औरंगाबाद : कोरोनाच्या संकटात हाताला काम नसल्याने अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हॅकर्स आणि ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्यांनी कोरोनाच्या संकटाला माध्यम म्हणून वापरत लोकांची ऑनलाइन फसवणूक करायला सुरुवात केली आहे. यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. खोट्या जाहिराती पसरवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. लॉकडाऊननंतर सायबर क्राईमच्या तक्रारी वाढत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहात? मग पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत 18 ते 40 वयोगटातील बेरोजगाराला प्रतिमाह साडेतीन हजार इतका बेरोजगार भत्ता मिळेल. लॉकडाऊनच्या काळात दोन महिन्यात मोफत नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, हॉटस्टार देऊ, 50 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर झाले, सरकार आरोग्य मंत्रालयातर्फे 50 जीबी मोफत इंटरनेट, अशा प्रकारचे अनेक मॅसेज आपल्या मोबाईलवर पाठवले जातात. त्यासोबत एखादी लिंक दिली जाते. डाऊनलोड करायला सांगून त्यात आपले बँक खात्यासह आधार, पॅन कार्डची माहितीही भरायला सांगितली जाते. लोक फसतात अन् फ्रॉड करणारे त्यांचं अकाउंट रिकामं करतात.


कोरोना संकटाने आपल्याला स्वयंपूर्ण होण्याचा संदेश दिलाय; पंतप्रधान मोदींचा देशभरातील सरपंचांशी संवाद


ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक
सध्या कोरोनाची भीती दाखवून आपली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी संपली असून ती त्वरित प्रीमियम रक्कम भरल्यास दंड माफ होईल, प्रीमियम भरण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे नाव असलेले बनावट बँक खाते दिलं जातं. बँकांनी तीन महिन्याचे ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय ग्राहकांना देऊ केला आहे. ईएमआय स्थगित करायचे आहेत का? अशी विचारणा केली जाते. ग्राहकांकडून बँक खात्याचा तपशील मागवला जातो, शिवाय मोबाईलवर वन टाइम पासवर्ड पाठवला जातो. तो फोनवर सांगा असे ग्राहकांना सांगून ग्राहकांच्या खात्यातून पैसे लांबविले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या तपासामध्ये समोर आल्या आहेत. त्यामुळे सावधान राहणे गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाच्या संकटात आपले खाते रिकामे झाल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको त्यामुळे काळजी घ्या.


PM interacts with Sarpanch | पंतप्रधान मोदींचा सरपंचांशी संवाद; ई-ग्राम स्वराज अॅप, स्वामित्त्व योजना सुरु