LIVE UPDATES | कुडाळमध्ये डम्पिंग ग्राउंडला भीषण आग

दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Feb 2021 10:24 PM
सिंधुदुर्ग : कुडाळ मध्ये डम्पिंग ग्राउंडला भीषण आग. कुडाळ येथील डम्पिंग ग्राऊंडला अचानक आग लागली असून या आगीच स्वरूप मोठं आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळाली नसली तरी ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
वसई : चार हजारांची लाच घेतल्या प्रकरणी तब्बल ११ वर्षानंतर दोन पोलिसांना वसई न्यायालयान पाच हजार रुपये दंड आणि 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. गाडीच्या अपघाताची नोंद घेऊन गाडीचे कागदपत्रे व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी पोलीस नाईक संजय देशमुख आणि बाबासाहेब बोरकर यांनी चार हजार रुपयांची लाच घेतली होती. सन 2009 ला झालेल्या या गुन्ह्याचा निकाल वसई न्यायालयात ११ वर्षांनंतर लागला असून, सबळ पुराव्यानिशी आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपी क्रमांक एक संजय देशमुख यांना चार वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, नितीन गडकरी गेले 7 वर्ष केंद्रात मंत्री आहेत. मोठे पद असतानाही नागपुरात काही सिमेंटचे रस्ते आणि फ्लायओव्हर शिवाय कुठलेही काम झालेले नाही. येत्या मनपा निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचे आहे : प्रफुल्ल पटेल
कल्याण डोंबिवली महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नियोजित महत्वाकांक्षी रिंगरोड रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यत 72 टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. 75 टक्के भूसंपादन झाल्यानंतर या टप्प्याच्या कामाची निविदा काढणे शक्य होणार आहे. या रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांना आज इरादापत्र वाटण्यात आले.
डोंबिवलीच्या उंबरली टेकडीला पुन्हा वणवा.
पर्यावरण प्रेमी व वनविभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
अमरावती जिल्ह्यात आजही दोनशेच्या जवळ नवे कोरोना रुग्णांची वाढ. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात 192 कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या 23 हजार 058 झाली आहे.
नवापुर पिंपळनेर चौफुली नजीक असलेल्या डायमंड पोल्ट्रीमध्ये साधारण 200 पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 33 हजार कुकुट पक्षांना नष्ट केले आहे. सर्वात आधी डायमंड पोल्ट्री मधील कोंबड्यांना पाण्यात बेशुद्धी चे औषध टाकले त्यानंतर कुक्कुट पक्षांना  लिंकिंग करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुट पक्ष्यांना जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून त्यात चुना निर्जंतुकीकरण औषध टाकून पुरविण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या 200 कर्मचाऱ्यांनी पक्षी नष्ट करण्यासाठी केलेल्या पथकात समावेश आहे.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षाच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्यावर ठेवलेल्या साहित्याला आग लागल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या वीस तासात जिल्हा रुग्णालयातील लॉन्ड्री ला आग लागली या दोन्ही घटनांमुळे जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही स्वतः जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे या पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोचलेत..
दोन्ही घटनेत आग कशी लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही महत्वाचे म्हणजे भंडारा घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते.त्या नंतर ह्या दोन घटना घडल्याने जिल्हा रुग्णालय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..
जालना : एक एप्रिल पर्यंत नोकरभरती पुढे ढकला अन्यथा दिल्लीतील शेतकऱ्यांप्रमाणे आंदोलन करणार, राज्य सरकारला विनायक मेटे यांचा इशारा

अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील निलंबित...

अर्णब गोस्वामी याला जेलमध्ये मोबाईल पुरवणे पडले महागात...

खाते निहाय चौकशीनंतर आंबादास पाटील यांच्यावरती झाली कारवाई...

जेलमध्ये अर्णब गोस्वामी याची बडदास्त ठेवल्याची तसेच फोन पुरवल्याचे उघड..

यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांवर झाली होती निलंबनाची कारवाई ...
कोल्हापूरहून पुण्याला जाताना स्विफ्ट कारची कंटेनर ट्रकला जोरदार धडक. पुणे बँगलोर महामार्गवरील वहागाव येथील घटना. चार जणांचा जागीच मृत्यू. सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. अपघातस्थळी तळबीड पोलिस दाखल.
धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे गेल्या आठवड्यात 80 ते 85 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मृत झालेल्या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत  पाठवण्यात आले होते. हे अहवाल काल रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे यात निष्पन्न झाले आहे.
कोरोनाबाबत काळजी घेऊन राज्यभरातल्या ग्राम सभा परवानगी मिळणार
,
ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांची एबीपी माझाला माहिती
,
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मंगळवारी याबाबतचा आदेश काढणार
,
ग्राम सभेला परवानगी द्या, कृषी कायद्याविरोधात ठराव करायचे आहेत
,
राजू शेट्टी यांनी केलेल्या मागणी नंतर मुश्रीफ यांची एबीपी माझाला माहिती
मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकर भरती पुढे ढकलावी या प्रमुख मागणीसाठी विनायक मेटे यांच्याकडून राज्यभर सरकार आणि राज्यातील मंत्र्या विरोधात आजपासून मराठा एल्गार आंदोलन करण्यात येतेय, जालन्यात आज यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून राज्यभरातून शिवसंग्रामचे कार्यकर्ते या मेळाव्याला हजर झालेत.राज्यातील आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी नोकरभरती सुरू आहे अशा वेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध केलीय. दरम्यान राज्यातील प्रमुख मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा एल्गार मेळावा भरवण्यात येणार आहे.
नारायण राणे- अमित शहा आज जेवणासाठी एकत्र भेटणार आहेत, त्यामुळे यामध्ये राजकीय चर्चा होणार नाहीय याकडे राजकीय बघू नये. आघाडीत लवकर लवकर बिघाडी होईल, याला आजचा मुहूर्त समजावा. तिजोरी खाली आहे, जनेतेचा सरकारवर विश्वास नाही. शेतकऱ्याचे प्रश्न अजून सोडवले नाहीयेत उगाच दिल्लीत जाऊन सपोर्ट करतायत. नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यानंतर अध्यक्षपदावर काँग्रसचा अधिकार आहे त्यावर बाकीच्यांचा डोळा आहे, त्यामुळे ही आघाडी स्वार्थासाठी आहे.
धुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू चा शिरकाव,

तालुक्यातील मेहरगाव परिसरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या आठवड्यात झाला होता 80 ते 85 कोंबड्यांचा मृत्यू....

मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मेहेरगावचा एक किलोमीटरचा परिसर सील
बुलडाणा जिल्ह्यात कडाक्याची थंडी, गेल्या तीन दिवसांपासून पारा घसरला,
आज तापमान 14 अंश सेल्सियस,
माजी कृषी मंत्री, भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांना कोरोनाची लागण. संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणी करण्याचे केले आवाहन.
नागपूरात संतोष किनाके नावाच्या वकिलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर ही मूल न झाल्यामुळे किनाके यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी संतोष किनाके यांची पत्नी कामावर गेली असता घरात त्यांनी गळफास लावून घेतला. सदर पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्येचे प्रकरण नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे
पुणे शहरात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. पुणे जिल्ह्यात दोन मृत्यूंची नोंद आहे . पुण्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू पंधरा एप्रिल 2019 ला झाला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच शहरात एकही मृत्यू झालेला नाही.
चंद्रपूर : घुग्घुस शहरातील साई नगर परिसरात आज दुपारी चोरी... अंदाजे 10 लाखांचा ऐवज लंपास, 17 तोळे सोने, 30 तोळे चांदी आणि 70 हजारांची कॅश गेली चोरीला, पाऊल जंगम हे वेस्टर्न कोलफील्ड चे कर्मचारी आज दुपारी बाहेर गेले असताना चोरट्यांनी साधला डाव.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या शिरीष कटेकोर यांच्यावर भादवी 504 , 505 नुसार पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल.
चंद्रपूर : दुचाकी आणि कारच्या धडकेत 8 वर्षीय मुलाचा आणि वडिलांचा मृत्यू... घुग्गुस-ताडाळी मार्गावरील आज दुपारची दुर्घटना, आयुष दानव (8) आणि उमेश दानव (35) अशी मृतकांची नावं तर सतीश दानव गंभीर जखमी, भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथे राहणारे उमेश दानव दुचाकीने गावाकडे जात असताना भाटिया कोल वॉशरी जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार ने जोरदार धडक दिली ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
बुलढाणा : बुलढाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा. अनेक वर्षापासुनची बुलढाणेकारांची मागणी मंजूर. बुलढाणा , जालना , परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाना मंजूरी. जिल्ह्यातिल जनतेला चांगल्या आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्याना वैद्यकीय शिक्षण मिळणार.
संभाजीराव भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडली आहे. सांगलीत शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाईंनी नितीन चौगुले यांच्यावर कारवाई केली आहे.
नवापूरात 15 वर्षानंतर पुन्हा बर्ड फ्ल्यू. नंदुरबारसह धुळे, नगर, अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकरी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. उद्यापासून नवापूरातील 9 लाख कुकुटपक्ष्यांचे किलिंग ऑपरेशन सुरू होणार.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत उद्दाम भाषेत टीका करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी फसले काळे , भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष काटेकोर याना फसले काळे
भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
संभाजीराव भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान मध्ये फूट. सांगली शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक म्हणून काम करणारे नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानने पदावरून हटवले. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी चौगुले यांच्यावर कारवाई केल्याची एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली माहिती. चौगुले यांना शिवप्रतिष्ठानने पदावरून हटवण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट नाही. दोनच दिवसांपूर्वी शारजिल उस्मानीच्या वक्तव्याच्या विरोधात नितीन चौगुले यांनी सांगलीत केले होते निषेध आंदोलन
कोल्हापूरातून अहमदाबादसाठी नवीन विमानसेवा सुरु करण्यात आली असून ती सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी आठवड्यातून तीन वेळा असणार आहे. तसेच 25 फेब्रुवारी पासून तिरुपती विमानसेवा पुन्हा सुरु होणार आहे. ही सेवा इंडिगो कंपनीकडून दिली जाणार आहे. कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा 24 मार्च 2020 पासून बंद होती. सध्या कोल्हापूरातून बंगळुरु आणि हैदराबादची विमानसेवा आहे सुरु आहे.
रायगड : महाड जवळील वरंध घाट रस्‍ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल दरम्यान महामार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. घाट रस्‍ता व संरक्षक भिंतीच्‍या दुरूस्‍ती कामासाठी वाहतूक बंद करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महामार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येणार
पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील आर्य संगीत प्रसारक मंडळ तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. शुभारंभाच्या या कार्यक्रमाला शरद पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हजेरी लावलीय. पंडितजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने वर्षभर सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 2014 साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आज राज ठाकरे यांना जामीन मिळाला आहे. आज राज ठाकरे स्वत: वाशी कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही औरंगाबादचं नामांतर का झालं नाही? असा सवालही यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला केला आहे.
केंद्र सरकार शेतकरी आंदोलन गंभीरपणे घेत नसल्याचा आरोप करुन शेतकरी हिंसक बनण्याची वाट पाहतयं का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे सरकार अहंकारी असून बहुमताचा अहंकार योग्य नाही असं सांगत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. भविष्यात आणखी काही लाख नागरिक हे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर येतील असंही ते म्हणाले.
भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 50 लाखांहून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. मार्च महिन्यापासून 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय.
नाशिकरोड परिसरातील पवारवाडीतील झोपडपट्टीत आग, चार ते पाच घरांना लागली आग आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट, घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल आग विझवण्याचे काम सुरू
सगळेच पाठिंबा देणारे पक्ष उपमुख्यमंत्री पद मागत आहेत तर अपक्षालाही द्यावे , एक मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री करावे- बच्चू कडू
नाशिक- शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उद्घाटन आणि कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होत आहे, शिवसेना खासदार संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे
कोल्हापूर - शॉर्टसर्कीटमुळे चार एकरातील ऊसाला आग, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान,

कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बोरवडे येथील घटना,

दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझली, काल संध्याकाळी लागली होती आग,

राजेंद्र पांडुरंग कुलकर्णी आणि शिवाजी कृष्णा वारके यांच्या उसाचे मोठे नुकसान,
फी वाढी संदर्भात पालक शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी शनिवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राज्य सरकार पालकांच्या पूर्ण बाजूनं आहे, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं प्रशासनाचे हात बांधले गेलेत अशी खंत वर्षा गायकवाड यांनी बोलून दाखवली. मात्र सरकारनं याप्रकरणी जी तज्ञ समिती नेमली आहे, त्याच्या मार्फत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन फीवाढी आणि ती भरण्यासाठी केल्या जाणा-या सक्तीवर तोडगा काढला जाईल, असं त्या एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना कोल्हापुरात पोलिसांनी घेतले ताब्यात,

शेतकरी कायद्याला विरोध करताना पोलिसांची कारवाई

सचिन सावंत- देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या #भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलीसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?

सचिन सावंत- देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या #भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलीसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर ट्रकला अपघात, एकाचा मृत्यू, खालापुर टोलजवळ ट्रकचा अपघात, ब्रेक फेल झाल्याने अपघात...

अपघातात ट्रकमधील एका प्रवाशाचा मृत्यू...
इस्लामपूरमधील भाजी मंडई स्थलांतरित करण्यावरून विक्रेते आणि नगरपालिकेत वाद पेटला
,
भाजी मंडई मधील विक्रेत्यांनी थेट नगरपालिका इमारतीच्या आवारामध्ये आज सकाळपासून भरवली मंडई....
,
इस्लामपुरातील जुनी गणेश भाजी मंडई स्थलांतरित करण्याचे नगरपालिकेने दिलेत आदेश...
,

जुन्या मंडईत पोलिसांनी बसण्यास विक्रेत्यांना केला अटकाव
,
अनधिकृतपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाईचे नगरपालिका प्रशासनाने दिले आदेश
सांगली-:

इस्लामपूर मधील भाजी मंडई स्थलांतरित करण्यावरून विक्रेते आणि नगरपालिकेत वाद पेटला

भाजी मंडई मधील विक्रेत्यांनी थेट नगरपालिका इमारतीच्या आवारामध्ये आज सकाळपासून भरवली मंडई....

इस्लामपुरातील जुनी गणेश भाजी मंडई स्थलांतरित करण्याचे नगरपालिकेने दिलेत आदेश...


जुन्या मंडईत पोलिसांनी बसण्यास विक्रेत्यांना केला अटकाव

अनधिकृतपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाईचे नगरपालिका प्रशासनाने दिले आदेश
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर ट्रकला अपघात, एकाचा मृत्यू, खालापुर टोलजवळ ट्रकचा अपघात, ब्रेक फेल झाल्याने अपघात...

अपघातात ट्रकमधील एका प्रवाशाचा मृत्यू...
रायगड-

खालापूर पोलिसांनी जप्त केलेल्या बोकडांपैकी सुमारे १८६ बोकड बेपत्ता, अहमदाबादहून बंगलोरकडे वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई, ट्रकमध्ये आढळले होते 271 बोकड, गोशाळेत आढळले अवघे 83 बोकड, चौक येथील गो- शाळेवर अपहाराचा गुन्हा दाखल
कोरोना लसीकरणात राज्यात धुळे जिल्हा प्रथम क्रमांकावर,जिल्ह्यात सर्वाधिक 53.21 टक्के लसीकरण पूर्ण....
बीड: बारामतीच्या मेंढपाळांवर बीडमध्ये हल्ला,

विना परवाना मेंढ्या शेतात नेल्याने धारदार शस्त्राने हल्ला,

गेवराई तालुक्यातील देवा पिंपरी येथील घटना,

हल्ल्यात दोन मेंढपाळ गंभीर जखमी,

अज्ञात शेतकऱ्यांनी केला हल्ला
नागपूर शहरातील महापालिकेच्या उद्यानात येणाऱ्या नागरिकांना शुल्क लावण्याचा एक प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समिती कडे दिला होता... मात्र, त्यास जनतेचा विरोध पाहता स्थायी समितीने तो प्रस्ताव अमलात ना आणण्याचे ठरवत प्रस्ताव मनपा प्रशासनाकडे परत पाठवण्याचे निर्णय घेतले आहे.. या पुढे महापालिकेच्या उद्यानात फिरायला येणाऱ्यांना कोणतेही शुल्क लागणार नाही असे स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी जाहीर केले आहे. नागपूरातील महापालिका क्षेत्रातील उद्याने नागरिकांकडून कोणतेही शुल्क न घेता व्यवस्थित चालवता याव्या यासाठी महापालिका प्रशासनाने फेरप्रस्ताव तयार करावा आणि मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवावा असे निर्देश ही स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी प्रशासनाला दिले आहे... उद्यानाची नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणारे खर्च विविध खाजगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून करता येऊ शकेल का असा विचार ही महापालिका प्रशासनाने करावा अशी सूचना स्थायी समिती ने केली आहे.. तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाने पालिका क्षेत्रातील 69 उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क घेण्याचे प्रस्तावित केले होते.. स्थायी समितीने ही त्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.. त्यानंतर नागरिकांमध्ये रोष उफाळून आले होते.. अनेकांनी महापालिकेच्या अशा धोरणाचा विरोध केला होता.. नागरिकांचा रोष लक्षात घेता स्थायी समितीने उद्यान विभागाचा उद्यानात शुल्क घेण्याचा प्रस्ताव अमान्य करत परत पाठवला आहे...
कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
,
रुग्णाला दिले वैधता संपलेले सलाईन
,
पेठवडगाव येथील महादेव खंदारे यांच्यावर उपचार करताना अक्षम्य चूक
,
रुग्णाच्या मुलाची जिल्हा शल्य चिकित्सकाकडे तक्रार
कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
,
रुग्णाला दिले वैधता संपलेले सलाईन
,
पेठवडगाव येथील महादेव खंदारे यांच्यावर उपचार करताना अक्षम्य चूक
,
रुग्णाच्या मुलाची जिल्हा शल्य चिकित्सकाकडे तक्रार
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोलावरून नागपूरला स्थलांतरित केले जाणार...
राज्य शासनाने दिली मान्यता
नवी मुंबई : पनवेल प्लॅटफॉर्म 7 वर रोह्यासाठी एक्सप्रेस मध्ये चढण्याचा प्रयत्न करणार्या दिव्यांग व्यक्तीस वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रल्हाद पाटील यांना रोहा गाडीत चढायचे होते. पण तोपर्यंत रेल्वे सुरु झाल्याने त्यांना चढता आले नाही. चालत्या ट्रेन मधील लोखंडी राॅडला पकडून त्यांनी चढण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा तोल जावून ते रेल्वेच्या खाली जाण्याची दाट शक्यता होती. मात्र त्या ठिकाणी असलेल्या हरेश महाले यांनी पाहिले. त्यांनी त्वरीत रेल्वे खाली जाणार्या प्रल्हाद पाटील यांचा हात पकडून त्यांना बाहेर खेचले. प्रल्हाद पाटील यांना काॅन्स्टेबल हरेश महाले यांनी बाहेर ओढले नसते तर जीव गमविण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला असता.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंचपदाचा वादही हायकोर्टात. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील सरपंचपदाच्या 35 निवडींना हायकोर्टाची स्थगिती. आरक्षणाच्या रोटेशन पद्धतीवर आक्षेप, 16 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
उस्मानाबादच्या तुळजापूर येथील ढाब्यावर गोळीबार करणाऱ्या 3 आरोपींना परभणी पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार 400 रुपये एक बंदुक जप्त करण्यात आली आहे. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर परभणी, उस्मानाबाद, नाशिकसह अनेक ठिकाणी विविध गुन्हे दाखल आहेत. हे 3 ही जण परभणीच्या गंगाखेडमधील रहिवाशी आहेत.
माजी आमदार कृष्णा हेगडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल, कृष्णा हेगडे शिवसेनेत प्रवेश करणार
बेळगाव : माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या एका वकिलाला अपमानास्पद वागणूक दिली. तसेच वकिलांना उद्धट उत्तरे दिली. त्याच्या निषेधार्थ दोन तास कोर्टा समोरील रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन करून पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दोन तास रास्ता रोको केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी आंदोलन स्थळी येवून वकिलांची भेट घेतली.नंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस उपायुक्त या दोघांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कार्यालयात बोलवून माफी मागायला लावू असे सांगून वकिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण वकिलांनी सगळ्या समोर पोलीस अधिकाऱ्याने माफी मागायला पाहिजे अशी भूमिका घेतली.पोलीस अधिकारी वकिलांना अपमानास्पद वागणूक आणि उध्दट भाषा वापरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे वकिलांनी रास्ता रोको केला.
यवतमाळ : वीजबिल रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजपचे तालाठोको आंदोलन सुरु आहे. आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते
आणि पोलिसांमध्ये धक्काबुकी झाली. पोलीस कर्मचाऱ्यांकडून पत्रकारास मारहाणही करण्यात आली. पत्रकार सचिन येवले याला पोलिसांनी मारहाण केली. हे आंदोलन आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वाखाली सुरु होते. पोलीस अधिकाऱ्यांना आमदार येरावार यांनी खडे बोल सुनावले आहेत.
जालना : जिल्ह्यातील परतूर येथे मराठा आरक्षणाच्या मागणी साठी 40 आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केलय, जिल्ह्यातील साष्ट-पिंपळ गावात गेल्या 17 दिवसापासून आरक्षणाच्या मागणी साठीच ठिय्या आंदोलन सुरु आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलक मागील दोन तासापासून पाण्याच्या टाकीवर चढलीत दरम्यान पोलीस या ठिकाणी पोहचली असून या आंदोलकांना खाली येण्याचे आवाहन पोलीस करत आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले, विधानसभा अध्यक्ष पदावर काँग्रेसचाच हक्क आहे. तीन पक्ष मिळून सरकार बनवलं, तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेऊ , काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद याबाबत तिन्ही पक्ष बसून निर्णय घेणार , सरकार स्थिर आहे, आमचा किमान समान कार्यक्रम ठरलाय , प्रदेशाध्यक्षांना मंत्री पद द्यायचं का? याबाबत हायकमांड निर्णय घेणार , मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतायत , अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी ज्येष्ठ वकिलांची फौज लावलीय
मुंबईच्या जुहूमधील आपल्या फ्लॅटमध्ये झालेल्या अवैध बांधकामप्रकरणी बीएमसीच्या नोटिसीविरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या अभिनेता सोनू सूदनं आपली याचिका परत घेतली आहे. त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की, सोनूने बीएमसीसमोर आपला पक्ष सविस्तर ठेवला आहे. तो आता BMC च्या निर्णयाची वाट पाहात आहे.
संत श्रेष्ठ वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर पहाटे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हास्ते महापूजा पार पडली. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी याच व्यासपीठावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले आहेत
वीज बिल माफ करण्यासाठी आज ठिकाणी भारतीय जनता पार्टी कडून आंदोलन पुकारण्यात आलं...कांदिवली येथील अदानी वीज कार्यालयावर भारतीय जनता पार्टी कडून मोर्चा काढण्यात आला आहे ज्याचं नेतृत्व भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं.... मग लोकांची वीज बिल माफ झाली नाही तर येणाऱ्या दिवसात आंदोलन अधिक उग्र होईल असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला
मुंबईत आज सुध्दा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून मुंबईत पेट्रोल 93.49 रुपये प्रति लिटर तर डिझेल 84.99 रुपये प्रति लिटर झालाय. मागील नऊ महिन्यापासून पेट्रोल डिझेलच्या वाढत चालल्या किंमतीमध्ये आजचा दर सर्वाधिक आहे...या दरवाढीचा फटका मात्र सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसतोय.
राज्यभरात आज महावितरण कार्यालयासमोर वीजबिल दरवाढ रद्द व्हावी यासाठी भाजप आंदोलन करत आहे बीड जिल्ह्याच्या महावितरण कार्यालयासमोर आज भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी गेटला कुलूप लावून आपला विरोध दर्शवला महावितरण कार्यालय कडून ग्राहकांची होणारी लूट थांबवावी यासाठी राज्यभरात आज आंदोलनं होत आहेत महावितरण कंपनीने आपली मनमानी बंद करावी यासाठी आंदोलन आज करण्यात आलं या वेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
बुलडाणा :

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात लोणार सरोवर येथे पोहोचत आहेत. मुख्यमंत्री लोणार सरोवराची पाहणी करणार असून त्या वनकुटी येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर सरोवरातील गायमुख या ठिकाणी पाहणी करीत सरोवराचे अवलोकन करण्यार आहे.
मुख्यमंत्री 2 तास लोणार सरोवर येथे थांबणार असून पुढील दौरा औरंगाबाद येथे राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे

औरंगाबाद - मोहटा देवी (पाथर्डी, नगर )प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निकाल आला, ट्रस्टी, अध्यक्ष यांच्यां विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात तंत्रिकाला बोलावून सोने आणि यंत्र पुरल्याचे आरोप करण्यात आले होते,
त्यासाठी 25 लाख रुपयांची मजुरी देण्यात आली होती.
हे सर्व काम नियमबाह्य तर होतेच शिवाय अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे होते,

यावर काल सुनावणी झाली आहे,

चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत 
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद यादीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव वगळले आहे. आज पर्यंत सभासद म्हणून खासदार प्रताप पाटील यांनी सातबारा व इतर कागदपत्रे कार्यालयात सादर केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या तोंडावर बँकेच्या मतदार यादीत खासदारांच्या नावावरील आक्षेप मंजूर.नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत मतदार म्हणून खासदार प्रताप पाटील यांचे नाव होते. या नावाला नितीन गीरे यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा आक्षेप लातूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी मंजूर केलाय. सेवा सहकारी संस्थेचे सभासद आणि शेतकरी नसतांनाही खासदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सदस्य केल्याचा गिरे यांनी आक्षेप घेतला होता.सेवा सहकारी संस्थेचे सभासद व शेतकरीही नसल्याचा ठपका.
यवतमाळ : पोलिओ लसीकरणादरम्यान घाटंजी तालुक्यातील कापशी गावातील 12 बालकांना पोलिओऐवजी सॅनिटायझरचा डोस दिल्याची गंभीर बाब पुढे आली होती. आता या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांना चौकशीअंती निलंबित केले आहे.
डॉ. महेश मनवर आणि डॉ. भूषण मसराम अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सभासदत्व रद्द,जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या तोंडावर बँकेच्या मतदार यादीत खासदारांच्या नावावरील आक्षेप मंजूर.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण केला असून त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की देशातल्या 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेला आहे. येत्या काळात अजूनही मोठ्या लोकसंख्येवर हा धोका कायम असल्याचं हा अहवाल सांगतोय. त्यामध्ये ग्रामीण भागातील 19.1 टक्क्यांच्या तुलनेत शहरी झोपडपट्टीतील 31.7 टक्के लोकसंख्या आणि 26.2 टक्के इतर लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचं समोर आलं आहे असंही स्पष्ट करण्यात आलंय.
बीड:नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बालकाच्या खुनाचे कारण धक्कादायक,

आपल्या म्हशीला करणी करून मारल्याचा राग मनात धरून त्याचा बदला म्हणून बालकाला मारल्याची दिली कबुली,

पती-पत्नी पोलिसांच्या ताब्यात,

नेकनूर पासून जवळ असलेल्या रत्नागिरी गावात सहा वर्षे बालकाचा काल आढळून आला होता मृतदेह,

कुटुंबाने घातपात झाल्याचा व्यक्त केला होता संशय,

मृत बालकाच्या भावकीतील पती-पत्नीने मुलाचा गळा आवळून केला खून
ठाणे : मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. आता मात्र शहापूर करांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. कारण शहापूर तालुक्यातील 97 आदिवासी गावे आणि 259 पाड्याना पाणीपुरवठा करण्यासाठी 276 कोटी रुपयांच्या भावली धरणाच्या पाणीपुरवठा योजनेस आज पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली. त्यासाठी येत्या 15 दिवसांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच पुढील अडीच ते तीन वर्षात ही योजना पूर्ण करून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागा मार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांचा आढाव गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आज झालेल्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या शहापूर करांना खूप मोठा फायदा होणार आहे.
ज्येष्ठ नाट्य चित्र कलावंत राघवेंद्र तथा अण्णा कडकोळ यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. झपाटलेला आणि झपाटलेला 2 चित्रपटात त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका कमाल गाजली.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सोपवला
विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे, कातरणी, नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाकी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्या कार्यक्रमानुसार 12 मार्च 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 साठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.
कोल्हापूरच्या पावनगडावर सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा, पावनगडावर शेकडोच्या संख्येने तोफ गोळे, आणखी हजारो तोफगोळे सापडण्याची शक्यता, इतक्या मोठ्या संख्येने तोफगोळे सापडण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना, दिशादर्शक फलक लावत असताना मिळाले तोफेचे गोळे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पावनगडाची निर्मिती केली, पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावन गडावर सापडले तोफगोळे
नाना पटोले आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती, पटोले यांनी काल राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग, सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, मंत्र्याची भेट घेऊन आभार मानणार, त्यानंतर विधानसभेत येऊन राजीनामा देण्याची शक्यता
जळगाव : मॉर्निग वॉकला गेलेल्या महिलांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन महिला ठार झाल्याची घटना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सामनेर गावालागत पाचोरा जळगांव रस्त्यावर महात्मा गांधी शाळेच्यासमोर ही घटना घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा गावातील मनीषा पाटील आणि अनिता पाटील या महिला सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या असता ही घटना घडली आहे.

धुळे -

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे धुळे महापालिकेत आगमन,

राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने पाच दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात मधुमती रेवाडकर या महिलेचा काल जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज त्याच्या पतीचा मधुकर रेवाडकर यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी असून त्यांना गोवा बाबुळी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आजगाव वाघबीळ येथे झालेल्या अपघातात डंपर चालक फरार झाला असून डंपर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने कलंडला आहे. मृत्यू झालेल्या पती पत्नीचा मृतदेह नातेवाईकांनी अजून ताब्यात न घेतल्याने याठिकाणी दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे. या डंपरवर असलेला चालक मद्यधुंद अवस्थेत होता तो अपघातानंतर फरार आहे. शिरोडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
सांगली जिल्ह्यातून भेसळयुक्त दूध घेऊन आलेल्या एका टेम्पोसह पंढरपूरच्या डेरीत आढळलेले 1880 लिटर भेसळयुक्त दूध अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केले . पंढरपुरातील सांबरकांठा मिल्क प्रोड्युसर या दूध पेढीत दुधामध्ये मोठ्या प्रमाणात दूध पावडर व तेल यांची भेसळ होत असल्याची माहिती विभागाला मिळाल्यावर त्यांनी हि धडक कारवाई केली . यावेळी सांगली येथून आलेल्या टेम्पोतील १८८० लिटर भेसळयुक्त दुधासह पेढीतील १०० लिटर दुधाचेही नमुने तपासणी करून हे सर्व दूध नष्ट करण्यात आले . अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक तंत्रद्न्य नसल्याने व पेढी विनापरवाना असल्याचे दिसून आल्याने हा व्यवसाय तातडीने थांबवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आले आहेत .
हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यानी शरजिलचा पुतळा जाळण्याचाही केला प्रयत्न.. पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात

शरजिलने एल्गार परिषदेत आपत्तीजनक वक्तव्य करून हिंदू समाजाचा अपमान केला आहे, त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी केली मागणी
सिंधुदुर्ग-

सावंतवाडीतील आजगाव येथे रेडी येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने पाच दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात मधुमती रेवाडकर या महिलेचा काल जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज त्याच्या पतीचा मधुकर रेवाडकर यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी असून त्यांना गोवा बाबुळी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातून भेसळयुक्त दूध घेऊन आलेल्या एका टेम्पोसह पंढरपूरच्या डेरीत आढळलेले १८८० लिटर भेसळयुक्त दूध अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केले . पंढरपुरातील सांबरकांठा मिल्क प्रोड्युसर या दूध पेढीत दुधामध्ये मोठ्या प्रमाणात दूध पावडर व तेल यांची भेसळ होत असल्याची माहिती विभागाला मिळाल्यावर त्यांनी हि धडक कारवाई केली . यावेळी सांगली येथून आलेल्या टेम्पोतील १८८० लिटर भेसळयुक्त दुधासह पेढीतील १०० लिटर दुधाचेही नमुने तपासणी करून हे सर्व दूध नष्ट करण्यात आले . अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक तंत्रद्न्य नसल्याने व पेढी विनापरवाना असल्याचे दिसून आल्याने हा व्यवसाय तातडीने थांबवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आले आहेत
विरार : विरार मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची एक cctv व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीची घटना घरगुती वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विरार पश्चिमेच्या भाजी मार्केट परिसरात काल 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे.

याबाबत विरार पोलीस ठाण्यात 325 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अधिकृत माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे ही घटना नेमकी काय आहे हे मात्र स्पष्ट होत नाही.
धुळे -राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे बारीपाडा येथे आगमन,

पारंपारिक पद्धतीने औक्षण करून राज्यपालांचे स्वागत
,
ग्रामस्थांना राज्यपालांनी विचारली ख्यालीखुशाली
शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा उद्या संभाजीराव भिडे यांची शिवप्रतिष्ठान संघटना करणार निषेध. शरजिलने एल्गार परिषदेत आपत्तीजनक वक्तव्य करून हिंदू समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून उद्या सकाळी 10.30 वाजता, शिवतीर्थ, मारूती चौक, सांगली येथे निदर्शने व आंदोलन होणार.
विरार : विरार मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची एक cctv व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीची घटना घरगुती वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राज्यपालांचे काही वेळातच होणार आगमन,

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे येणार राज्यपाल,

बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात होणार मुख्य कार्यक्रम,

बारीपाडा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त,

आदिवासी बांधवांकडून होणार पारंपरिक नृत्य सादर करून स्वागत,

सांगली : शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा उद्या संभाजीराव भिडे यांची शिवप्रतिष्ठान संघटना करणार निषेध
भाजपाचे ठाणे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या रेल्वे स्टेशननजीकच्या कार्यालयाची दोन अज्ञातांनी तोडफोड केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. हातात काठ्या घेऊन आलेल्या दोन गुंडांनी दरवाजाच्या काचा फोडल्या. त्यानंतर ते पळून गेले. या हल्ल्याच्या वेळी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले हे महापालिकेत होते. तर कार्यालयात कर्मचारी होते. सुदैवाने, त्यातील कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.
सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे रेडी येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आजगाव वाघबीळ इथे हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर शिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.
भंडारा : जिल्ह्यात २०१९ पासुन १५ घरफोड्या करणाऱ्या ६ अट्टल चोरट्यांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक. त्यांच्याकडून सोने, चांदी, मोटरसायकल, टिव्ही, अशा एकुण ३ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल केला हस्तगत. १५ घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडणारी जिल्ह्यातील पहिलीच घटना.
अमरावती जिल्ह्यात आज दीडशेहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची वाढ. दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात 179 कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 22 हजार 276 झाली आहे.
मनसेमधील गळती आणि पक्षबांधणीबाबत कृष्णकुंजवर चर्चा, मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची समिती स्थापन
बीड : बहिणी सोबत शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने खळबळ उडाली मृत विद्यार्थ्यांच्या गळा आवळून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक घटना बीड तालुक्यातील रत्नागिरी गावच्या शाळेत घडली. धनराज मोतीराम सपकाळ वय वर्ष 6 हा विद्यार्थी बहिणींसोबत सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान शाळेत गेला होता. दुपार झाली तरी घरी आला नाही म्हणून शोधाशोध केली असताना मृतदेह शाळेच्या आवारातच आढळून आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या गळ्याभोवती हाताने आवळ्याच्या खुणा आहेत यावरून हा खून केल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.
उस्मानाबाद : तुळजापूरहून लातूरकडे जाणाऱ्या महामार्गावरील भंडारी शिवारात एका हॉटेलचालकावर दोन गोळ्या झाडल्याची घटना आज घडली आहे . यात हाटेलचालक गंभीर जखमी झाले असून , पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे .
एल्गार परिषदेत शरजील उस्मान याने केलेल्या वक्तव्याची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री योग्य ती कारवाई करतील असा मला विश्वास आहे. शिवसेना सत्तेपुढे कधीही नतमस्तक झालेली नाही, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र आहे. मात्र गेली अनेक वर्षे शिवसेने सोबत असणाऱ्या भाजपला आता शिवसेना वाईट दिसू लागली आहे. कालपर्यंत आंब्याच्या झाडाखाली बसलेली भाजप आज बाभळीच्या झाडाखाली बसल्याने ते असे वक्तव्य करीत असल्याची टीका धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
ठाणे : महानगरपालिकेने आज पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लसीकरण सुरु केले. यामध्ये पोलीस आणि सफाई कर्मचारी यांना लस देण्यात येत आहेत. याच मोहिमेत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील आज पहिली लस घेतली. त्यांच्यासोबत सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि ठाणे पोलीस दलातील इतर अधिकारी आणि कर्मचारी देखील आज लस टोचून घेतली. पोलीस दलाचा प्रमुख म्हणून मी आज लस टोचून घेतली असून कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता ही लस टोचून घ्यावी असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केले. तसेच लसीकरण करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी कौतुक केले. ठाणे महानगरपालिकेने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत केवळ 18 दिवसात दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. एकूण 114.9 टक्के उद्दिष्ट आतापर्यंत अतिशय कमी दिवसात ठाणे पालिकेने पूर्ण केले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण आजपासून सुरू करण्यात आले. ज्यामध्ये पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यास परवानगी. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीच्या अटीनं सुरु होणार. विद्यार्थ्यांना कोविड संकट पाहता तूर्तास 75 टक्के सक्तीच्या उपस्थितीची अट बंधनकारक नाही- उदय सामंत
यवतमाळ : पोलिओ लसीऐवजी 12 बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आलं होतं. या प्रकरणी उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय दाखल असलेल्या 12 बालकांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता मुलांची प्रकृती उत्तम असल्याचे मुलांच्या पालकांनी सांगितले आहेत. तसेच मुलांसह पालक गावकडे रवाना झाले आहेत.
नवी मुंबई : नेरूळ येथील बालाजी टेकडीवर दारू पिक बसलेल्या तरूणांना हटकण्याचा प्रयत्न करणार्या पोलीस हवालदाराला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. सोनवारी रात्री 12 वाजता नेरूळ येथील बालाजी टेकडीवर चार तरूण दारू पित रात्री धिंगाना करीत होते. यावेळी त्या ठिकाणावरून जाणार्या हवालदार संतोष राठोड यांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. सिव्हील ड्रेसवर असलेल्या संतोष राठोड यांनाच उलट शिवीगाळ करीत तरूणांनी मारहाण केली. यावेळी काचेची बाटली त्यांच्या तोंडावर मारण्यात आल्याने त्यांना गंभीर जखम झाली असल्याने अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाण करून पळून गेलेल्या तीन आरोपींना नेरूळ पोलीसांनी अटक केली आहे. अजून एक आरोपी फरार आहे. सदर पकडण्यात आलेले आरोपी हे बालाजी टेकडीच्या खाली असलेल्या झोपडपट्टीत राहणारे आहेत.
बेळगाव : टाटा एस वाहनात दुचाकी ठेवून त्या वाहनाला धक्का मारत अनोख्या पद्धतीने पेट्रोल,डिझेल दरवाढीचा रयत संघातर्फे निषेध करण्यात आला. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.गवताचे भारे आणण्यासाठी, शेतीचे साहित्य नेण्यासाठी शेतकरी दुचाकीचा वापर करतात. शेतातील कामासाठी ट्रॅक्टर वापरला जातो. पेट्रोल दर 72 रू वरून 91 रू. वर पोचला आहे.डिझेलच्या दरात देखील वाढ झाली आहे.त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दर कमी करावेत अशी मागणी करण्यात आली. नुकत्याच मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देखील गरीब आणि शेतकरी विरोधी आहे.यासाठी इंधनाचे दर कमी करून नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी अर्थमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
सांगली : वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट याठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रात दूषित पाण्यामुळे कृष्णानदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. मळी मिश्रित पाण्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नदीच्या पात्रातील पाणी पातळी कमी आहे, त्यामुळे वाहता प्रवाह कमी आहे. यामध्ये नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळल्याने नदीतील हजारो मासे
मृत्यूमुखी पडले आहेत. नदीच्या पात्रात ठिकठिकाणी मृत माशांचा खच पाहायला मिळतं आहे. कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणत सध्या ओढे, नाल्यांद्वारे दूषित पाणी मिसळत आहेत, याशिवाय मळी मिश्रित पाणीही मिसळत असल्याने या माशांचा मृत्यू झाल्याची अंदाज स्थानिक मच्छिमार व्यक्त करत आहेत. तर नदीपात्रामध्ये माशांचा मृत माशांचा खच पडल्याने आसपास दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात पसरली आहे.
दरम्यान कृष्णा नदीच्या पात्रात माशांच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर सांगली च्या प्रदूषण महामंडळाकडून मासे मृत्यूची दखल घेण्यात आलेली आहे, आणि प्रदूषण महा मंडळ अधिकारी नवनाथ औताडे यांनी आपल्या पथकासह आहे,प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नदीतील माशांच्या मृत्यूची आणि प्रदूषणाची पाहणी केली आहे.
सरकार किल्लाबंदी का करत आहे? सरकार शेतकऱ्यांना घाबरतं का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांना दाबण, मारणं आणि धमकावणं सरकारचं काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं काम करावं. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करणं हे देशासाठी योग्य नाही : राहुल गांधी
आरएसएस सोडून या देशात सर्वजण दहशतवादी आहेत. तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचीच ही दुरावस्था करत आहात, असं म्हत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला. सोबतच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरही सडकून टीका केली.
अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात अखेर खटला दाखल,
मुंबई पोलिसांनी दाखल केली याचिका, मुंबई पोलिसांच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल, मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याबाबत खटला दाखल
मुंबई महापालिकेचा आज शिक्षण विभागाचा सुरुवातीला बजेट सादर होत होतं. यावेळी अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील हे बजेट सादर करण्यासाठी उपस्थित राहणार होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्याने सहा आयुक्त रमेश पवार हे सभागृहात उपस्थित राहिले. शिक्षण समितीचे अध्यक्ष संध्या जोशी सभागृहात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2021-22 चा वार्षिक अंदाजपत्रक शिक्षण समिती अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. मग हे बजेट वाचण्यासाठी रमेश पवार हे आपल्या खुर्चीवर बसले. पण वाचण्याआधी त्यांना पाणी प्यायचे होते. समोर एक सैनिटायझर बॉटल आणि एक पाण्याची बॉटल होती. यातील पाण्याची बॉटल वगळता त्यांनी चुकून सॅनिटायझरची बॉटल घेतली आणि ते सॅनिटायझर प्यायले. त्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली
पुण्यातील सारथी संस्थेमध्ये आज संस्थेमधे आज तारादूतांचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं . मात्र या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने सारथी कार्यालयासमोर जमलेल्या तारादुतांनी 19 फेब्रुवारी नंतर पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय . या तारादुतांनी त्यांना मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी डिसेंबर महिन्यात सारथी संस्थेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं होत. त्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन चर्चा केली जाईल असं आश्‍वासन तारादुतांना देण्यात आलं होतं. त्यानंतर तारादूतांनी त्यांचे आंदोलन मागे घेतलं होतं . मराठा समाजातील वेगवेगळ्या घटकांना मार्गदर्शन मिळावं यासाठी सारथी संस्थेकडून राज्यात तीनशेहून अधिक तारादुतांची एका वर्षाच्या करारावर नियुक्ती करण्यात आली होती. एक वर्ष संपल्यावर आपल्याला पुन्हा मुदतवाढ मिळावी आणि लॉकडाउनच्या काळातील रखडलेला पगार मिळावा अशी या तारादुतांची मागणी आहे.

वर्धमान नगर परिसरातल्या स्वामी नारायण शाळेसमोर पालकांचे आंदोलन,

शाळेने फी च्या मुद्द्यावरून शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी शाळेने बनवलेल्या whatsapp ग्रुप मधून बाहेर काढले,

त्यानंतर आज सकाळपासून शेकडो पालक शाळेच्या मुख्य दारासमोर गोळा झाले असून शाळा त्यांना कोणतेही उत्तर देत नसल्याचे आरोप आहे..

आम्ही फी भरायला तयार आहोत, मात्र शाळा वर्षभर चालली नसल्याने शाळेने काही प्रमाणात फी कमी करावी अशी आमची अपेक्षा आहे.. मात्र, शाळेने ते केलेले नाही असा पालकांचा आरोप आहे ..
गडचिरोली पोलिसांचा अनोखा पुढाकार, अतिदुर्गम आदिवासी गावातील महिला शेतकऱ्यांची सुरू केली सहल, 45 शेतकऱ्यांना घेऊन पोलिसांची ही सहल आज झाली रवाना, गडचिरोली जिल्ह्यातील परंपरागत शेती ऐवजी नव्या तंत्राचे दर्शन घडविणार ही सहल, जिल्ह्यातील एटापल्ली या अतिदुर्गम भागातील संवेदनशील कोटमी परिसरातील आहेत
पुण्यातील सारथी संस्थेमध्ये आज संस्थेचे अधिकारी आणि तारादूत यांच्यामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. सारथी संस्थेकडून राज्यभरात नेमण्यात आलेल्या तीनशेहून अधिक तारादूतांनी त्यांना मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी सारथी संस्थेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन चर्चा केली जाईल असं आश्‍वासन तारादुतांना देण्यात आलं होतं. त्यानंतर तारादूतांनी त्यांचे आंदोलन मागे घेतलं होतं . मराठा समाजातील वेगवेगळ्या घटकांना मार्गदर्शन मिळावं यासाठी सारथी संस्थेकडून राज्यात तीनशेहून अधिक तारादुतांची एका वर्षाच्या करारावर नियुक्ती करण्यात आली होती. एक वर्ष संपल्यावर आपल्याला पुन्हा मुदतवाढ मिळावी आणि लॉकडाउनच्या काळातील रखडलेला पगार मिळावा अशी या तारादुतांची मागणी आहे.
परभणीचे तापमान घसरले असून जिल्ह्याचे तापमान 9.1 अंशावर गेले आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून सर्वत्र थंड वातावरण आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आयकर विभागाचं मुंबई मुख्यालय असलेल्या सिंदिया हाऊसला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. बलार्ड इस्टेट भागातील इमारतीचा चौथा मजला जळून खाक झाला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाल्याची शक्यता आहे.
पुणे : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडण्याचं सत्र सुरु असतानाच सदर प्रकरणी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये शरजीलविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही अधिकृत माहिती दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर याबाबतचा विचार सुरु असल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे.

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महापालिकाचे बजेट सादर होणार आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. कोविड संकटामुळे मुंबईकरांचं कंबरडं मोडलंय आणि महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता आहे. गेलं आर्थिक वर्ष कोविडमध्ये गेल्याने अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ 25 ते 30 टक्के महसूल आतापर्यंत जमा झाला आहे. कोरोनामुळेच जाहिरातदार, हॉटेल, बिल्डरांना प्रिमियमध्ये सूट देण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईकरांवर यावर्षी करवाढ टळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणासाठी पालिका कोणत्या उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे."

पार्श्वभूमी

आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचे बजेट सादर होणार
मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महापालिकाचे बजेट सादर होणार आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. कोविड संकटामुळे मुंबईकरांचं कंबरडं मोडलंय आणि महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता आहे. गेलं आर्थिक वर्ष कोविडमध्ये गेल्याने अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ 25 ते 30 टक्के महसूल आतापर्यंत जमा झाला आहे. कोरोनामुळेच जाहिरातदार, हॉटेल, बिल्डरांना प्रिमियमध्ये सूट देण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईकरांवर यावर्षी करवाढ टळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणासाठी पालिका कोणत्या उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे."

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानीवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडण्याचं सत्र सुरु असतानाच सदर प्रकरणी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये शरजीलविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.


 


OBC Creamy Layer | ओबीसी क्रिमी लेअरसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही अधिकृत माहिती दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर याबाबतचा विचार सुरु असल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे.


 


खार येथील घरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कंगनाला हायकोर्टाचा दिलासा; 5 फेब्रुवारीला सुनावणी


 


मुंबई : वांद्रे येथील बेकायदा बांधकामांनंतर कंगनाने खार येथील राहत्या फ्लॅटमध्येही अनधिकृत बांधकाम केल्याचं उघडकीस आलं आहे. हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनाने दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र दिंडोशी न्यायालयाने तिचा दावा फेटाळून लावला आहे. याविरोधात कंगना रनौतनं आता हायकोर्टात अपील केलं असून 5 फेब्रुवारीपर्यंत या बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत.


 


Farmers Protest | आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार कुठलीही नुकसान भरपाई देणार नाही. केंद्र सरकारच्या वतीने याबाबत लोकसभेत अधिकृत माहिती देण्यात आली. 70 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात दीडशेपेक्षा जास्त शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.