मुंबई : सध्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी बुलडाण्यात जिल्हा परिषेदेचे डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवाचे रान करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर्सही अलर्ट राहून सेवा देत आहेत. मात्र, या कोरोना फायटर्सना वेळेत पगार मिळू शकले नाहीत. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील तीन बाबुंच्या कामचुकारपणामुळे वेतनास विलंब झाला आहे. अखेर सीईओंनी हे प्रकरण गांभीर्याने घेत वरिष्ठ सहायकास तडकाफडकी निलंबित केले. तर दोघा लिपिकांची बदली करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात कर्तव्यात हयगय करणाऱ्यांना या कारवाईमुळे चपराक बसली आहे.

पगारास विलंब होत असल्याबाबत काही तक्रारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. कोरोनायुद्धाच्या काळात सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन होत नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेत काही दिवसांपासून चर्चेत होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ सहायक जयदीप ताठे यांच्यासह अधिनस्त लिपिक अनिल पवार व किशोर उबरहंडे यांनी सेवाविषयक बाबींसह डॉक्टरांच्या वेतनासंदर्भात दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीईओंनी ताठे यांना निलंबित केले. तसेच अनिल पवार व किशोर उबरहंडे यांची अन्य विभागात बदली करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :






Photo booth Corona Test | फोटो बूथ तंत्रज्ञानाद्वारे कशी होईल कोरोनासाठीची स्वॅब चाचणी?