एक्स्प्लोर

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा; हुसेन दलवाई यांचं सोनिया गांधींना पत्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये दलवाई यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा.

मुंबई : सत्तास्थापनेवरुन शिवसेना-भाजपमधील कलगीतुरा संपण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे भाजपशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. शरद पवारांनी 'आम्ही विरोधी बाकावरच बसणार', अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी मागणी काँग्रेसमधील काही नेत्यांची आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये दलवाई यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा. दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत खूप फरक आहे. त्यांचं राजकारण आता सर्वसमावेशक झालं आहे. त्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देण्यास हरकत नाही. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसने जेव्हा राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती, तेव्हा शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा. भाजपचं राजकारण टोकाचं आहे. मॉब लिन्चिंगबाबतच्या त्यांच्या भूमिका चुकीच्या आहेत. असेही दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काल (01 नोव्हेंबर) काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका मांडली दरम्यान, विधासनभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी हुसेन दलवाई एबीपी माझाच्या चर्चासत्रात सहभागी झाले होते. विधासभेच्या निकालाची आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर सत्तास्थापनेबाबत बोलताना हुसेन दलवाई यांनी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतं, असे संकेत दिले होते. कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत संकेत दिले होते. शिवसेनेबाबत कॉंग्रेसचं वेट अँड वॉच, कॉंग्रेस नेते हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला  जाती-धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार नाही : सुशीलकुमार शिंदे राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे फ्रॅक्चर्ड मॅनडेट आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कोणत्याही धर्म आणि जातीवर राजकारण करणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते दिल्लीला का गेले हे मला माहित नाही. आम्ही जनतेचा कौल मान्य करुन विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करायला तयार आहोत. सोनिया गांधींशी माझी चर्चा झालेली नाही, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. मला पक्ष श्रेष्ठींनी विचारलं तर त्यांना मी कळवेन," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. पाहा काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे? भाजप-शिवसेनेच्या भांडणाला बळी पडू नका : निरुपम "भाजप शिवसेनेचा तात्पुरता वाद केवळ सत्तेसाठी आहे. नंतर ते पुन्हा एकत्र येणार. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या वादात काँग्रेसने पडू नये. सत्तेत आल्यानंतर ते परत एकत्र येतील आणि आम्हाला शिव्या घालतील. काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करु शकतात?" असं ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे. शिवसेना-भाजपच्या तमाशात काँग्रेसने पडू नये- संजय निरुपम | मुंबई | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget