एक्स्प्लोर

Constitution Day Live: संविधान दिनाचा उत्साह, देशभरात कार्यक्रमांचं आयोजन, पाहा प्रत्येक अपडेट्स

Constitution Day: आज देशभरात संविधान दिनाचा उत्साह आहे.  संविधान दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.  

LIVE

Key Events
Constitution Day Live: संविधान दिनाचा उत्साह, देशभरात कार्यक्रमांचं आयोजन, पाहा प्रत्येक अपडेट्स

Background

Constitution Day:   26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.  

Constitution Day : आज संविधान दिन... का साजरा केला जातो हा दिवस? इतिहास आणि रंजक गोष्टी

हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आज देशभरात संविधान दिनाचा उत्साह आहे.  संविधान दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.   सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. या कार्यक्रमात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष संबोधित करणार आहेत. भाषणांनंतर राष्ट्रपती संविधानाची प्रस्तावना वाचन करतील. ज्याचं लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे.  

असा असेल कार्यक्रम

1- सकाळी 10.55 वाजता राष्ट्रपती संसदेत पोहोचतील

2- सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत होईल.  

3- सकाळी 11.01 मिनिटांनी संसदीय कार्य मंत्री संबोधित करतील

4- सकाळी 11.05 वाजता लोकसभा अध्यक्ष संबोधित करतील

5- सकाळी 11.11 वाजता पंतप्रधान मोदी संबोधित करतील

6- सकाळी 11.26 वाजता उपराष्ट्रपतींचं संबोधन होईल 

7- सकाळी 11.41 वाजता राष्ट्रपती संविधान सभेतील चर्चेचं डिजिटल अवतरण तसेच 'संविधानिक लोकशाहीवर आधारीत ऑनलाइन प्रश्नोत्तरी' चं उद्घाटन करतील

8- सकाळी 11.50 वाजता राष्ट्रपतींचं संबोधन होईल

9- दुपारी 12.10 वाजता राष्ट्रपती संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करतील.

11:33 AM (IST)  •  26 Nov 2021

Constitution Day Ceremony Live: संसद भवनात संविधान दिवस कार्यक्रम सुरु, 14 विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार    

Constitution Day Ceremony Live: संसद भवनात संविधान दिवस कार्यक्रम सुरु, 14 विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार  

11:26 AM (IST)  •  26 Nov 2021

आजचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करण्याचा दिवस

संविधान दिवस समारंभात पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, आजचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या पवित्र जागेवर काही लोकांनी भारताच्या कुशल भविष्यासाठी मंथन केलं होतं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्या दिवशी 2008 साली मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानं देश हादरुन गेला होता. आपल्या सैन्यानं दहशतवाद्यांशी निकराचा लढा दिला होता. यात जवानांसह काही नागरिकांनी बलिदान दिलं होतं. या सर्व वीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे.  

10:32 AM (IST)  •  26 Nov 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय संविधान दिनानिमित्त शुभेच्छा

मुंबई,“भारतीय संविधान जगातील सर्वोत्कृष्ट संविधान, भारतवासियांची ताकद, जगण्याचा मूलाधार आहे. संविधानानं देशातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिला आहे. सन्मानानं जगण्याचं, इच्छेनुसार वागण्याचं, निर्भयतेने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. विकासाची समान संधी उपलब्ध केली आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेला भारत अखंड, एकसंध ठेवण्याची ताकद संविधानात आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांताच्या नागरिकांना एकजूट ठेवून त्यांच्या मनात एकता, समता, बंधूतेचा विचार रुजवणं संविधामुळेच शक्य झालं आहे. सर्वधर्मसमभाव, मानवतावाद संविधानाचा गाभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व संविधानामुळेच अबाधित आहे. भारतीय संविधानाचं हे महत्व सर्वांपर्यंत पोहचवण्याचा, देशाच्या भावी पिढीला संविधान साक्षर करुन लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आज संविधान दिनाच्या निमित्तानं करुया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतील संविधान व लोकशाही व्यवस्थेचं महत्व अधोरेखित करुन समस्त देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

10:31 AM (IST)  •  26 Nov 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहोत. याच कारणामुळे यंदाचा "संविधान दिन" आणखी औचित्यपूर्ण, विशेष महत्त्वाचा आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर हा दिन साजरा करताना जगातील एक सार्वभौम आणि बलशाली प्रजासत्ताकाची निर्मिती करताना 'नागरिक' केंद्रबिंदू मानून, त्यांच्या अधिकार-हक्काला, हिताला संविधानात सर्वोच्च स्थान देण्यासाठी आपले ज्ञान, विद्वत्ता पणाला लावण्याचे अपूर्व योगदान देणाऱ्या संविधानाच्या शिल्पकारांना या निमित्ताने मानवंदना देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

भारतीय घटनेचे शिल्पकार महाराष्ट्र सुपुत्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह घटना समितीच्या सदस्यांना अभिवादन करतानाच मुख्यमंत्री श्री. ठाकरे संदेशात म्हणतात, भारतीय संविधान जगात मार्गदर्शक असे मानले जाते. संविधानाची उद्देशिका स्वयंस्पष्ट आहे. नागरिकांना हक्क बहाल करतानाच, त्यांना अधिकारांची जाण- त्यांचे भान राहील असा समतोल आपल्या संविधानात आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यातून राष्ट्रीय एकात्मता या मुल्यांचा अखंड जागर करणारे हे संविधान भारतीय नागरिकांनी आजच्या दिवशी स्वतः ला समर्पित केले आहे. त्याच आधारावर आपली आतापर्यंतची  सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली आहे, ती आणखी लोकाभिमुख व्हावी. विकासाचे प्रत्येक पाऊल, योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचावी यासाठी आपण कटीबद्ध होऊया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, त्याची अमृत फळं सर्वच जनमानसाला चाखायला मिळावित यासाठी संविधानातील मार्गदर्शक तत्वांबाबत जागरूक राहुया. त्यांचा अंगिकार करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे

09:35 AM (IST)  •  26 Nov 2021

असा असेल संसदेतील कार्यक्रम

1- सकाळी 10.55 वाजता राष्ट्रपती संसदेत पोहोचतील

2- सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत होईल.  

3- सकाळी 11.01 मिनिटांनी संसदीय कार्य मंत्री संबोधित करतील

4- सकाळी 11.05 वाजता लोकसभा अध्यक्ष संबोधित करतील

5- सकाळी 11.11 वाजता पंतप्रधान मोदी संबोधित करतील

6- सकाळी 11.26 वाजता उपराष्ट्रपतींचं संबोधन होईल 

7- सकाळी 11.41 वाजता राष्ट्रपती संविधान सभेतील चर्चेचं डिजिटल अवतरण तसेच 'संविधानिक लोकशाहीवर आधारीत ऑनलाइन प्रश्नोत्तरी' चं उद्घाटन करतील

8- सकाळी 11.50 वाजता राष्ट्रपतींचं संबोधन होईल

9- दुपारी 12.10 वाजता राष्ट्रपती संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करतील.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 04 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines |  7 AM |  एबीपी माझा हेडलाईन्स | 04 Jan 2025 | Marathi News 24*7China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमानGraphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Embed widget