एक्स्प्लोर
VIDEO : ‘सोनू तुला मोदींवर भरवसा नाय काय‘
औरंगाबादमधील आंदोलनाचं नेतृत्त्व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले. सचिन सावंत यांनी मस्के पेट्रोल पंपासमोर बीड बायपासवर काही काळ रास्ता रोको देखील केला.
औरंगाबाद : काँग्रेससह विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला औरंगाबादमध्येही चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. औरंगाबादमधील आंदोलनाचं नेतृत्त्व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले. सचिन सावंत यांनी मस्के पेट्रोल पंपासमोर बीड बायपासवर काही काळ रास्ता रोको देखील केला. पोलिसांनी सावंतांना ताब्यात घेतले.
यावेळी सचिन सावंत यांनी ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ या गाण्याचं विडंबन करत सरकारवर निशाणा साधला.
सोनू तुला मोदींवर भरवसा नाय काय, नाय काय
मोदींच्या भाषणात असतो जुमला, जुमला
पेट्रोल डिझेलचा भाव वाढला वाढला
जनतेचा खिसा आता फाटला फाटला
खिशाचे भोक कसे खोल खोल खोल खोल
मोदी सरकार जनतेशी खरं बोल...
सोनू तुला मोदींवर भरवसा नाय काय नाय काय
मोदी फडणवीस कसे तुपाशी तुपाशी
जनतेचे पोट मात्र उपाशी उपाशी
डॉलरचा रेट गेला आकाशी आकाशी
रुपयाचा भाव झाला गोल गोल गोल गोल
जुमल्यांची करु आता पोल खोल
सोनू तुला मोदींवर भरवसा नाय काय नाय काय...
औरंगाबादमध्ये बंदला उस्फुर्त प्रतिसाद
औरंगाबादेत काँग्रेसच्या वतीने आज शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर ते आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे कार्यकर्ते शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर निदर्शने करत होते. कुठे टू व्हीलर हातगड यावर ठेवली होती तर कुठे बैलगाडी आणली होती. शहरातील 50 पेक्षा अधिक आणि जिल्ह्यातील 200 पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल असोसिएशन घेतला होता.
औरंगाबादमधील आंदोलनाचं नेतृत्त्व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले. सचिन सावंत यांनी मस्के पेट्रोल पंपासमोर बीड बायपासवर काही काळ रास्ता रोको देखील केला. पोलिसांनी सावंतांना ताब्यात घेतले.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement