पालघर : शहरात मिशन कंपाउंड येथे राहणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच टिमा हॉस्पिटल येथे उपचार घेत असणाऱ्या इतर 9 कोरोनाबाधितांचे देखील दुसऱ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हे अहवाल प्राप्त झाले आहेत. याबरोबरच बोईसरमधील दलाल टॉवर भागातील 35 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कातील उर्वरित 4 संशयितांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले असल्याचे समजते आहे.
टिमा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या त्या 9 कोरोना बाधितांमध्ये सफाळे येथील रुग्णांचा आणि एका 3 वर्षीय मुलीच्या संपर्कातून कोरोनाची लागण झालेल्या काटाळे येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या परिचारिकेची मुंबईमध्ये करण्यात आलेली पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता या परिचारिकेचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
बोईसरमधील दलाल टॉवर भागातील 35 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबातील इतर 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या तिघांना वगळता इतर सर्व अतिजोखमीच्या सहवासातील संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, पालघर जिल्ह्यांत कोरोना बाधितांचा आकडा 160 वर पोहोचला असून त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांपैकी 59 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या एकूण कोरोना तपासण्यांपैकी 2648 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 217 कोरोना चाचण्यांचे रिपार्ट येणं बाकी आहे.
संबंधित बातम्या :
Lockdown3 | महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली
Lockdown 3.0 | देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा; 17 मे पर्यंत राहणार चालू
लॉकडाऊनमुळे राजस्थान मधील कोटात अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी मायभूमीत दाखल