मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध जिल्हे आणि शहरात अडकलेल्या विद्यार्थी, प्रवासी, पर्यटक, कामगार यांना घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. ज्या शहरात किंवा जिल्ह्यात कंटेनमेंट झोन आहेत, अशा भागातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.


राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी नियमावली




  • जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांनी ठरवलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची लोकांची वाहतूक होणार नाही. या झोनमध्ये कोणी आत येणार नाही अथवा इथून बाहेर जाणार नाही.

  • मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, पिंपरी चिंचवड इथे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली जाईल.

  • या भागात जिल्हाधिकारी किंवा आयुक्त परवानगी देत नाही, कंटेनमेंट झोनच्या सीमा ठरत नाही. तोपर्यंत या भागातून कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही.

  • मालेगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या हॉटस्पॉट विभागात कोणतीही प्रवासी वाहतूक होण्याआधी अतिदक्षता घेण्यात यावी.

  • जे कोणी प्रवास करणार आहेत त्यांच्याकडे डॉक्टरचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ज्यात हे नमूद केलं असेल की त्या व्यक्तीला फ्लू, किंवा फ्लू सारख्या आजारची लक्षणे नाही आणि त्यांचे स्क्रिनिंग करण्याची गरज नाही.

  • नोडल अधिकाऱ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गंतव्यस्थानी तिथल्या नोडल अधिकाऱ्याला त्या प्रवाशांची माहिती देणे आवश्यक.

  • तिथला नोडल अधिकाऱ्याने परवानगी दिली की मग प्रवासाला सुरुवात होऊ शकते.

  • ई पास जे महाराष्ट्र पोलीस वापरतात ती सिस्टीम नोडल अधिकारी पण बदल करून वापरू शकतात.


Lockdown 3.0 | देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा; 17 मे पर्यंत राहणार चालू

आजपासून 'श्रमिक विशेष' रेल्वे चालणार!
लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी 'कामगार दिन' म्हणजे आजपासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी प्रोटोकॉलनुसार संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या एकाच ठिकाणी चालवल्या जातील. या श्रमिक स्पेशलच्या समन्वय आणि सुरळीत कारभारासाठी रेल्वे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.


Coronavirus Zone | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून झोननिहाय यादी, महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये