Corona Update | ॲक्टिव्ह केसेसमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर, ठाणे दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
राज्यात आज 8 हजार 369 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 3 लाख 27 हजार 31 इतकी झाली आहे. आज 7 हजार 188 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या (ॲक्टिव्ह केसेस) रुग्णसंख्येमध्ये आता पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. तर ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आणि मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या पुण्यात 36 हजार 810 ॲक्टिव्ह केसेस आहेत, ठाण्यात 36 हजार 219 ॲक्टिव्ह केसेस तर मुंबईत 23 हजार 704 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यात आज 8 हजार 369 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 3 लाख 27 हजार 31 इतकी झाली आहे. आज 7 हजार 188 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 82 हजार 217 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 1 लाख 32 हजार 236 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 246 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 16 लाख 40 हजार 644 नमुन्यांपैकी 3 लाख 27 हजार 31 (19.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 79 हजार 676 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 77 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 7 हजार 188 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.72 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 82 हजार 217 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 246 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.75 टक्के एवढा आहे.
Murlidhar Mohol | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनावर कशी केली मात? कोरोनाशी लढताना!