आहे.त्यामुळे सर्वत्र कमालीचा गारवा निर्माण झालाय. शाळेत जाणारे विद्यार्थी कुडकुडत शाळेत जाताना पहायला मिळत आहेत तर पुन्हा एकदा गरम कपडे आणि शेकोटीचा आधार ह्या थंडीपासून बचावासाठी केला जातोय. पुढचे काही दिवस तापमान हे घसरलेलेच राहणार असल्याचा अंदाज ही हवामान विभागाने दिला आहे.
पुणे सोलापूर हायवेवर फॉर्च्युनर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या गाडीने मागून ट्रॅक्टरला धडक दिली. यात दोन जण जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत.सदर अपघात हा इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 या गावात रात्री 10 च्या सुमारास घडला.अपघात झालेला ट्रॅक्टर हा ट्रॉली मधून माळी नगर साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करतो. रात्री ऊस वाहतूक करीत असताना भरधाव गाडीने मागून ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात गीता माने व मुकुंद माने जागीच ठार झाले. साक्षी माने आणि महादेव नेटके अशी गंभीरपणे जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पौंडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 इतके पॉझिटीव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16 हजार 8 रुग्ण होते. राज्याचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.
मीरा रोड स्फोटाने हादरलं आहे. रात्री 2 वाजल्यानंतर राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होतं होते. जवळपास 12 स्फोट झालं असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले आहेत.

पार्श्वभूमी

स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले 


 


येत्या महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी याबाबत दुजोराही दिलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना विचारले असता त्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल या पद्धतीची व्यूहरचना आम्ही केलेली आहे. याच पद्धतीने आमच्या कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, नाना पटोले म्हणाले.


 


मीरा रोड सिलेंडरच्या स्फोटाने हादरलं


 


रात्रीच्या गडद अंधारात मीरा रोड स्फोटाने हादरलं आहे. रात्री 2 वाजल्यानंतर राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होतं होते. जवळपास 12 स्फोट झालं असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले आहेत.


 


दशलक्ष लोकसंख्येत अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूदर अन् सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात कमी


 


देशात कोरोना संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात होती. अशा परिस्थितही राज्याने कोविडचा चांगला मुकाबला केला आहे. त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी आहे, असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पौंडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 इतके पॉझिटीव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16 हजार 8 रुग्ण होते. राज्याचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.


 


शिवसेना आधिपेक्षाही जास्त ताकदीनं उभी राहिली; अमित शाहंना राऊतांचं सडेतोड उत्तर


 


शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेना संपुष्टात आली असती म्हणणाऱ्यांना कशा प्रकारे या पक्षानं वास्तविकतेचा चेहरा दाखवला याचं प्रमाण दिलं. '1975 मध्ये रजनी पटेल आणि 90 मध्ये (बहुतेक मुरली देवरा यांनी) अशाच आशयाचं वक्तव्य केलं होतं की शिवसेना संपली. पुन्हा 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच काहीसं म्हटलं. पण, या दोन्हीही प्रसंगी शिवसेना आधीपेक्षा जास्त ताकदीनं उभी राहिली', असं राऊतांनी ट्विट करत शाहंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर केलं. जय महाराष्ट्र! लिहित त्यांनी आपल्या उत्तराला अधिक जोर दिला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.