मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज  67 हजार 13 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 62 हजार 298 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.34 टक्के  झाले आहे. राज्यात आज 568 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे.


मुंबई गेल्या 24 तासात 7410 कोरोना बाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 7410 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8090 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाक 11 हजार 143 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्के आहे. सध्या 83 हजार 953 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 50 दिवसांवर गेला आहे.


India Corona Cases Update : देशात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक, 24 तासांत पहिल्यांदाच सव्वा तीन लाख रुग्णांची नोंद


राज्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात


राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्न समारंभ दोन तासात आटोपून केवळ 25 जणांच्या उपस्थित सोहळा पार पाडावा, नाहीतर 50 हजारांचा दंडाची आकारण्यात येणार आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पास नाही पण फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.  दिवस आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :