Parbhani: वीज दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढलेल्या कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना परभणीच्या पाथरी शहरातील एकता नगरमध्ये घडलीय. महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काजीपणामुळं ही घटना घडली असल्याचा आरोप मृत व्यक्तीचे नातेवाईक करीत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. 


अखिल अब्दुल रहमान अन्सारी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अन्सारी परभणीच्या पाथरी शहरातील एकता नगर मध्ये परमीट घेऊन वीज दुरुस्तीसाठी विद्युत खांबावर चढला. मात्र, अचानक उद्युत प्रवाह सुरु झाल्यानं अन्सारीचा विजेचा धक्क्यानं मृत्यू झाला. महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळंच अन्सारी यांचा मृत्यू झाल्याचा संतप्त नातेवाईकांचा आरोप आहे. 


महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेवून पाथरी-परभणी महामार्गावर रस्तारोको केला. मात्र स्थानिक आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मध्यस्ती केल्यानं नातेवाईकांनी आंदोलन मागं घेतलं.  20 मिनिटे सुरु असलेल्या या आंदोलनामुळं पाथरी-परभणी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.


अंबरनाथमध्ये रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू
अबंरनाथमध्ये याच आठवड्यात ट्रक आणि रिक्षा यांच्यात अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.  गंधकानं भरलेल्या ट्रकनं पेट घेत कार आणि रिक्षाला धडक दिली  या विचित्र अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, कार, ट्रक आणि रिक्षाही तिन्ही वाहनं जळून खाक झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha