एक्स्प्लोर

अंबाबाई मंदिरात महिलांचा गोंधळ, पुजाऱ्याला बाहेर काढलं!

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन आज आणखी तीव्र झालं आहे. श्री पूजक बाबुराव ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिरात प्रवेश करू दिल्याच्या निषेधार्थ आज पुजारी हटाव संघर्ष समितीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केलं.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन आज आणखी तीव्र झालं आहे. श्री पूजक बाबुराव ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिरात प्रवेश करू दिल्याच्या निषेधार्थ आज पुजारी हटाव संघर्ष समितीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केलं. ठाणेकर पिता-पुत्रावर कारवाईची मागणी करत आंदोलकांनी पुजाऱ्यासह प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. धरणे आंदोलन सुरु असतानाच बाबुराव ठाणेकर पुन्हा मंदिरात गेल्याच समजताच जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी मंदिरात जाऊन केलेल्या घोषणाबाजीनंतर मंदिरात उडलेल्या गोंधळात ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिरा बाहेर काढण्यात आलं. यामुळं मंदिर परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. अंबाबाई मंदिरातील देवीच्या पेहरावा वरून सुरु झालेल्या वादानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समन्वय बैठकीमध्ये श्री पुजक अजित ठाणेकर आणि त्यांचे वडील बाबुराव ठाणेकर यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश न करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिल्या होत्या. मात्र शुक्रवारी बाबुराव ठाणेकर यांनी मंदिरात प्रवेश केला. या प्रकाराबद्दल काळातच  पुजारी हटाव कृती समितीने पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना यांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिराबाहेर काढलं होतं. ठाणेकर यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांच्या सूचनेच उल्लंघन केल्याबद्दल संताप व्यक्त होत असतानाच शनिवारी पुन्हा बाबुराव ठाणेकर यांनी पोलीस बंदोबस्तात मंदिरात प्रवेश केला. यामुळे संताप अनावर झालेल्या पुजारी हटाव कृती समिती  पोलीस उपाधीक्षक डॉ. अमृतकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान गुन्हा दाखल असलेल्या ठाणेकर पिता-पुत्रांना अटक का होत नाही, असा सवाल करत पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बाबुराव ठाणेकर यांना दिलेल्या बंदोबस्ताबद्दल अमृतकर हे समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने आक्रमक झालेल्या संघर्ष समितीनं आज जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केलं. या वेळी ठाणेकर पिता-पुत्रासह प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अंबा मातेचा जयघोष करण्यात आला. यानंतर डॉ. सुभाष देसाई यांच्यासह विजय देवणे माजी आमदार सुरेश साळोखे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत पोलिसांबद्दल रोष व्यक्त केला. या आंदोलनाचा उद्रेक झाल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला. संघर्ष समितीकडून या वेळी ठाणेकर पिता-पुत्रा विरोधात लेखी तक्रार पोलीस उपधीक्षक डॉ अमृक्तकर आणि पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांच्याकडे देण्यात आली. संघर्ष समितीकडून देण्यात आलेली हे शेवटची तक्रार असल्याचं सांगत इथून पुढे आंदोलन आपल्या हातात राहणार नाही असा संजय पवार यांनी इशारा दिला. यानंतर पोलिस उपधीक्षक डॉ प्रशांत अमृतकर यांनी या प्रश्नी उद्या पोलीस अधीक्षकांनी बैठक आयोजित केली असल्याच सांगत बाजू काढून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरू असतानाच बाबुराव ठाणेकर हे मंदिरात आल्याचं आंदोलकांना समजलं. या मूळ संतप्त झालेल्या जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी मंदिरात जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली तर मंदिर आवारातील वातावरण हि तणावपूर्ण झालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत बाबुराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर काढलं. या जुना राजवडा पोलीस ठाण्यात झालेलं धरणे आंदोलन आणि त्यानंतर मंदिरात झालेल्या गोंधळानंतर मंदिर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयात होणाऱ्या बैठकीकडे आता सर्वांच लक्ष लागून राहील आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
आमच्या गावचा रस्ता कधी करता? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल, संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
आमच्या गावचा रस्ता कधी करता? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल, संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 
कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget