मुंबई : देशात आज तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करताना केंद्र सरकारने दारुची दुकानं आणि पानाची दुकानं सुरु करण्याची सशर्त संमती दिली आहे. मात्र, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन असणाऱ्या ठिकाणीच ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप राज्याकडून निर्यण घेण्यात आलेला नाही. त्यामुळे तळीरामांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने सुद्धा बंद करण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल येणे बंद झाले. परिणामी दारुच्या दुकाने सुरू करण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्यानुसार केंद्राने परवानगी दिली आहे.


या लॉकडाऊन काळात राज्य सरकारने काही गोष्टींमध्ये सुट दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. यात रेड झोनसाठी अतिशय कमी तर ग्रीन झोनसाठी सर्वाधिक सुट देण्यात आली आहे.

Lockdown3 | महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली

ग्रीन झोनमध्ये 'या' गोष्टी सुरु राहणार?

  • ग्रीन झोन जिल्ह्यामध्ये 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.

  • ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याचा विचारही सरकार करत आहे. परंतु, दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.

  • 17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करणार आहेत.


Corona Update | राज्यात आज 1008 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे प्रमाणे दारू, पान गुटखा व तंबाखू विकणाऱ्या दुकानांनी ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवायचे आहे. तसंच एकावेळी पाच पेक्षा जास्त लोक दुकानात नसतील याचीहीही खबरदारी घ्यायची आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की याबाबत विभागाकडून कुठल्याही सूचना देण्याऐवजी, दारूची दुकाने सुरू करायची का नाहीत हा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोडण्यात येईल. कारण या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरच्या नेमक्या परिस्थितीचे अधिक चांगले आकलन आहे. राज्यशासनाने टाळेबंदी त शिथिलता आणल्यानंतर काही बिअर व दारू बनवणाऱ्या उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे.

Corona Zones | जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयाच्या झोननिहाय यादीवर काही जिल्ह्यांचा आक्षेप