एक्स्प्लोर

आमदार नितेश राणे यांना उपअभियंत्यावरील चिखलफेक प्रकरणी अटक

चिखलफेक झालेले उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या फिर्यादीनुसार काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह जवळपास 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग : उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी नितेश राणेंसह त्यांच्या समर्थकांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. शेडेकर यांच्या फिर्यादीनुसार नितेश राणे यांच्यासह जवळपास 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, नरसेवक अभि मुसळे, मेघा गांगण, स्वाभिमान शहराध्यक्ष राकेश राणे,  संदीप नलावडे, निखिल आचरेकर, राजन परब, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर, माजी पं. स. उपसभापती बबन हळदिवे, विठ्ठल देसाई, किशोर राणे, शिवसुंदर देसाई, सचिन पारधीये यांना अटक करण्यात आली आहे. नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या चिखलफेकीचा त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. नारायण राणेंनी लेकाच्या कृत्याबाबत माफीही मागितली होती. 'नितेश राणे यांचं वर्तन चुकीचं होतं. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या चिखल आणि खड्ड्याविरोधातील राग आणि आंदोलन समजू शकतो, मात्र नितेश यांच्या समर्थकांनी केलेली हिंसा चुकीची आहे. मी याला अजिबात पाठिंबा देत नाही', अशा शब्दात राणेंनी निषेध नोंदवला होता. मी त्याला माफी मागायला का सांगणार नाही? तो माझा मुलगा आहे. जर एखादा बाप स्वतःची चूक नसताना माफी मागू शकतो, तर मुलाला तर माफी मागावीच लागेल, असंही राणेंनी सांगितलं होतं. काय घडलं होतं? नितेश राणे, स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधलं. सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करते, तो तुम्ही पण आज अनुभवा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. संपूर्ण कणकवली तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल विचारत नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूलपर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. शिवाय कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना धक्काबुक्कीही केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Nagpur Tiger Attack News: हृदयद्रावक! वाघाच्या हल्ल्याच्या भीतीने जीवाच्या आकांताने पळत सुटले, पाय घसरून चुमुकला लेक बंधाऱ्यात पडला; बापानं वाचवण्यासाठी उडी घेतली, पण...
हृदयद्रावक! वाघाच्या हल्ल्याच्या भीतीने जीवाच्या आकांताने पळत सुटले, पाय घसरून चुमुकला लेक बंधाऱ्यात पडला; बापानं वाचवण्यासाठी उडी घेतली, पण...
Buldhana Crime News: डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!
डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!
Jalgaon Farmers News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget