मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अजूनही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 40 हजार 805 नव्या रुग्णांची भर पडली असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 27,377 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.


राज्यात आज 44 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.89 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 67 हजार 955 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के झाले आहे.  सध्या राज्यात 20 लाख 86 हजार 24 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3377 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  


मुंबईत तिसरी लाट ओसरताना


मुंबईत गेल्या 24 तासात 2250 नव्या रुग्णांची वाढ झालीय. तर, 13 मृत्युची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, 217 जणांनी कोरोनावर मात केलीय. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 34 हजार 833 वर पोहचलीय. यापैकी एकूण 9 लाख 95 हजार 786 जण कोरोनामुक्त झालेत आणि 16 हजार 535 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 19 हजार 808 रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईत मागील काही दिवसांपासून स्थिरावलेली कोरोना रुग्णांची संख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे.  


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha