धुळे : राजस्थान राज्यातील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आज त्यांच्या स्वगृही सुखरूप आणण्यात आलं. त्यात धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासण्या केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाले करण्यात आलं. या विद्यार्थ्यांना चौदा दिवस होम क्वॉरंटाईन राहण्याचे आदेश देखील करण्यात आले आहेत. आपल्या पालकांसोबत घरी जाताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघावयास मिळाला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हा विषय लावून धरला होता.
राजस्थान राज्यातील कोटा येथे देशभरातून विद्यार्थी प्रवेश परिक्षांची तयारी करण्यासाठी येतात. यात महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश असतो. दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू लागल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्याता आली. परिणामी अनेक राज्यातील विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातीलही अनेक विद्यार्थी राजस्थानमध्ये अडकून पडले. या विद्यार्थ्यांना अखेरीस महाराष्ट्रात आणण्यात आलं आहे. गेल्या महिन्याभरापासून हे विद्यार्थी एकाच जागी अडकून होते.
Lockdown 3.0 | देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा; 17 मे पर्यंत राहणार चालू
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
राज्य सरकारने विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर एसटीच्या धुळे विभागातून 70 बसेस कोटाकडे रवाना झाल्या. या बसेसमधून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना आज स्वगृही पोहोचविण्यात आलं. त्यात धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. यात धुळ्यातील 18 विद्यार्थी धुळे बसस्थानकात उतरले. नंतर त्यांची आरोग्य विभागातर्फे तपासणी देखील करण्यात आली. उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणालाही कुठलाही शारीरिक त्रास होत नसल्याची चाचपणी झाल्यानंतर त्यांना हातावरती होम क्वॉरंटाइनचा शिक्का देखील मारण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याआधी पालकांना, विद्यार्थ्यांना काही सूचना करण्यात आल्यात. त्यात विद्यार्थ्यांना घरी गेल्यानंतर होम क्वॉरंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आलेत. चौदा दिवस या विद्यार्थ्यांना घरात होम क्वॉरंटाइन रहावं लागणार आहे . या 14 दिवसांच्या दरम्यान कुठलाही त्रास जाणवल्यास त्यांना धुळे शासकीय अधिकार्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात.
यंदा शाळांनी फी वाढ करु नये, शिक्षण विभाग लवकरच निर्णय जारी करणार
राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांची तयारी तेथे करून घेतली जाते. या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दळण-वळणाची साधने बंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले होते.
Coronavirus Zone | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून झोननिहाय यादी, महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये