मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन राज्यातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.  'ब्रेक द चेन' अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या नियमावलीत लग्न सोहळ्यांसाठीही नवे निर्बंध जारी केले आहेत. या नव्या निर्बंधांनुसार, आता लग्नसमारंभ केवळ 2 तासांत आटपावा लागणार आहेत. तसेच 25 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे. 


राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. अशातच आता जर या काळात तुम्ही लग्न करणार असाल किंवा तुमचं लग्न नियोजित असेल तर राज्यात आता लग्न समारंभांसाठी नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 


नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. एवढंच नाहीतर विवाह सोहळा केवळ दोन तासांत आटपावा लागणार आहे. तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या किंवा नियमांचा भंग करणाऱ्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तर संबंधित कार्यालय किंवा समारंभस्थळावरही कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालयानं नियमभंग केल्यास कोरोना आपत्ती असेपर्यंत कार्यालय बंद करण्यात येईल. दरम्यान, आधी लग्नसोहळ्यांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा होती. पण आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्नसोहळा उरकावा लागणार आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं होतं. परंतु, तरिही राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच होता. त्यामुळे आता हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत आज (22 एप्रिल) रात्री आठपासून 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :