एक्स्प्लोर
Advertisement
ग्राहकाकडून 60 रुपये अधिक घेतले, लातूरच्या पीव्हीआरला 1 लाखांचा दंड
लातूर : मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाची मनमानी सहन करणाऱ्या प्रेक्षकांसाठी समाधानकारक बातमी आहे. लातूरच्या पीव्हीआर मल्टिप्लेक्सला प्रेक्षकाकडून तिकिटापेक्षा अधिकचे पैसे घेतल्यामुळे एक लाख रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहक मंचाने प्रेक्षकाच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली.
12 एप्रिल 2016 रोजी लातूरचे महादेव झुंजे हे कुटुंबासह ‘दी जंगल बूक’ सिनेमा पाहायला गेले होते. झुंजेंनी तीन तिकीटे खरेदी केली. त्यासाठी प्रत्येकी 140 रुपयांप्रमाणे 420 रुपये मोजले. प्रत्यक्षात तिकीटांवरच्या पैशांचा हिशोब केला तेव्हा तिकिटांमागे 20 रुपये अतिरिक्त घेण्यात आल्याचं समोर आलं
अतिरक्त पैसे का घेतले, याचं उत्तर देण्यास व्यवस्थापनाने टाळाटाळ केली. त्यानंतर जास्तीचे 60 रुपये मागण्यासाठी महादेव झुंजे यांनी आधी पीव्हीआर आणि नंतर ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
पीव्हीआरने 60 रुपये अतिरिक्त घेतले म्हणून महादेव झुंजेंनी एक लाख रुपये आर्थिक दंड, आर्थिक त्रासापोटी 60 रुपये, नोटीशीचा खर्च म्हणून 1500 रुपये तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार आणि 18 टक्के व्याजासह रक्कम अशी 2 लाख 5 हजार 560 रुपयांची मागणी केली होती.
ग्राहक मंचाने पीव्हीआरच्या व्यवस्थापनाला नोटीसा बजावल्या. पण व्यवस्थापनातर्फे कुणीही हजर झालं नाही. म्हणून एकतर्फी निकाल देत मंचाने पीव्हीआरला 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. दंडापैकी 90 हजार रुपये मंचामध्ये ग्राहक कल्याण सहाय्यता निधीत जमा करायचे आहेत. तर तक्रारदाराला 10 हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल. त्याशिवाय झुंजेंचे जास्त घेतलेले 60 रुपये परत द्यावे लागतील. मानसिक त्रासाबद्दल 2 हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी 1 हजार देण्याचे आदेश देण्यात आलेत.
मल्टीप्लेक्समध्ये जाऊन सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांना अनेकदा व्यवस्थापनाच्या मुजोरीचा सामना करावा लागतो. मल्टिप्लेक्समध्ये बाऊन्सर्स दिसतात. पाण्याच्या बाटल्यापासून खाद्य पदार्थ्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा असतात. छापील किंमतीपेक्षा कितीतरी चढ्या दराने वस्तू विकल्या जातात, अशा गैरप्रकारांना लातूरच्या निकालामुळे चांगलाच धडा मिळू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement