एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करा : काँग्रेस
महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं देशाचे मुख्य निवडणूक आयोगाकडे निवेदन दिले.

नवी दिल्ली : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नियमांचा भंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरच आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदाची भाषा केली, शिवाय त्यांचे कार्यकर्ते पैसेही वाटताना सापडले, त्यानंतरही स्थानिक अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आज देशाचे मुख्य निवडणूक आयोगाकडे हे निवेदन दिले.
मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत, निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुनील अरोर यांच्यापुढे शिष्टमंडळानं आपलं गाऱ्हाणं मांडलं. तसेच भाजपच्या उमेदवारानं निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या मर्यादेच्या दुप्पट खर्च केला आहे, असा आरोप करुन त्याबाबतची माहितीही तातडीनं जारी करावी अशीही मागणी सावंत यांनी केली.
निवडणुकीचा निकाल 31 तारखेला जाहीर झाला, विजयही घोषित झाला त्यानंतर आता इतक्या उशिरा ही भेट का, असा प्रश्न विचारला असता याबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी 25 तारखेपर्यंतचा वेळ आहे. खर्चाची माहिती बाहेर आल्यानंतर राजेंद्र गावित यांची उमेदवारीही अपात्र ठरु शकते असा इशारा सावंत यांनी दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
